✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विलोभनीय नायगरा!

म
मीली यांनी
Fri, 06/04/2010 - 03:25  ·  लेख
लेख
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना! गुगल रावांकडून पण माहिती गोळा करून झाली.GPS पण सज्ज झाला आणि आम्ही निघालो. खरे गाडीत लांब जायचे असल्यास मजा येते पण ३,४ तास गाडी सतत चालवल्याने सवय नसणार्याला दमायला होते.मध्ये १,२ वेळा थांबून पोहोचलो एकदाचो! दुरूनच नायगरा नदी दिसत होती ,मुलगा पण माहिती देत होता lake Ontorio आहे म्हणून .खूप थकल्यासारखे वाटत होते पण फ्रेश होवून लगेच जायचे ठरले. म्हणून हॉटेल वर सामान टाकले आणि थोड्यावेळात निघालो . मस्त परिसर व थंड हवेने थकवा पळाला.पर्यटकांपैकी बहुतेक ८०% भारतीय होते. प्रचंड असा जलप्रपात पाहताना मन अंतर्मुख होवून गेले.सगळेजण हे असीम दृश्य कॅमेर्यात टिपायचा प्रयत्न करत होते त्यात मीही सामील झाली. दुसर्यादिवशी हॉटेलवर ब्रेकफास्ट करून "Maid of the Mist " च्या राईड च्या रांगेत उभे राहिलो.१ तासाने बोटीत चढल्यावर मिळेल तिथे उभे राहिलो. सहस्र जलधारा कोसळताना जवळून पाहताना खूप मस्त वाटत होते. पटापट फोटो काढले जात होते.हळू हळू बोट धबधब्याच्या जवळ जावून पोहोचली. त्यानंतर तिथेच असलेल्या Imax Theator मध्ये नायगर्यावर माहितीपट पाहिला.रौद्र तरीही विलोभनीय असे नायगारा दर्शन त्यात झाले. त्यानंतर तिथेच दुपारचे खाणे झाले वेजी रोल!वेज मध्ये जास्त पर्याय नसल्याने काय खावे असा प्रश्न न्हवता! मग Cave of the winds ह्या राईड साठी निघालो तर भली मोठी रंग होती.उन पण खूप होते पण सगळे जण उभे होते.धबधब्याच्या अगदी जवळ जाता येते ना ! त्यासाठी तिकीट दाखवून पिवळा रेनकोट आणि चपला घेवून आम्ही पण रांगेत उभे राहिलो.तब्बल अडीच तासाने आम्ही लिफ्ट ने खाली आलो आणि धबधब्याच्या दिशेने निघालो. लाकडी डेक वर चढून लोक ग्रुप मध्ये धबधब्याच्या तुषारांमध्ये मनमुराद भिजत होते. मुलाने पण मनसोक्त भिजून घेतले.तो हलायलाच तयार न्हवता.थोड्या वेळाने हॉर्स शु पॉईंट कडे निघालो. त्यानंतर हॉटेल वर जावून थोडा आराम केला जवळ हॉटेल असल्याने हा फायदा झाला. कॉफी मेकर मध्ये पाणी तापवून टी बॅग्ज ,मिल्क पावडर ,साखर टाकून मस्त चहा बनवून पिला तेव्हा कुठे बरे वाटले. रात्री फटाक्यांची आतिषबाजी पहायची असल्याने जवळच असलेल्या "पंजाबी हट"मध्ये जेवायचे ठरले.तिथे गेलो तर धर्मेंद्र बरोबर मालकाचा फोटो लावला होता ! जेवण पण छान होते.जेवण करून परत नायगरा पार्क मध्ये गेलो, खूप गर्दी झाली होती. कॅनडा चे रंगीत दिवे नायगर्याला रंगीत साज चढवत होते. मग फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली.मला छान जागा मिळाली असल्याने भरपूर फोटो टिपता आले. नायगर्याला मनात साठवून परत निघालो.निसर्गनिर्मित विशाल ,विराट असे पाहिले कि आपण सूक्ष्म होवून जातो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8944 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

मोहक प्रकाशचित्रे

बेसनलाडू
Fri, 06/04/2010 - 04:23 नवीन
(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

फोटो छान

शिल्पा ब
Fri, 06/04/2010 - 06:40 नवीन
फोटो छान आहेत...फटाक्यांच्या अतिश्बाजीचे फोटो जरा जास्तच टाकले... :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरे आहे !

