तथाकथित सांस्कृतिक रेजिमेंटेशन, शोषितांचे ब्रेनवॉश कसे करते याचे उत्तम उदाहरण.
हे काहीसं बूर्ज्वा, middle class morality तून येतंय असं वाटत नाही का? तसं असल्यास ब्रेनवॉशिंग नक्की कोणाचं झालं आहे? लग्नसंस्था हे एक प्रकारचं रेजिमेंटेशन नाही का?
त्या बाईचा अभिमान सार्थ असेल कदाचित. हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?
गप्पा मारणे आणि बाया फिरवणे फरक असतो का नाही? अर्थात एखाद्या बाईने असं काही केलं तर लग्न मोडलंच समजा...म्हणजे जर कळलं तिच्या नवर्याला तर...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
नक्की काय फरक असतो हे middle class morality किंवा लग्नसंस्थेचं रेजिमेंटेशन न वापरता सांगता येईल का?
तूर्तास स्त्री व पुरुषांना समाज देत असलेली वेगळी वागणुक बाजूला ठेवू...
लग्न असो वा नसो आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करणे हे योग्य नाही...पण जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल (इथे अमेरिकेत तरी अशी उदा. आहेत) तर काही हरकत नाही....ती प्रतारणा होऊ शकत नाही.गप्पा मारण्याने काय कोणाचे नुकसान होणार आहे? (मी इथे गप्पा म्हंटले आहे gossiping नाही.)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
(एकच) जोडीदार, प्रतारणा वगैरे संकल्पना मध्यमवर्गीय नैतिकतेतून कृत्रिमपणे लादल्या गेल्या असतील तर?
जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल
बरोबर. मुळात सगळीकडूनच मान्यता असेल तर हे प्रश्न उद्भवणारच नाहीत. मग त्या बाईचं व तिच्या नवर्याचं वागणं कथा लिहिण्याच्या लायकीचं होणार नाही. प्रश्न ब्रेनवॉशिंग कोणाचं झालंय, हा आहे.
ब्रेन्वाशिंग म्हणाल तर सगळ्यांचच झालाय...पुरुष काय वाटेल के करायला मोकळा आणि बाईच विश्व घर,चूल, मुल आणि आता नोकरी...यालाच दोन्हीकडून मान्यता...आणि जे मानत नाहीत ते बंडखोर.
आणि जोडीदारांच्या संखेविषयी म्हणाल तर रोगमुक्त राहण्यासाठी...prevention is better than cure असं मला आपलं वाटत..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मान्यतेपेक्षाही सदर प्रकरण अगतीकतेच आहे असं वाटत. आपण बोलुन फार काही होणार नाही किंवा आपल्याला बोलायचा आधिकार नाही अशी स्वत:ची समजुत करुन घेवुन मग जाग्रुत झालेल्या स्वसंरक्षण यंत्रणेने दिलेला हा प्रतिसाद आहे असं वाटत....
हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?
चांगला प्रश्न आहे.
- 'या एकदा निवांत गप्पा मारायला! आणि येताना वहिनींना/भावजींना घेऊनच या बरोबर.'
- 'आज बर्याच दिवसांनी गप्पा मारून खूप मजा आली! भावजी/वहिनी असते/असत्या, तर आणखी मजा आली असती. भावजींना/वहिनींना सांगा, आठवण काढली होती म्हणून.'
ही वाक्ये आपण किती सहजगत्या बोलून जातो!
खरेच, हा वाक्यसंच वाढवायला काय हरकत आहे? विचार करतोय.
- पंडित गागाभट्ट.
अक्षयभौ, मी केवळ आपल्याकडे स्त्रीने काहीही झाले तरी सावरून घ्यायचे, अन्याय सहन करायचा, मार खायचा पण नेहमी नवर्याचेच ऐकायचे इतकेच नव्हे तर त्याचे उदात्तीकरण करायचे असे संस्कार परंपरेने चालत आलेले आहेत आणि त्याचा पाश जीवघेणा असतो. माझ्या अंदाजाने, त्या बाईने केवळ याच भावनेपोटी नवर्याच्या या असल्या संतापजनक कृत्याचे समर्थन / उदात्तीकरण केले असावे असे वाटले. त्या परंपरेच्या पाशाला / जोखडाला मी रेजिमेंटेशन असे म्हणले. शिवाय इथे शोषित म्हणजे ती स्त्री आहे.
बिपिन कार्यकर्ते
इतरवेळी दोन खोल्यांमध्ये काहीच मोकळीक न मिळणारा पुरूष हाही एक शोषितच आहे. तेव्हा शोषणाच्या अंगाने या किश्श्याकडे पाहणे योग्य वाटत नाही.
त्या पुरुषाचे व त्याच्या पत्नीच्या लैंगिक संबंधांविषयी काहीच माहिती नसल्याने त्याविषयी काहीच सांगता येत नाही. या स्त्रीच्या बाहेरील पवित्र्यावरून काहीच सांगता येत नाही. जगासमोर नाचक्की न होऊ देण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहता येईल.
''आमची मानसं पुरुष हायेत म्हटलं! ''
यावर आता काय डोंबल प्रतिक्रिया लिहिणार..."पुरुषांनी" असे काही केले कि मगच बहुतेक त्यांच्या पुरुषपनाचा प्रत्यय येत असावा... बाकी बहुतेक अशीच प्रवृत्ती शायनी अहुजा किंवा त्या रुचिका प्रकरणातल्या बायकांची असावी का? clinton प्रकरणात हिलरीला राजकारणातील महत्वाकांक्षा होती आणि त्यासाठी कुटुंबशील अशी प्रतिमा हवी असल्याने सार्वजनिकरित्या नवर्याची बाजू घेतली असे वाटले..असो, लेख उत्तम.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
त्या घरातल्या बाईला राग आलाच नसेल असे नाही पण परक्यांसमोर तिने, आम्ही १०५, हे धोरण ठेवले ते योग्यच केले.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
मस्त किस्सा आणि प्रतिसाद. शोषितांपासून स्त्रीमुक्तीकडे गेलेले प्रतिसाद बघून गंमत वाटली...
अशाच प्रकारचा एका सुशिक्षित-उच्चविद्याविभूषित घरात घडलेला किस्सा आठवला. फक्त कुत्र्याऐवजी तेथे पोटची पोरे होती आणि आपल्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून बाईला घरी आणणारी खुद्द बायकोच होती.
असो. कुत्रा सांभाळण्यासाठी आख्खी बाई घरी आणणार्या पुरुषाचे कौतुकही वाटले. ;-) तसेच हा किस्सा आमच्या घरात वाचला जाणार नाही म्हणून मनोमन बरेही वाटले. नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला. :D
प्रतिक्रिया
मस्त!!!!
हाहाहा!!! लै
middle class morality
गप्पा
नक्की काय?
लग्न असो
जोडीदार, प्रतारणा वगैरे...
ब्रेन्वाश
तरीच
गाडी त्याच
मान्यतेपे
हम्म्म... चांगला प्रश्न!
बाया
चार बोटे
अक्षयभौ,
शोषित । अपुर्ण माहिती
नक्कीच,
''आमची
हा हा! एकदम अँटीक्लायमॅक्स!!
अशा
*****************************
किस्सा आवडला
त्या
+१ त्याहून
+२ अधिक
+३
नवरा
हेच्च म्हन्तो...
मस्त किस्सा
नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला.