मंडळी बोलल्याप्रमाणे बिलंदरचा अंतीम भाग तुमच्या हाती सोपवतोय. अनेकांनी अंदाज बांधले होते, बहुतेकांचा अंदाज बरोबरच होता फक्त सबळ रिझनिंग मिळत नव्हते. या कथेने मला विलक्षण आनंद, समाधान दिलेय. पुन्हा एकदा मनस्वी आभार!
मुळात लिहायला सुरूवात केली तेव्हा माझ्या डोळ्यापुढे गुरुनाथ नाईकांचा कॅप्टन दीप होता. मला मिलीट्रीचे खुप आकर्षण आहे त्यामुळे असेल कदाचीत. पण नेमके त्याच दरम्यान सलमान खानचा वाँटेड आला आणि मला कथानकात पुर्णपणे बदल करावा लागला. शिर्याचे पात्र पुर्णपणे बदलावे लागले. नवा शिर्या उभा करताना कसे कोण जाणे पण आपोआपच त्यात माझ्या एका आवडत्या हिरोचे गुण उतरत गेले. कदाचीत या क्षेत्रातील माझे आवडते लेखन कै. सुहास शिरवळकर यांचा माझ्या लेखनावर असलेला पगडा कारणीभुत असेल, पण नवा शिर्या घडवताना लक्षात आले की आपण आणखी एका फिरोज इराणीला जन्माला घालतोय. जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
सस्नेह,
विशाल कुलकर्णी
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
कधी नव्हे इतकी ह्या भागाची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो.
माझा अंदाज थोडाफार बरोबर आलाच.
तुमची भाषाशैली आणि प्रसंग खुलविण्याचे कसब वाखाणण्याजोगे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
मी सुद्धा desparate होऊन या शेवटाची वाट पहात होतो..
मला मात्र नव्हते वाटले की सतिश हा मेन व्हिलन असेल..
पण कामिनी/रोहित्/मोमीन/इरफान यांना उगाचच जिवंत ठेवले (ते पण शिर्या कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी) असे वाटले..तेवढा भाग जरा उगाच टाकल्यासारखा वाटला..
पण "बिलंदर" मात्र अप्रतिम ... परत एकदा सगळे भाग एकदम वाचणार आहे..
जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील.
नक्किच..तुमच्या मानसपुत्राचे स्वागत आहे..
खादाडमाऊ
पण कामिनी/रोहित्/मोमीन/इरफान यांना उगाचच जिवंत ठेवले (ते पण शिर्या कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी) असे वाटले..तेवढा भाग जरा उगाच टाकल्यासारखा वाटला..
सहमत आहे...
पण "बिलंदर" मात्र अप्रतिम ...
वादच नाही.
जर आपला आशिर्वाद लाभला तर माझा हा नवा मानसपुत्र असाच धुमाकूळ घालीत राहील.
नक्किच..तुमच्या मानसपुत्राचे स्वागत आहे..
खरच मनापासून स्वागत..... पण या तुमच्या मानसपुत्रा बरोबर एकटेच घरात खेळत बसू नका.... त्याला म्हटल्याप्रमाणे धुमाकूळ घालायला बाहेर सोडा....
आंबोळी
बोले तो एकदम झक्कास्स !! :)
अंदाज हाच होता की सत्या जिवंत आहे आणी काहीतरी खळबळ माजवणारा शेवट असेन !!
शेवट मस्त रंगवलाये...
:)
अजुनही अशा कथा वाचायाला आवडतील...
शिरोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
खूपच छान कथा. =D> =D> मला खरच अंदाज आला नव्हता...असेच लिहित राहा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आधी तुमची राँग नंबर वाचली आणि त्यावरच्या लिंक वरून बिलंदर वाचली . खूपच छान !!!
राँग नंबर वर दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे तुम्ही फिरोज जल्माला घातलेला आहे :)
आणि मी फिरोज ची पंखी आहे. :P नवीन फिरोज ला भेटून पण खूप मस्त वाटत अहे.
मंदार पटवर्धन पण येतो का बघा न परत !!!!! ;)
प्रतिक्रिया
मंडळी
कधी नव्हे
धन्यवाद
सही....
वा!!
मस्त केला
अप्रतिम..
अप्रतिम
झकास !!! वाट
लै भारी
बोले तो
खूपच छान
धन्यवाद
मस्त
आधी तुमची राँग नंबर वाचली..
धन्यवाद काव्यान्जलि ! प्रयत्न