मीली
Fri, 06/04/2010 - 07:40 नवीन
अगं खरेच जास्त टाकले गेलेत फोटो.कोणता फोटो टाकू विचार करताना सगळे फोटो मी ,मी म्हणायला लागले. :) स्क्रोल बार वर झरझर खाली गेले कि मस्त दिसेल असे वाटले! मीली
  • Log in or register to post comments

वर्णन आणि

सुप्रिया
Fri, 06/04/2010 - 11:22 नवीन
वर्णन आणि फोटो क्लासच् ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्क्रोल बार वर झरझर खाली करत गेले आणि खरच मस्त वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

स्क्रोल

टिउ
Sat, 06/05/2010 - 02:01 नवीन
स्क्रोल बार वर झरझर खाली गेले कि मस्त दिसेल असे वाटले!
+१ असेच बघितले...नंतर तुमचा प्रतिसाद वाचला! :) बाकी ते इंद्रधनुष्य हमखास दिसतंच नेहमी...फोटो छान आले आहेत. एक दोन फोटो काढुन टाकले तरी चालतील असं वाटतं (कोपर्‍यात रेनकोट आणि हात आलेत ते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

हा आमचा

टारझन
Fri, 06/04/2010 - 08:36 नवीन
हा आमचा नायगरा , ह्याच्यावर आमचा भारी जीव , असे आमचे एक काका म्हणून गेलेत ते उगाच नाही ;) पण धबधब्याचे फोटोज एकदम धबधब्या प्रमाणे बदाबद टाकलेत काय ? ;) - (बदाबद प्रतिक्रीया टाकु) टायगरा
  • Log in or register to post comments

छान फोटो

विनायक पाचलग
Fri, 06/04/2010 - 09:28 नवीन
फोटो मस्तच आहेत हे फोटो पाहुन मला कणेकरांच्या एका लेखाची आठवण झाली.. असो कोणाला कोण आठवते तर कोणाला कोण.... विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी परवा

Pain
Fri, 06/04/2010 - 08:54 नवीन
मी परवा जातोय इथे. माझ्याकडे डिजीकॅम नाहीये. तुमचे फोटो फारच सुन्दर आहेत. कोणी विचारले तर हेच दाखवतो ;) काही सूचना? (कॅमेरा घेण्याव्यतिरिक्त!)
  • Log in or register to post comments

ऑनलाईन तिकिटे बुक करता आली तर पहा

चतुरंग
Fri, 06/04/2010 - 09:15 नवीन
एकदम सगळ्या राईड्सची करुन ठेवा निदान सुरुवातीचा रांगेतला वेळ वाचतो. http://www.niagarafallsstatepark.com/PassToTheFalls.aspx हॉटेल बुक करत असाल तर चुकूनही भारतीय माणसाचे मॉटेल बुक करु नका (माझा एक अनुभव फार वाईट आहे). मोठ्या हॉटेलच्या सोयी अतिशय उत्तम असतात. शक्यतोवर फॉल्सच्या जवळचे बघा थोडे महाग जाते पण जाण्यायेण्यातला वेळ वाचतो शिवाय विश्रांती घेणे सोयीचे पडते. कॅनेडिअन साईडने बघणे शक्य असेल तर तेही जरुर करा. (तुम्हाला कॅनडात वीसा लागतो की नाही त्याची नीट चौक्शी करुन जाणे) अवांतर - ह्या ट्रिपसाठी म्हणून डिजीकॅम घ्या. चुटपुट लागून राहणार नाही. हल्ली क्यामेरे अगदी स्वस्त झालेत.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

