✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

असाही असतो 'अभिमान'?

अ
अरुंधती यांनी
Mon, 06/14/2010 - 21:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7035 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मस्त!!!!

शुचि
Mon, 06/14/2010 - 22:05 नवीन
=D> मस्त!!!! क्लास!! किती सुंदर रंगवलायस अरु हा किस्सा >:D< ह ह पु वा. चोंबडे शेजारी मेले [( .... अस्सच पाहीजे त्यांना. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

हाहाहा!!! लै

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/14/2010 - 22:12 नवीन
हाहाहा!!! लै भारी किस्सा... हतबुद्ध मात्र झालोच... तथाकथित सांस्कृतिक रेजिमेंटेशन, शोषितांचे ब्रेनवॉश कसे करते याचे उत्तम उदाहरण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

middle class morality

राजेश घासकडवी
Mon, 06/14/2010 - 23:58 नवीन
तथाकथित सांस्कृतिक रेजिमेंटेशन, शोषितांचे ब्रेनवॉश कसे करते याचे उत्तम उदाहरण.
हे काहीसं बूर्ज्वा, middle class morality तून येतंय असं वाटत नाही का? तसं असल्यास ब्रेनवॉशिंग नक्की कोणाचं झालं आहे? लग्नसंस्था हे एक प्रकारचं रेजिमेंटेशन नाही का? त्या बाईचा अभिमान सार्थ असेल कदाचित. हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

गप्पा

शिल्पा ब
Tue, 06/15/2010 - 00:03 नवीन
गप्पा मारणे आणि बाया फिरवणे फरक असतो का नाही? अर्थात एखाद्या बाईने असं काही केलं तर लग्न मोडलंच समजा...म्हणजे जर कळलं तिच्या नवर्याला तर... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

नक्की काय?

राजेश घासकडवी
Tue, 06/15/2010 - 00:10 नवीन
गप्पा मारणे आणि बाया फिरवणे फरक असतो का नाही?
नक्की काय फरक असतो हे middle class morality किंवा लग्नसंस्थेचं रेजिमेंटेशन न वापरता सांगता येईल का? तूर्तास स्त्री व पुरुषांना समाज देत असलेली वेगळी वागणुक बाजूला ठेवू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लग्न असो

शिल्पा ब
Tue, 06/15/2010 - 00:18 नवीन
लग्न असो वा नसो आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करणे हे योग्य नाही...पण जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल (इथे अमेरिकेत तरी अशी उदा. आहेत) तर काही हरकत नाही....ती प्रतारणा होऊ शकत नाही.गप्पा मारण्याने काय कोणाचे नुकसान होणार आहे? (मी इथे गप्पा म्हंटले आहे gossiping नाही.) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जोडीदार, प्रतारणा वगैरे...

राजेश घासकडवी
Tue, 06/15/2010 - 00:47 नवीन
(एकच) जोडीदार, प्रतारणा वगैरे संकल्पना मध्यमवर्गीय नैतिकतेतून कृत्रिमपणे लादल्या गेल्या असतील तर?
जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल
बरोबर. मुळात सगळीकडूनच मान्यता असेल तर हे प्रश्न उद्भवणारच नाहीत. मग त्या बाईचं व तिच्या नवर्‍याचं वागणं कथा लिहिण्याच्या लायकीचं होणार नाही. प्रश्न ब्रेनवॉशिंग कोणाचं झालंय, हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ब्रेन्वाश

शिल्पा ब
Tue, 06/15/2010 - 00:58 नवीन
ब्रेन्वाशिंग म्हणाल तर सगळ्यांचच झालाय...पुरुष काय वाटेल के करायला मोकळा आणि बाईच विश्व घर,चूल, मुल आणि आता नोकरी...यालाच दोन्हीकडून मान्यता...आणि जे मानत नाहीत ते बंडखोर. आणि जोडीदारांच्या संखेविषयी म्हणाल तर रोगमुक्त राहण्यासाठी...prevention is better than cure असं मला आपलं वाटत.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तरीच

सोम्यागोम्या
Tue, 06/15/2010 - 08:53 नवीन
तरीच म्हटलं अजून स्त्री पुरुष या विषयाकडे गाडी कशी काय आली नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

