बावळट ध्यान..
====================
ढगांच्या छत्रीमागुन
डोळा मारुन गेली वीज..
सोसाट्याचे वारे देखील..
सांगुन गेले लेका भीज..
तिच्याकडेच पाहात होतो..
मी मुर्ख बावळट अजुन..
झाडानेही हिंन्ट दिली
दोनचार पाने टाकुन...
मिठीत घे गधड्या तिला
पाऊस धो धो होता सांगत..
मी पेटलेलो आतुन बाहेरुन..
होत नव्हती माझी हिंमत..
सार्या पंचमहाभुतांनी
कपाळावर मारला हात..
ह्याच्याने काही होणार नाही..
ध्यान अगदी आहे पुळचाट..
उपाय शेवटचा म्हणुन
वीज कडाडली भयानक..
मीच तेव्हा तिच्या मिठीत
घाबरुन शिरलो अचानक..
वारा मनसोक्त हसु लागला..
ढगांमागुन वीजही..
झाडानेही घुसळवले अंग..
अन हसु लागली ती ही..
-----योगेश जोशी.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2893
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्हीच!! एक
>> मीच
छानच binarybandya™
मस्त रे
लै
मस्तच !
ही माझी प्रतिक्रिया.
मस्तच, कवित
हा हा