कोणत्याही विधानाशी असहमत असल्यास नविन धागे काढण्याची फ्याशन येऊ शकेल. संपादक हा फालतु धागा उडवतील काय ? असा एक व्यक्तिगत विचार मनाला चाटुन गेला... :)
बाकी तात्याने जिथे ही प्रतिक्रिया दिली , तिथेच खाली असहमत झाले असते , पण युयुत्सु ला मुखपृष्ठावर राहाण्यात इंटरेस्ट दिसतो ... काय खाली-वर खाली-वर चालु आहे ?
ते अण्णा म्हणजे नक्की कोण हे आधी स्पष्ट करा. 'गुळाचा गणपती'त दाखवल्याप्रमाणे प्रत्येकाचे 'अण्णा' हे वेगवेगळे असू शकतील.
बाकी सूर, लय, ताल वगैरे कुणाकडून शिकायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
उदाहरणार्थ, नितिन मुकेश याने गाण्यातला सूर(?) हा त्याच्या पूज्य पिताजींकडून घेतला आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
खळेकाकांना विचारा, लता-भीमसेनजी यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस ताल संभाळताना कुणाची त्रेधातिरपीट झाली होती ते ! शेवटी वेगवेगळे रेकॉर्डिंग करुन घ्यावे लागले आणि नंतर मिक्स करावे लागले.
हम्म... अशा कथा मी पण ऐकल्या आहेत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही. ;)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.जअईदगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा धागा उडवला ज
>>दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही.
असे काही होईल असे वाटत नाही.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
दगड्फेक, जाळपोळ होईल असे किंवा गेला बाजार धागा उडवला जाईल असे मी काहीही लिहीणार नाही. >>>>>>
च्यामारी टोपी...
मी नाय त्यातली आन कडी लावा आतली ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मी चिडलेलो नाही. मी फक्त असहमती दर्शवली. भीमसेनजींच्या पलिकडे भारतीय संगीत नाही किंवा भीमसेनजी म्हणजे संगीतातला पूर्णविराम अशी समजूत करून दिली जाणार असेल तर तो अनेकांवर अन्याय आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
गौरवार्थ असे लिखाण होत असतेच. त्याचा आस्वाद फक्त घ्यावा काथ्याकूट करू नये.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
गौरवार्थ असे लिखाण होत असतेच. त्याचा आस्वाद फक्त घ्यावा काथ्याकूट करू नये.
असे तुमच्या सारखा प्राध्यापक म्हणत असेल तर कॉलेजात कला शाखा हवी कशाला?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
पंडितजी हे भारतीय संगीतातील महामेरू आहेत...जर कोणी त्यांच्याबद्दल आदराने काही लिहिले तर एकदम एवढा काथ्याकुट कशाला करायला पाहिजे...तुम्हाला नाही पटत तर तुम्ही दुसर्या कोणाकडून शिका... हाय काय नि नै काय ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
ज्याचं त्याचं मत आणि आवडी निवडी त्याचं उगाच काथ्याकुट करण्यात काय अर्थ आहे. मला असं अण्णा, वसंतराव, कुमारजी, किशोरीतै असं सगळ्याबद्दल वाटतं, कुणाला आणखी कोण. कोणी गणपतीला मानतं कोणी दत्ताला, तशी ही कलेची दैवतं. कोण कुणाला का पुजेना.
असहमत.. लयीचं सौंदर्य हे प्रत्येक घराण्याचं वेगवेगळं.. आता किराणा गायकी ही स्वरप्रधान गायकी आहे असं म्हटलं जातं, याचा अर्थ त्यात लयीचं सौंदर्य नाही असा नाही..
गायकी फक्त गुरुकडून तालीम घेऊन शिकावी
असहमत.. गायकी गुरुंव्यतिरिक्तही अनेकांकडून शिकता येते.. फक्त शिष्य ती गायकी अलगद टिपणारा असावा.. स्वत:च्या गुरुंव्यतिरिक्त अन्य गुणीजनांकडून गायकी शिकल्याची, टिपल्याची आणि ती गायकी आपल्या गायकीत सुरेख रितीने सामावून घेणार्या कलाकारांची अनेक उदाहरणे सांगता येतील..
स्वर म्हणजे काय हे धृपदीयांकडून (विशेषतः डागरांकडून्) शिकावे...
पुन्हा एकदा असहमत..
असो, असहमत असलो तरी आपल्या विचारांचा आदर आहेच..
अजून एक खुलासा..
अण्णांकडूनच शिकावं असं जरी म्हटलं असलं तरी ते शब्दश: घेऊ नये. ते केवळ अण्णांविषयीच्या आदरापोटी लिहून गेलो होतो..कला हा विषय असा आहे की तो कुणाही गुणीजनांकडून, गुरुजनांकडून शिकावा. केवळ एका 'च' ला असहमती दर्शवण्याकरता सबंध धागा काढला गेला हे जरा हास्यास्पदच वाटले..असो..
भीमसेनजींच्या पलिकडे भारतीय संगीत नाही किंवा भीमसेनजी म्हणजे संगीतातला पूर्णविराम अशी समजूत करून दिली जाणार असेल तर तो अनेकांवर अन्याय आहे.
अशी समजूत करून देण्याचा माझा कोणताही हेतू नाही याचं मला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे याची गंमत वाटते..! आजपर्यंत अण्णांच्या गाण्याव्यतिरिक्त इतर अनेकांच्या संगीतकलेबद्दल मी मिपावर व अन्यत्र भरभरून लिहिले आहे..
