आठवणीतल्या मैफली - १
मुंबईला आयायटीत असतानाची गोष्ट. झेवियर्स कॉलेजने 'मल्हार के प्रकार' सादर करण्यासाठी गंगुबाई हनगळाना आमंत्रित केलं होतं. गंगुबाईना माझ्या सांगितीक अनुभूतीच्या अवकाशात एक विशेष स्थान आहे. या कार्यक्रमापूर्वी मी त्यांना रेडिओवर संगीतसभांमध्ये फक्त ऐकायचो. प्रत्यक्ष मैफल ऐकायचा हा पहिलाच योग होता.
झेवियर्स मधली ही मैफल बर्यापैकी रंगली होती, पण मला काही तरी हवं होतं आणि ते मिळत नसल्याची एक रुखरुख मनाला लागली होती. काय हवं होतं ते नेमकं शब्दात पकडण शक्य नव्हतं कारण तेव्हा संगीताचं तेव्हा तेव्हढं ज्ञान नव्हतं (आताही फार आहे असं नाही!). गंगुबाईनी मल्हारचे ५-६ तरी प्रकार श्रोत्यांसमोर मांडले. रात्रीचे आठ वाजून गेले तेव्हा अचानक त्यांनी गाणं थांबवले. श्रोत्याना अभिवादन केले आणि मैफल संपली असल्याचे सूचित केले. साहजिकच पुष्कळसा श्रोतृवर्ग उठून जाऊ लागला. झेवियर्सचा हॉल बराचसा रिकामा झाला होता पण २५-३० श्रोते तसेच बसून राहिले होते.गंगुबाईनी आणखी काही गावं म्हणून... त्या श्रोत्यांमध्ये मी आणि माझ्या मित्रांचा समावेश होता हे सांगायला नकोच.
समोर आशाळभूत पणे बसून राहिलेले श्रोते बघून गंगुबाईना पण उठणे अवघड झाले आणि त्या हसून म्हणाल्या, "हे मल्हारचे प्रकार वगैरे गाणं हे माझं काम नाही. मला आयोजकांचा आग्रह फारच झाला म्हणून गायले. गोड मानून घ्या."एवढे बोलल्यावरही श्रोते ढीम्म जागे वर बसून... शेवटी थोडा वेळ "आता काय करावं" अशा विचारात सापडलेल्या गंगुबाई म्हणाल्या, "बरं...आता मी जरा माझं-माझं गाते" आणि तंबोरे परत सुरु झाले. पेटीनं परत सूर धरला आणि तबल्यावर थाप पडली आणि आम्हा हट्टाने बसून राहिलेल्या नशीबवान श्रोत्याना दिव्य गाणे ऐकायला मिळाले. खास गंगुबाईंचं गाणं.
रागाचं नाव माहिती नव्ह्ते (तेव्हा तेव्हढी समज आलेली नव्हती), पण इतका वेळ रुखरुख लागून राहिलेल्या मला त्या दिव्य गाण्याने "आपल्याला हवे असलेले ते हे़च" अशी अनुभूती मात्र दिली.
नंतर कळले की तो होता शंकरा. आणि त्या दिवसापासून शंकरा हा माझा अत्यंत आवडता राग आहे.
याद्या
5509
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
मालक,
+१
In reply to मालक, by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by राजेश घासकडवी
+४
In reply to +२ by छोटा डॉन
+५
In reply to +४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+६
In reply to +५ by मस्त कलंदर
+७
In reply to +६ by आंबोळी
+८
In reply to +७ by टुकुल
+९
In reply to +८ by Nile
+१०
In reply to +९ by प्रभो
+१ सहमत
In reply to मालक, by श्रावण मोडक
छान
तात्या सौ. वीणा सहस्त्रबुध्दे ह्याची
In reply to छान by विसोबा खेचर
फारच छान.
मस्त
+१
In reply to मस्त by यशोधरा
लेख आवडला
देशकार,
In reply to लेख आवडला by सहज
आणखी एक विनंती
In reply to देशकार, by युयुत्सु
आता थाट,
In reply to आणखी एक विनंती by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यांनी
In reply to आता थाट, by युयुत्सु
एक बिलावल
In reply to देशकार, by युयुत्सु
!!!
सहमत
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
ओ की
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
धागा
मस्त
मस्तच लेखन!
अपेक्षीत
हा लेख
छान लेख
देशकार / भुप...
सुंदर लेख
सर्व
सुट्टी
In reply to सर्व by युयुत्सु
युयुत्सु
ज्यांना
भूप्/देसकार
सुजन कसा
सुजन कसा
In reply to सुजन कसा by युयुत्सु