गाडी त्याच

शिल्पा ब
Tue, 06/15/2010 - 10:14 नवीन
गाडी त्याच रस्त्यावर होती एक बारका टर्न घेतला एवढंच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

मान्यतेपे

शैलेन्द्र
Tue, 06/15/2010 - 10:18 नवीन
मान्यतेपेक्षाही सदर प्रकरण अगतीकतेच आहे असं वाटत. आपण बोलुन फार काही होणार नाही किंवा आपल्याला बोलायचा आधिकार नाही अशी स्वत:ची समजुत करुन घेवुन मग जाग्रुत झालेल्या स्वसंरक्षण यंत्रणेने दिलेला हा प्रतिसाद आहे असं वाटत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हम्म्म... चांगला प्रश्न!

पंगा
Tue, 06/15/2010 - 01:08 नवीन
हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?
चांगला प्रश्न आहे. - 'या एकदा निवांत गप्पा मारायला! आणि येताना वहिनींना/भावजींना घेऊनच या बरोबर.' - 'आज बर्‍याच दिवसांनी गप्पा मारून खूप मजा आली! भावजी/वहिनी असते/असत्या, तर आणखी मजा आली असती. भावजींना/वहिनींना सांगा, आठवण काढली होती म्हणून.' ही वाक्ये आपण किती सहजगत्या बोलून जातो! खरेच, हा वाक्यसंच वाढवायला काय हरकत आहे? विचार करतोय. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बाया

टारझन
Tue, 06/15/2010 - 00:19 नवीन
बाया फिरवणे फरक असतो का नाही?
च्यायला ... :) आत्तापतुर "पोरगी(पोरी) फिरवणे " हा वाक्प्रचार ऐकला होता .. बाया म्हणजे .. भलताच व्यासंग =)) - टारेश पोरीफिरवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चार बोटे

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 06/15/2010 - 09:11 नवीन
सांस्कृतिक रेजिमेंटेशन
बिपिनभौ तुमचा प्रतिसाद याच रेजिमेंटेशनचे उत्पादन वाटत आहे. शोषित नेमके कोण आहेत हे वर सांगितलेल्या किश्श्यात स्पष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अक्षयभौ,

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/15/2010 - 16:10 नवीन
अक्षयभौ, मी केवळ आपल्याकडे स्त्रीने काहीही झाले तरी सावरून घ्यायचे, अन्याय सहन करायचा, मार खायचा पण नेहमी नवर्‍याचेच ऐकायचे इतकेच नव्हे तर त्याचे उदात्तीकरण करायचे असे संस्कार परंपरेने चालत आलेले आहेत आणि त्याचा पाश जीवघेणा असतो. माझ्या अंदाजाने, त्या बाईने केवळ याच भावनेपोटी नवर्‍याच्या या असल्या संतापजनक कृत्याचे समर्थन / उदात्तीकरण केले असावे असे वाटले. त्या परंपरेच्या पाशाला / जोखडाला मी रेजिमेंटेशन असे म्हणले. शिवाय इथे शोषित म्हणजे ती स्त्री आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

शोषित । अपुर्ण माहिती

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 06/15/2010 - 16:23 नवीन
इतरवेळी दोन खोल्यांमध्ये काहीच मोकळीक न मिळणारा पुरूष हाही एक शोषितच आहे. तेव्हा शोषणाच्या अंगाने या किश्श्याकडे पाहणे योग्य वाटत नाही. त्या पुरुषाचे व त्याच्या पत्नीच्या लैंगिक संबंधांविषयी काहीच माहिती नसल्याने त्याविषयी काहीच सांगता येत नाही. या स्त्रीच्या बाहेरील पवित्र्यावरून काहीच सांगता येत नाही. जगासमोर नाचक्की न होऊ देण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नक्कीच,

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/15/2010 - 17:06 नवीन
नक्कीच, तुम्ही म्हणता तो ही एक दृष्टीकोण होऊ शकतो, आहेच. मला हे वाचल्यावर पटकन जे वाटलं ते लिहिलं. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

