लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या
लेखनविषय:
काव्यरस
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या
तुमची माझी प्रित जडली
आठवण राहू द्या
प्रितीची निशाणी म्हणून
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||धृ||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)
साडी चोळी आहे मजला
नको दुसरे काही
श्रॄगांराची टिकली बांगडी
उगाच मागत नाही
सोनाराकडे आजच जावू या, नको की उद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||१||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)
राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही
कशाला कधी केलं नाही कमी
घाटदार पाच तोळे चोख वजनी
अंगठी साखरपुड्याला घेवूनी
भेटा सगळ्यांसमोर तेव्हा, आता जावूद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||२||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०६/२०१०
वाचने
2546
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
शृंगारीक लावणी आवडली... :)
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही
कशाला कधी केलं नाही कमी
घाटदार पाच तोळे चोख वजनी
अंगठी साखरपुड्याला घेवूनी
भेटा सगळ्यांसमोर तेव्हा, आता जावूद्या
क्या बात है झकास..पेशवाइत गेल्यासा सारखे वाटले
साडी चोळी आहे मजला नको दुसरे काहीहा विरोधाभास नाही वाटत का? म्हणजे अस पण बोलते व अरुन अंगठी पण मागते. आपल्या ध्यानात नाही राहील का हे? तुमच्या(तुझ्या रे! वय माझ्यापेक्षा थोडच कमी जास्त असेल अस वाटत) गावरान भाषेतल्या कविता खुप आवडतात मला,तशाच लिहा. &************************************************** दील दो दील दो,या तो इंटरनेट का बिल दो!
In reply to साडी चोळी by शानबा५१२
आणि साधीसुधी नाही पाच तोळ्याची अंगठी हवीय (जरा जास्तंच वजन आहे, नाही?)... आजमितीला हि अंगठी लाखाच्या घरात जाईल... खि खि खि.
-अनामिक
In reply to आणि by अनामिक
पाच तोळ्याची अंगठी बनवली त ती अंगठा वाटेल व बांगडी बनवली तर बांगडा वाटेल.भलतीच आगाउ आहे ही कवितेतली बाई............ओ पाषाणभेद आवरा तिला आमच्या निष्पाप मनावर नको ते परीणाम नको........
असे विरोधाभास टाळा आता.................दगड फोडताना काही डोक्याला लागल की काय??
"अंगठी साखरपुड्याला बोटात घालणे" म्हणजे वाड् निश्चय करणे. या सामाजिक रिवाजात नाते पक्के करणे हा भाव असतो. आपली हिरॉईन फार फार चोखंदळ आहे. हलवून खुंटा ती बळकट करू पाहत आहे. अशाने तीचे नाते पक्के तर होईलच पण एक मौल्यवान वस्तूही तिच्या बोटात येईल. अन पाच तोळ्याची अंगठी घालणारीण पण काही साध्यासुध्या अंगकाठीची नाही. ती काही शहरातली फॅशनेबल स्त्री नाही. ती खेड्यातली गावराण स्त्री आहे - अगावू नाही. स्पष्टपणा, रोखटोखपणा तीच्या अंगात मुरलेला आहे. पाच तोळ्याच्या अंगठीकडे ती 'गुंतवणूकीच्या' माध्यमाकडून बघत आहे. म्हणूनच ती पुचाट साडीचोळी न मागता पाच तोळ्याची अंगठी मागते आहे, भले ती एकदाच बोटात घालेल पण कायमची गुंतवणूक होईल.
(तरीही मला पाच तोळे म्हणजे जरा मोठीच वाटते आहे. संपादन करून तीन तोळे करावी वाटते आहे.)
@ शानबा: अरे शानबा मला तू एकेरीतच बोलाव रे. मस्त वाटते. एकदम मित्रासारखे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to "अंगठी by पाषाणभेद
हत च्यायला हे अस आहे काय?
मग कवितेच्या आधी लिहायच होत ना!
अरे काय Yokozuna आहे की काय??अन पाच तोळ्याची अंगठी घालणारीण पण काही साध्यासुध्या अंगकाठीची नाही
स्पष्टपणा, रोखटोखपणा तीच्या अंगात मुरलेला आहेबायको म्हणुन मागतेय तर ठीक आहे,पण अशी अरदांड 'नवरी' नको रे बाबा!
