Skip to main content

आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया

लेखक हैयो हैयैयो यांनी शुक्रवार, 11/06/2010 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया मित्रहो, चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्‍यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत. आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या. धन्यवाद. हैयो हैयैयो.

वाचने 5698
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

हा हे उत्तम! अभिनंदन. जाताजाता: आंतरराष्ट्रीय पब्लीकच्या नाड्या कोणत्या मुनिंनी लिहल्या? आणी हो, चेकोस्लोव्हाकिया देश आता नाही. आता आहेत ते चेक रिपब्लीक व स्लोव्हाकिया असे दोन स्वतंत्र देश. ------------------------------------------- युरो कमवा, डॉलर कमवा, दिनार कमवा, अजुन कुठले परकीय ते ते कमवा पण रुपये, पैसे वापरणार्‍यांना गंडा घालू नका, कसे?

अभिनंदन आणि शुभेच्छा हाच लेखाचे मटामध्ये कसे आले असते? १. अस्सल भारतीय नाडीची परदेशावरील स्वारी २. नाडीची उपयुक्तता परकीयांनाही मान्य ३. नाडी हेच सत्य, आता परदेशाकडुन ही स्वीकारले गेले.

आल्यावर वृत्तांत कळेलच. अवांतर- अशा दौर्‍याचा खर्च कसा काय केला जातो? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अवांतर- अशा दौर्‍याचा खर्च कसा काय केला जातो?
कायच्याकाय पन इचारता का हो काका? नाड्या कशा करता असतात मग? -Nile

परीषदेचा दुवा मिळेल का कुठे?

श्री. शशिकांत ओक यांचे अभिनंदन. :) --अवलिया

छान. एक उत्सुकता म्हणून दौरा / प्रवास वगैरेंचा वृत्तांत वाचायला आवडेल. बिपिन कार्यकर्ते

जर ती तामिळी कुटलिपी ओक साहेबांना समजत होती तर त्यानी इथे त्याचा कधी वापर केला नाही.कित्येक मिपाकर आपल्या नाड्या बघण्यास उत्सुक असताना त्याची ओक साहेबानी योग्य ती दखल घेतली नाही असे खेदाने नमुद करावेसे वाटते. बाकी ओक साहेबाचे हार्दिक अभिनंदन. वेताळ

In reply to by वेताळ

वेताळाशी १००% सहमत. अनेक मिपाकरांनी वारंवार सागुनही ओक साहेबांनी त्यांना केवळ वाटाण्याच्या अक्षताच लावल्या. असो त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा आणि परदेश वारी बद्दल हार्दिक अभिनंदन .

In reply to by गणपा

ओककाका ऑनसाईट गेलेत. रुपयेवाला भारतीय ग्राहक आणि डॉलरवाला/युरोवाला ग्राहक ह्यात फरक असणारच ना !!! ;) ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

In reply to by वेताळ

तमिळ कूटलिपी. नैयो, श्री. ओक सरांनी तमिळ कूटलिपी आपणास कळते असे कधी कोठे म्हटल्याचे मला आठवत नाही. आपण आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ पूरक माहिती द्याल काय? :D हैयो हैयैयो!

In reply to by हैयो हैयैयो

छ्या... चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्‍यावर त्या देशी रवाना झाले आहेत. चेकोस्लोव्हाकिया ला मग कशा करिता ते गेले आहेत? त्याना तामिळग्रंथ जर वाचता येत नसतील तर ते तेथे काय कुटणार आहेत? नेमका त्याचा उद्देश काय आहे? चेकोस्लोव्हाकियातील लोकाना नाडीग्रंथ असतात हे कोणी सांगितले?अहो अजुन भारतातच नाडीग्रंथाबद्दल लोकाना माहिती कमी आहे.तुम्ही एकदम अपुरी माहिती दिली आहे. एकादा ग्रंथ वाचता येत नसेल,त्याची भाषा कळत नसेल तर नुसत्या एकिव माहितीवर त्यावर किर्तन देण्यात काय अर्थ आहे. वेताळ