गौरवार्थ असे लिखाण होत असतेच.
दिवटेसाहेबांनी अगदी साधा कॉमन सेन्स दाखवला आहे. धन्यवाद दिवटे साहेब! :)
आपला,
(गजाननबुवांच्या हमीरचा प्रेमी) तात्या.
ता क - हमीर हा केवळ आमच्या गजाननबुवांनीच गावा! :)
तात्या.
स्वर म्हणजे काय हे धृपदीयांकडून (विशेषतः डागरांकडून्) शिकावे...
पुन्हा एकदा असहमत..
असो, असहमत असलो तरी आपल्या विचारांचा आदर आहेच..
तुमची असहमती मी gentlemen's disgreement' म्हणून स्वीकारतो. पण एका गोष्टीचा उल्लेख इथे केल्याशिवाय राहवत नाही. Wim Van Der Meer
नावाच्या एका musicologist ने खरोखर मोठा संगीतकार्/गायक्/वादक कोण याची व्याख्या एकदा गप्पामध्ये सांगितली होती.
तो म्हणाला, " दोन सूरांमधली स्पेस ज्याला मोठी करून दाखवता येते तो खरा musician".
मला ही व्याख्या मनोमन पटते... आणि या व्याख्येच्या कसोटीला फक्त धृपदीयेच उतरतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
"तुम्ही संगीतात करत असलेले काम हे होत का?"
हो ! बरोब्बर.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
युयुत्सु साहेब..
१. आपण गाणं गायला शिकला आहत काय? (नुसतं गाणं वाचायला बरेच जण शिकतात). जसं पुणेरी पब्लिक ...नो ऑफेन्स....
२. भाग्यवान आहात की अण्णांशी तुमचा संगीतविषयक संबंध आला आहे.
३. काय कशाशी खातात ह्या विषयावर ज्याचे त्याचे वैयक्तिक मत असेल पण शेवटी अश्या मोठ्या लोकांविषयी बोलताना आपण कुठे आहोत याचा विचार करणे जास्त रास्त आहे असं मला वाटतं. अण्णांसारखा नुसता धीरगंभीर षड्ज जरी तासभर लावता आला तरी त्यांच्या संगीतातल्या मातब्बरीवर आपल्याला उणं बोलायचा अधिकार आहे असं प्रत्येकानं प्रामाणिकपणानं मानावं. १४ - १४ तास रीयाजाची मेहेनत करणं आजकाल कुणाच्या तीर्थरुपाना सुद्धा जमणार नाही.
४. तसे अण्णांच्या बरोबरीचे लोक आहेतच की जे स्वर कशाशी खातात ते जाणुन आहेत. जसे यशवंतबुवा जोशी.
कळावे..
- वाटाड्या....
१४ - १४ तास रीयाजाची मेहेनत करणं आजकाल कुणाच्या तीर्थरुपाना सुद्धा जमणार नाही.
आमचे आजे-गुरुजी आणि गुरुजी
आमचे आजे-गुरुजी (गुरुजींचे गुरुजी) उस्ताद फरिदुद्दीन डागर खूप गोष्टीवेल्हाळ आहेत. त्यांना आम्ही एकदा प्रश्न विचारला, "उस्ताद, तुम्ही किती तास रियाज केला आहे?
त्यावर त्यांनी उलट प्रश्न विचारला, "तुम्हाला खरं उत्तर सांगू की खोटं?"
आम्ही म्हटलं, "खरं आणि खोटं,दोन्ही"
त्यावर ते म्हणाले, "खोटं उत्तर आहे, १८-१८ तास, आणि खरं उत्तर आहे सुरुवातीला ५-६ तास आणि नंतर नंतर तीन तास."
मग थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, "डोक्यात २४ तास गाणं झुळझुळत असेल तर १८ तास रियाजाची काहीही आवश्यकता नसते"
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
जाना दो... युयुत्सुभाय, तात्या.. काय लावुन धरलय राव.. जरा कुमारजींच्या, वसंतरावांच्या, अभिषेकीबुवांच्या एखाद्या चीजेवर लिहा की कायतरी ह्याच्यापेक्षा.. जास्त आनंद नाय का मिळनार, तुम्हाला आन् आमालापण...
आमच्या कानात कायतरी चांगल ओता की राव.. काय कालवा लावलाय.. तुमाला जरा कळतं गाण्यातलं म्हणुन आमी सांगायलो तर तुमी भांडून काहुन राह्यले..
जास्त आनंद नाय का मिळनार, तुम्हाला आन् आमालापण...>>>>
आपल्या आपल्या आनंदाच्या व्याख्या अर्धवटराव, त्यांना यातच आनंद मिळत असेल तर आपण कोण अडवणारे ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
तुम्ही तरी
अरे व्वा......तुम्ही तर छुपे रुस्तुम आहात.
हम्म
कोणत्याही
पण वरील
ही ही
शानबा५१२
अण्णा
राम गुणगान
हम्म... अशा
अशा कथा मी
दगड्फेक,
>>दगड्फेक,
हो हो एकदा लिहाच ह्या विषयावर
दगड्फेक,
बाकी वरचे तात्यांचे मत त्याच्या गुरु बद्दल होते
मी चिडलेलो
गौरवार्थ
सहमत
गौरवार्थ
असहमतीशी सहमत
शयमत
पंडितजी हे
कलेची दैवतं
साला कायम
तुम्ही
मला तरी
स्वर
मला ही
"तुम्ही
सहमती / असहमती..
रियाज
जाना दो...
काँप्युटर प्रोग्राम
किमान
जास्त आनंद