कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही.
फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास. फुलामधले सुगंधीपरागकण श्वासोच्छ्वासावाटे घ्राणेंद्रियात विशिष्ट जागी जातात. त्यामुळे मेंदुमधील विशिष्ट जागेला काही संवेदना पोहोचतात. त्यामुळे आपल्याला वास येतो. पुर्वसंस्कारांमुळे विशिष्ट वास चांगला आणि वाईट असं वर्गीकरण होवुन आपल्यास आनंद वा त्रास होतो.. इत्यादी कवतिकं हवीत कशाला ? आपण सामान्य माणसं. आपली बुद्धि येवढी नाही. येवढा विचार करेपर्यंत हातातले फुल सुकुन जाणार, अत्तर उडुन जाणार. नकोच तो वाह्यातपणा.
तर मुद्दा होता गाण्याचा. काल संध्याकाळी फिरत फिरत येत असतांना अचानक स्वर आले.
"प्यार हुआ इक़रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल"
खरंय. प्रेम कुणावर जडावं याचा काही नेम नसतो. आजुबाजुला अनेक सुंदर सुंदर चेहरे असतात, पण सगळेच आवडतात असं नाही. आवडलेला चेहरा रुढार्थाने सुंदर असतोच असे नाही. मनाला काय आवडेल हे सांगणे खुप मुश्किल असते. कित्येक वेळा मनाला आवडलेले मुखातुन बाहेर पडेलच असे नाही. मग मुक प्रेमाचा खेळ चालतो आणि अप्राप्यतेच्या ज्ञानाबरोबर संपुन जातो. नंतर कधी तरी कळतं कदाचित जमलं असतं. पण उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रेम जडणं सोपं असतं आणि ते सांगणं मात्र खुप अवघड असतं. खरं प्रेम अबोल असतं असं म्हणतात. डोळ्यांनी डोळयांची भाषा, चेहरा समजतो असं म्हणतात. पण काय असेल ते असो. काही जण नशीबवान असतात. त्यांचं प्रेम जडतं. समोरच्याला सांगितलं पण जातं. आणि काय गंमत की समोरुन चक्क होकार सुद्धा येतो. पण इथंच कुठंतरी भय सुद्धा वाढायला लागतं. भय कसलं असतं हे ? अज्ञाताचं? पण तसा तर येणारा प्रत्येक क्षण अज्ञात असतो. तरी आपण फार भय बाळगत नाही. मग प्रेमात पडलेल्यालाच का भय वाटावे ? मला तरी अजुन नीटसं उत्तर मिळालेले नाही. पण पुढचे बोल ते भय सांगुन गेले
"कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ".
खरंच ! एकत्र रहायचे, जीवन जगायचे तर ठरवले आहे. पण पुढे काय कसे होईल माहित नाही, घरचे परवानगी देतील का? समाज मानेल का ? आणि जर घरच्यांनी परवानगी नाही दिली तर काय करायचे? पळुन जायचे ? मग आजवर त्यांच्या असलेल्या ऋणानुबंधांचे काय? त्यांनी काही स्वप्न पाहिलेली असतील, कदाचित त्यांना आपल्यापेक्षा भल्याबु-याची अधिक जाण असेल. पण आपण तर एकत्र रहायचे ठरवले आहे. त्याचे काय? एकमेकांना वचन देउन बसलो आहे. त्याचे काय ? कुठे घेवुन जाणार आहे जीवन आपल्याला ? आयुष्याचे ध्येय काय ? एक ना अनेक प्रश्न केवळ त्या एका प्रेमामुळे उभे राहिले आहेत.
पण भय केवळ इतकेच नाही. मनापासुन ज्याच्यावर प्रेम केले. आपल्या सुखदुःखाचा साथीदार ज्याला मानले, आयुष्याचा पुढला काल ज्याच्याबरोबर व्यतीत करायचे ठरवले तो आणि आपण मिळुन चालत असलेला रस्ता, वाट, त्या रस्त्याने जे एकसुर एकतानतेने निर्व्याज बंधनाचे गीत गात आहोत ते तर बदलणार नाही? न जाणो रस्त्यातल्या मोहमयी वाटांचे आकर्षण वाटुन जोडीदार आपल्याला सोडुन दुस-याच वाटेने निघुन जाणार तर नाही? भय सुखाचे किंवा दुःखाचे नाही, तर भय आहे एकाकी पडण्याचे, एकटेपणाचे. जे आयुष्य एकत्रित व्यतीत करायचे ठरवले आहे ते अचानक दोन रस्त्यात विभागले तर जाणार नाही ? मग समोरच्याला बजावुन सांगितले जाते. प्रेम तुटले तर तो प्रेमिकांचा साथीदार चंद्र, तो चांद तो सुद्धा म्लान होईल. त्याला सुद्धा हे आवडणार नाही, तो चमकणारच नाही.
