हरिश्चंद्रगडची सफर..अंतिम भाग
भाग १ : http://www.misalpav.com/node/12595
भाग २ : http://www.misalpav.com/node/12627
असं लोळण्यामधे काय सुख असतं ते सांगून नाही कळणार. आजूबाजूला गारवा, वर निळं आकाश, ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज आणि बाकी सगळं शांत...मला तर अश्या झोपेचं इंग्लिशमधे ज्याला ऑबसेशन म्हणतात ते आहे. काही वेळा फ़क्त अश्या झोपेसाठी मी ट्रेकला बाहेर पडलो आहे...असो. अजून अर्धा तास चालल्यावर शेवटी मुक्कामाची जागा आली.
पण तिथे आधीच इतर लोकांनी आपापली रहायची सोय करून घेतली होती. अजून सूर्यास्त व्ह्यायला तास दीड तास वेळ होता. तोपर्यंत आम्ही एका झाडाखाली मस्तपणे दिली ताणून.खरं तर रात्रीच्या मुक्कामाची जागा शोधायला हवी होती कारण मंदिरातल्या जागा तर गेल्या होत्याच पण गणेशगुहा आणि इतर ठिकाणी पण रहायला जागा नव्हती. मारो गोली...
सूर्यास्ताची वेळ जवळ आली, आम्ही लवकरच कोकणकड्याकडे निघालो.बरंच ऐकलं होतं आधी कोकणकड्याबद्दल. कल्पना करा, एखाद्या बाल्कनी मधे तुम्ही उभे आहात आणी खाली चार हजार फुटांवरचं द्रुश्य दिसतंय. हो..चार हजार फुटांचा ड्रॉप आहे तो.
त्यातले अंदाजे पहिले दोन हजार फूट तर स्ट्रेट ड्रॉप आहे. आणि असाच काही विचार करत करत आम्ही शेवटी एकदाचे कोकणकड्यापाशी आलो. असा भन्नाट प्रकार मी आयुष्यात कधी पाहिला नाही आणि नंतर कधी पहायला मिळेल असं वाटत नाही. यासम हाच...जणू एखादी मोठी पायरी आहे ती. पण ती पायरी उतरणे किंवा चढणे फ़क्त वामनालाच शक्य आहे. आपल्यासारख्या मर्त्य मानवांचं ते काम नाही. कोकणकड्याचं वर्णन करणं माझ्यासारख्या शब्ददरिद्री माणसाला शक्य नाही.
डावी - उजवीकडे उत्ताल कडे...
आणि मध्ये कड्याचा मुख्य भाग...नागाच्या फ़ण्यासारखा.( ओव्हरहॅंग)
त्यामुळे खाली बघायचा एकच मार्ग. सरळ पोटावर पालथं पडायचं आणि खाली तळात पहायचं.किती वेळ पहाल? डोळे फिरतात. ते प्रचंड आणि रूद्रभीषण द्रुश्य पाहताना मनाला आनंद सहन होत नाही आणि कसलीतरी अनामिक भिती देखील दाटून येते.
शेवटी आम्ही सूर्यास्त पाहून परत निघालो. रहायच्या सगळ्या जागा लोकांनी आधीच व्यापून टाकल्यामुळे आम्ही तुकारामच्या झोपडीबाहेरच झोपायचं ठरवलं. तुकाराम सीझन मध्ये गडावरच रहायला असतो. आमच्या सारख्या ट्रेकर्स लोकांना तो मोठाच आधार आहे. त्याच्याकडे मस्त मुगाची खिचडी खाल्ली आणि दिली ताणून.
दुसर्या दिवशी सकाळी केदारेश्वराच्या गुहेत शंकराच्या पिंडीला प्रदक्षिणा घालायला गेलो.
ती एक कसरतच आहे.कष्टाशिवाय देव दर्शन देत नाही म्हणजे काय ह्याचा हा चांगलाच अनुभव आहे. पाण्यात उतरल्यावर भिजलेला भाग एकदम बधीर होवून जातो. एक प्रदक्षिणा घालणं म्हणजे अवघड काम होवून बसतं. तरी आम्ही ११ प्रदक्षिणा घातल्या. अशी घोर सेवा पार पाडून आम्ही बाहेर आलो आणि जरा इकडे तिकडे भटकलो. नंतर तुकाराम कडे चहा पिला. नंतर खरं तर रोहिदास शिखरावर जायचं होतं. पण खरं तर आम्ही पूर्ण पेकाटलो होतो. त्यामुळे तो बेत रहित करावा लागला. अर्थात त्याचा दोष एकमेकांवर ढकलण्यात आम्ही अजिबात कसूर केली नाही.
एव्हाना दुपारची वेळ झाली होती त्यामुळे आम्ही निघायचा विचार केला. अर्थात लवकर निघाल्यामुळे आम्ही एकदम निवांत उतरायचा विचार केला.
नंतर सांगण्यासारखं काही खास नाही. रोहिदास शिखरावर न जाणं ही आम्ही घोडचूक केली हे नंतर लक्षात आलं कारण ते महाराष्ट्रा मधलं दुसर्या क्रमांकाचं शिखर आहे (चूक भूल देणे घेणे) हे नंतर कळालं.
खुबी फाट्याला परत पोचेपर्यन्त पायाची लाकडं झाली होती. एस. टी. ची साधारण अर्धा तास वाट पाहिल्यावर आम्ही पुण्याच्या मार्गाला लागलो. गाडीत बसल्यावर सुद्धा कितीतरी वेळा मी मागे वळून वळून गडाकडे पहात होतो.....

प्रतिक्रिया
कोकणकड्या
व्वा
अभिनंदन!
वा, वा मस्त!
भन्नाट!!!
लेख मस्त झालाय.. फोटो एक नंबर...
धन्यवाद
मस्त रे खुळ्या!
रोहिदास नव्हे तारामती !
सर्वच फोटो
हा ट्रेक आणि
माफी...
सुंदर
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे
फोटो छान आहेत
re:
शेवटच्या फोटोतील मंदीर..