In reply to by वेताळ

कित्येक मिपाकर आपल्या नाड्या बघण्यास उत्सुक असताना त्याची ओक साहेबानी योग्य ती दखल घेतली नाही असे खेदाने नमुद करावेसे वाटते.
ते आधी माणसाची पात्रता बघुन मग नाडी बघत असावेत. ओक साहेब तुमचे कार्य खरच कौतुकास्पद आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हाण्ण त्येजायला.. आम्हाला आमची पात्रता दाखवुन दिल्या बदाल पराकुमाराचे मानावे तेवढे आभार कमीच. ;)

In reply to by गणपा

आम्हाला आमची पात्रता दाखवुन दिल्या बदाल पराकुमाराचे मानावे तेवढे आभार कमीच.
आभार मानण्यापेक्षा आपल्या पुरातन संस्कृतीवर, ऋषी-मुनींवर विश्वास ठेवा, मला आभार आपोआप पोचतील गणपाजी :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>आभार मानण्यापेक्षा आपल्या पुरातन संस्कृतीवर, ऋषी-मुनींवर विश्वास ठेवा. अव तेच तर म्हनल ना आम्ही, की आम्हा अनाड्यांच्या नाड्या दावा उकलुन. आमी बी ठिवला अस्ता की इस्वास, पर त्ये बोललं इत जावा तिथ जावा. आता त्ये या ईशयातल इतक जान्कार हाईत तर आम्ची काहुन नाडी नाय धुंडाळी व त्यांनी. तुंमचं बी काय बाय शिक्षान झालाय का या इशयात्ल? असन तर मदर कारा कि राव.

In reply to by गणपा

असन तर मदर कारा कि राव. तुला कसं काय मदर करनार बाला... तु तर बाप्या.. ! --अवलिया

In reply to by अवलिया

शि षि शि ... एखाद्या धाग्यावर असे घाणेरडे अवांतर प्रतिसाद आले .. धाग्याचे(प्रतिसादांचे नव्हे ;) ) आयुष्य धोक्यात दिसते ;)

In reply to by अवलिया

नाना, काही संबधित माहीती मिळाली http://www.malepregnancy.com/ http://www.malepregnancy.com/CNN/ http://en.wikipedia.org/wiki/Male_pregnancy पुरुष गर्भ धारण करण्याबाबतीची माहीती फारशी उत्साहवर्धक नाही. अजुन काही काळ वाट पहायला लागेल. असो. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

In reply to by गणपा

नान्या तेच लिहिणार होतो मी आत्ता =)) =))
तुंमचं बी काय बाय शिक्षान झालाय का या इशयात्ल?
नाही ह्या विषयात शिक्षण झालेले नाही पण ह्या विषयावर ते जे काही सांगतात त्यावर श्रद्धा आहे. तुमची टिंगल टवाळी चालु द्या.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>तुमची टिंगल टवाळी चालु द्या.... अत्ता वो, आमी कुनाची टिंगल केली? असो आता संपादकांनी दांडुका उगारायच्या आत पळतो.

मोकळ्या मनाने ओकसाहेबांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

(आमचंही मन सध्या मोकळ्च असल्याने) ओकसाहेबांचे अभिनंदन. बिकांची सहमत...एक उत्सुकता म्हणून वृतांत वाचायला आवडेल. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

योग्य तीच नाडी सापडण्यास आणि सोडण्यास माझ्या हार्दीक शुभेच्छा rer *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

अरे कोणीतरी या जयपालची नाडी बघा रे. काय बरोबर चित्रे लावतो तो. आधी वास्तूशास्त्र, नंतर योगा आता ही नाडी. छे. पाश्चात्य देशांचे भारतीयकरण लवकरच होणार. बाकी ओकसरांचे अभिनंदन. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

ओकसाहेबांचे अभिनंदन ! आता इंटरनॅशनल स्टार झालात, तेव्हा ओळख ठेवा, साहेब ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हे खरे आहे का??? मग आता भारताचे चांगले दीवस आले म्हणायच की विदेशातल्यांचे खराब देवस आले??? -नाडी हातात घेउन बसणारा

अभिनंदन!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

ह्या परिषदेच्या निमित्ताने एके काळी तंजावरच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या, ब्रिटिशांनी भारतात राज्य करत असताना ज्या ग्रंथप्रकारात रुची दर्शविली त्या नाडीग्रंथांवर संशोधक वृत्तीतून अधिक प्रकाश पडावा व त्यासंदर्भातील विज्ञानाधिष्ठित आणि साहित्यिक संशोधनाला पुष्टी मिळावी हीच शुभेच्छा! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/