कहो कि अपनी प्रीत का, गीत न बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का, मीत न बदलेगा कभी
प्यार जो टूटा, साथ जो छूटा चाँद न चमकेगा कभी
पण ही अवस्था फार काळ टिकत नाही. दोघांनाही परस्परांवर विश्वास आहे. परस्परांबद्दल प्रेम आहे. आपले प्रेम चुकीच्या स्थानी नाही याची दोघांनाही जाणीव आहे. मग एकमेकांना खात्रीपुर्वक सांगतात की आपली कहाणी ही आता केवळ आपली कहाणी नाही. ही केवळ तुझी माझी प्रेम कथा नाही. तर ही कथा आता सगळ्या जगाची आहे. आणि ती जगाला सांगणार आहे ही रात्र. आपल्या दशदिशांमधल्या अंधकाराला दुर सारत आशेचा किरण पसरवत रात्र आपली कथा जगाला ऐकवेल. आपल्या प्रेमाच्या पावलांवर पाउल टाकत येणारी पिढी परस्परांवर प्रेम विश्वास दर्शवत त्याच पद्धतीने प्रेमाचा अंगिकार करेल आणि आयुष्याच्या वाटेवर सुखदुःखांचा सामना करत, वाटचाल करेल. आणि मग मी नसेल, तु नसेल पण तुझ्या माझ्या प्रेमाच्या खुणा या पृथ्वीवर वास करतील. जीवन चालुच राहिल.
रातों दसों दिशाओं से, कहेंगी अपनी कहानीयाँ
प्रीत हमारे प्यार की, दोहराएंगी जवानीयाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे फिर भी रहेंगी निशानीयाँ
प्रेमामधला दुर्दम्य आशावाद, भयार्तता पण तरीही न ढळलेला विश्वास, आणि सुख येवो दुःख येवो साथ सोडायची नाही ही परस्परांना दिलेली वचने, आणि जगाचे राहणारे सातत्य जपण्याची धडपड.
पण ... आता जग बदलले आहे. तो आणि ती पुर्वीसारखे राहिले नाहीत. आता ध्येय आधी ठरवुन त्यानुसार जोडीदार निवडला जातो. ध्येयापुर्तीला बाधा ठरणारे जोडीदार मेलेल्या उंदराला धरुन बाजुला फेकावे त्याप्रमाणे फेकुन दिले जातात, अडगळीत टाकले जातात. प्रेम, बांधिलकी या शब्दांना केवळ शब्दकोशात स्थान आहे. हे जग दुस-यासाठी त्रास सहन करणे हा मुर्खपणा समजते. मला याची कल्पना आहे. माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत " प्यार हुआ इकरार हुआ है... "
याद्या
8205
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!
सल्ल्याबद
In reply to वाह! by सहज
क्या बात
मनातील
प्यार हुवा इकरार हुवा
खरच की धन्यु हां!
In reply to प्यार हुवा इकरार हुवा by सन्जोप राव
वाहवा!
In reply to खरच की धन्यु हां! by सहज
अच्छा :-)
In reply to वाहवा! by सन्जोप राव
वैयक्तिकर
In reply to अच्छा :-) by सहज
येथे
In reply to वैयक्तिकर by अवलिया
यात
In reply to प्यार हुवा इकरार हुवा by सन्जोप राव
वाहवा!
In reply to यात by चित्रा
वा वा
In reply to वाहवा! by सन्जोप राव
कसे रे असे
नाना!
नाना, लै भारी
एक सत्य
हाण्ण
In reply to एक सत्य by विजुभाऊ
लहाण मुलांचे निरागस प्रश्ण म्हणजे .
In reply to हाण्ण by टारझन
छान
गाण्याचं रसग्रहण छानच..
In reply to छान by राजेश घासकडवी
ती तीन
In reply to गाण्याचं रसग्रहण छानच.. by योगी९००
तिसरा
In reply to ती तीन by शिल्पा ब
"ती मुलगी" रितू कपूर...!!
In reply to ती तीन by शिल्पा ब
"ती मुलगी" रितू कपूर...!!
In reply to ती तीन by शिल्पा ब
लेख आवडला.
नानाचा लेख
लै भारी रे
छान लिहिलय
फार सुंदर...!!!
अजून एक राहिलं
In reply to फार सुंदर...!!! by इन्द्र्राज पवार
बंदा रुपया...!!!
In reply to अजून एक राहिलं by एक
मस्तच रे
लेख
अश्वत्थामा
मस्त रे नान्या......खुपच छान लिहलेस...
छान
वा ! वा !! लेख
सुंदर..
सुंदर Romantic !!
छान गाणे
सर्व
सर्व
In reply to सर्व by अवलिया
मराठी
In reply to सर्व by II विकास II
मराठी
In reply to मराठी by टारझन
अप्रतिम लेख..