पाच तोळ्याच्या अंगठीकडे ती 'गुंतवणूकीच्या' माध्यमाकडून बघत आहे. म्हणूनच ती पुचाट साडीचोळी न मागता पाच तोळ्याची अंगठी मागते आहे, भले ती एकदाच बोटात घालेल पण कायमची गुंतवणूक होईल.पाच तोळ्याची अंगठी करणारा खेड्याच्या माणसांशी संबंध ठेवेल का? आणि गुंतवणुकीबाबतीत बरी ती पुढारली आहे! तेव्हा आम्ही असले कवितेतले विरोधाभास मानणार नाही,कवीने योग्य खुलासे करावेत.आपण आपले चुकले नाही हे सांगायला कायच्या काय परीस्थीती बनवता आहात अस वाटत. आपल्याकडुन खुप चांगल्या लिखाणाची अपेक्षा आहे,हे असले विरोधाभास टाळा म्हणजे झाल! जीन्स'च्या वर' पण काहीतरी लिहा की..........!!
चाल सुरू: पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||wow!!! Grazie!!grazie for this!! (पुर्ण कविता मस्त आहे)
In reply to हत च्यायला by शानबा५१२
जावूद्याहो शानबा. असले हलकेफुलके नाही वाचायचे तर मग काय दररोजचा पेपर वाचायचा का? अहो हे 'जे न देखे रवी ' आहे. अन तुम्हाला तुमच्या पिक्चरमध्ये हे गाणे टाकायचे असेल तर
"घाटदार अर्धा ग्रॅम चोख वजनी"
असला बदल आपण करू, मग तर झाले?
(तरी मी म्हणतो आपल्या 'मराठी ' पिक्चरचे बजेट वाढवा. पण नाही. नंतर तुम्हीच म्हणता असं तसं. अहो दाजीबा असं हे वागणं बरं नव्ह!)
अवांतर: खेड्यात पैसा भरपूर आहे म्हटलं. मी रोखीने (कॅश पेमेंट करून) मोठ्या मोठ्या चारचाकी गाड्या शोरूम मधून काढणारी मंडळी पाहीली आहेत खेड्यातून. आपल्यासारखी उगाचच पेमेंट स्लीप नको, जामीनदार नको!
टारझन नंतर आता तुमचा ब्लॉग bookmark केला आहे.
आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी रस जरा चाखून बघा, म्हणाल नमून्याची चव बरीअरे हे काय लिहतोस?? पायरी व रायवळपेक्षा हापुसच सरस मानतात!! आंब्यांची माहीती तरी मिळवायचीस!
तुम्ही आंबं इथंतिथं दाबीता, हात इथंतिथं लावता पाटीत आंबं रचलेत निट, का उगा खाली हात घालता निसंतं बघायचं बघता, आन येळ घालवीता फुका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||४||मला 'कुअर्थ' अपेक्षित नाही,पण हे जाम आवडल.आम्ही आपल्या कवितचे फॅन आहोत हे लिहुन मी तसुभरही चुक केली नाही अस वाटत. हो पण मी चुका असतील तर काढतच राहणार!
ब्लॉगबद्दल धन्यवाद!
>>> आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी...
मला हापुस सरस असतो हे माहित होते. पण मी हे वरचे जाणूनबुजून लिहीले होते.
"तुम्ही हापुस जरी चाखला असेल तरी माझा हा गावठी आंबाच श्रेष्ठ आहे " असे हिरवीनीला आपेक्षीत होते. अन ती त्याचे मार्केटींग करते आहे.
बाकी कुअर्थ असेल तर तो मलाही समजून द्या. उगाच आपल्या घरंदाज स्त्रीला बोल लावता बघा तुम्ही शहाणी सुरती माणसं.
चुका काढू नका हे मी कधी म्हटलेय का? त्या मुळे का होईना तुम्ही कविता बारकाईने वाचतात ते समजते! :-)
अवांतर: तुमच्या झाडावरचे रायवळीचे आंबे आम्ही खाली पडूच दिले नसते बरं!
शृंगारीक