''आमची

शिल्पा ब
Mon, 06/14/2010 - 22:21 नवीन
''आमची मानसं पुरुष हायेत म्हटलं! '' यावर आता काय डोंबल प्रतिक्रिया लिहिणार..."पुरुषांनी" असे काही केले कि मगच बहुतेक त्यांच्या पुरुषपनाचा प्रत्यय येत असावा... बाकी बहुतेक अशीच प्रवृत्ती शायनी अहुजा किंवा त्या रुचिका प्रकरणातल्या बायकांची असावी का? clinton प्रकरणात हिलरीला राजकारणातील महत्वाकांक्षा होती आणि त्यासाठी कुटुंबशील अशी प्रतिमा हवी असल्याने सार्वजनिकरित्या नवर्याची बाजू घेतली असे वाटले..असो, लेख उत्तम. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा! एकदम अँटीक्लायमॅक्स!!

चतुरंग
Mon, 06/14/2010 - 22:34 नवीन
मस्तच रंगवलाय किस्सा! :) (अवांतर - इथे 'आंटी'क्लायमॅक्स अशीही एक आचरट कोटी सुचून गेली ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

अशा

डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 06/15/2010 - 04:52 नवीन
अशा प्रसंगी बायको नवऱ्‍याची बाजू घेणार हे उघडच. ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments

*****************************

डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 06/15/2010 - 04:53 नवीन
******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला

चिरोटा
Tue, 06/15/2010 - 10:54 नवीन
किस्सा आवडला.भारतात नवर्‍यावर कसाही प्रसंग येवो,स्त्रिया सहसा बोलत नाहीत.हाच प्रसंग नवर्‍यावर आला तर त्याचा प्रतिसादही बघण्यासारखा असेल.
मान्यतेपेक्षाही सदर प्रकरण अगतीकतेच आहे असं वाटत.
सहमत.वरील किस्सा असो वा शायनी अहुजाचे बलात्कार प्रकरण. ही अगतिकतेचीच उदाहरणे आहेत. P = NP
  • Log in or register to post comments

त्या

तिमा
Tue, 06/15/2010 - 13:59 नवीन
त्या घरातल्या बाईला राग आलाच नसेल असे नाही पण परक्यांसमोर तिने, आम्ही १०५, हे धोरण ठेवले ते योग्यच केले. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

+१ त्याहून

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/15/2010 - 14:36 नवीन
+१ त्याहून अधिक काही अर्थ काढावेत असे वाटले नाही. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+२ अधिक

अवलिया
Tue, 06/15/2010 - 14:39 नवीन
+२ अधिक काही अर्थ काढावेत असे वाटले नाही. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

+३

टुकुल
Tue, 06/15/2010 - 15:03 नवीन
असा साधा सोप्पा अर्थ आहे. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नवरा

II विकास II
Tue, 06/15/2010 - 16:19 नवीन
नवरा बायकोची भांडणे कधी सोडवायला जाउ नयेत. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments

हेच्च म्हन्तो...

बद्दु
Tue, 06/15/2010 - 17:02 नवीन
म्या भी हेच्च म्हन्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

मस्त किस्सा

प्रियाली
Tue, 06/15/2010 - 17:15 नवीन
मस्त किस्सा आणि प्रतिसाद. शोषितांपासून स्त्रीमुक्तीकडे गेलेले प्रतिसाद बघून गंमत वाटली... अशाच प्रकारचा एका सुशिक्षित-उच्चविद्याविभूषित घरात घडलेला किस्सा आठवला. फक्त कुत्र्याऐवजी तेथे पोटची पोरे होती आणि आपल्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून बाईला घरी आणणारी खुद्द बायकोच होती. असो. कुत्रा सांभाळण्यासाठी आख्खी बाई घरी आणणार्‍या पुरुषाचे कौतुकही वाटले. ;-) तसेच हा किस्सा आमच्या घरात वाचला जाणार नाही म्हणून मनोमन बरेही वाटले. नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला. :D
  • Log in or register to post comments

नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला.

मितभाषी
Tue, 06/15/2010 - 17:20 नवीन
---------------------------------- नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला. =)) =)) =)) =)) =)) हाण्ण!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा