माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे:
प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते?
डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो. रोहीणी उपग्रह हा १९८० मधे आंतराळात सोडण्याचे आमचे ध्येय होते. मला लागणारे वित्तबळ आणि मनुष्यबळ दिले गेले होते पण अशी अटही होती की १९८० मधे हा उपग्रह आंतराळात जायलाच पाहीजे.
१९७९ च्या ऑंगस्टच्या सुमारास आम्हाला वाटले आमची तयारी झाली आहे. आम्ही लाँचची तयारी केली. प्रक्षेपणाच्या आधी चार मिनिटे संगणक सर्व खातरजमा करत होता आणि एक मिनिट आधी त्याने प्रक्षेपण थांबवले. पण तज्ञांनी सांगीतले की काळजीचे कारण नाही. सर्व गणितांप्रमाणे सर्व काही नीट पार पडेल आणि जास्तीचे इंधन आहेच. म्हणून मी संगणकाला बाजूस करुन (बायपास करून) प्रक्षेपणाची तयारी चालू केली. प्रक्षेपण केले, पहीला टप्पा यशस्वी झाला आणि दुसर्या टप्प्यात गडबड झाली आणि उपग्रह बंगालच्या उपसागरात कोसळला. खूप मोठे अपयश होते ते.
त्या दिवशी पाऊण तासात इस्रोचे प्रमुख संचालक प्रो. सतीश धवन यांनी श्रीहरीकोटासच पत्रकार परीषद बोलावली. स्वतः धवन - इस्त्रोचे नेतृत्वच, जगभरच्या पत्रकारांसमोर उभे राहीले आणि संपूर्ण अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. ते म्हणाले की खूप कष्ट आमच्या माणसांनी (टीमवर्क ) घेतले पण त्यांना अजून तांत्रीक मदतीची अवशक्यता होती. पुढे ते म्हणाले की पुढच्या वर्षी हीच टीम नक्की यशस्वी होवून दाखवेल. वास्तवीक त्या प्रकल्पाची जबाबदारी डायरेक्टर म्हणून माझी होती, पण इस्रो प्रमुख म्हणून त्यांनी ती स्वतःच्या खांद्यावर घेतली.
पुढच्याच वर्षी जुलै १९८० ला आम्ही यशस्वी पद्धतीने उपग्रहाचे प्रक्षेपण केले. संपूर्ण राष्ट्रभर आनंदी आनंद झाला. परत पत्रकार परीषद भरवली. मात्र यावेळेस प्रो. धवन म्हणाले की, "आज तू माध्यमांशी बोलायचेस".
त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.
वाचने
6601
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
असेच म्हणतो
In reply to :) by शितल
धन्यवाद
फील गुड लेख
छान शिकवण मिळाली.
कलाम
कलामांना आपला सलाम!
विकास,
वा..
ग्रेट....
+१
In reply to ग्रेट.... by प्रभाकर पेठकर
कलाम खरोखरच कमाल आहेत!
हेच म्हणतो.
In reply to कलाम खरोखरच कमाल आहेत! by चतुरंग
धन्यवाद