चतुरंग

Pain
Tue, 06/08/2010 - 09:55 नवीन
आपुलकीने सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद ! कालच परत आलो. गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे रांगेत वेळ वाया गेला नाही. भारतीय माणसाचे मोटेल- मी स्वतः एका गुज्जुच्या मोटेलमधे काम करायचो. एक्सपायरी डेट गेलेले पदार्थ, दूधात पाणी घालणे, कॉफीत, ज्युसमधील भेसळ हे सगळ पाहिलय. कॅनेडिअन साईडने शक्य नाही..व्हिसा नाहीये. डिजीकॅमः खायचे वांधे झालेत. डिजीकॅम कुठून आणु :S ज्यांनी नेले होते त्यांच्याकडे होता...काढले थोडे. नाहीतर या धाग्यावर आहेतच ! अवांतरः तुम्ही डकवलेला फोटु "अमेरिकन फॉल्स चा आहे. नायगाराच्या अलिकडला.. (तेथील पाट्या आणि गाईड्च्या म्हणण्याप्रमाणे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नायगरा

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 20:43 नवीन
फॉल्सचे दोन भाग झालेत कारण दोन देशांची सीमा नायगरा नदीला विभागते, फॉल्सचा एक भाग अमेरिकेच्या बाजूला आणि दुसरा कॅनडाच्या बाजूला. मी डकवलेला फोटो कॅनडामधून काढलेला 'अमेरिकन नायगराचा' आहे. (नायगराच्या अलिकडला हे तुमचे म्हणणे समजले नाही.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

तिथे २ वेगवेगळे धबधबे आहेत

Pain
Tue, 06/08/2010 - 23:00 नवीन
अमेरिका- कॅनडाच्या सीमेवर आहे तो नायगरा, घोड्याच्या नालासारखा आकार असलेला, मोठा. आणि तुम्ही फोटो डकवलाय त्याला अमेरिकन फॉल्स म्हणतात (सरळ रेषेतला, छोटा) नायगारा नव्हे. तो पुर्णपणे अमेरिकन हद्दीत आहे, त्यावर रात्री कॅनडाकडून प्रकाशझोत टाकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

विकीचा दुवा बघा

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 23:39 नवीन
नायगरा फॉल्स हे त्या दोन्ही धबधब्यांना म्हणतात. (अमेरिकेच्या बाजूला आहे म्हणून त्यातल्या एकाला अमेरिकन फॉल्स म्हणतात.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

चतुरंग

Pain
Tue, 06/08/2010 - 23:51 नवीन
पाहिला. अमेरिकेच्या बाजूला आहे म्हणून त्यातल्या एकाला अमेरिकन फॉल्स म्हणतात. तशा पाट्यांमुळे गैरसमज झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरेख..

ऋषिकेश
Fri, 06/04/2010 - 09:28 नवीन
सुरेख.. लोभस फोटोज आहेत तुम्ही कितीही फोटो काढा नायगरा ही अनुभवण्याची गोष्ट आहे.. आणि जे आहे ते शब्दांपलिकडलं आहे. माझ्या नजरेतून नायगराचा पहिला (एक फोटो विरहित) अनुभव इथे मनोगतावर वाचता येईल ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

हा पहा कॅनडाच्या बाजूने दिसणारा

चतुरंग
Fri, 06/04/2010 - 09:28 नवीन
अमेरिकेकडचा नायगरा Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर

अमोल केळकर
Fri, 06/04/2010 - 09:32 नवीन
सुंदर फोटो. मस्त माहिती अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त आताषबाजी

सहज
Fri, 06/04/2010 - 10:15 नवीन
कृपया एक गोष्ट सुचवू का स्लाईडशो इम्बेड केलात तर बरे होईल. --------------------------------------------- नायगराचे फोटो व कांदापोहेची रेशीपी... सोऽऽ लास्ट मिलेनियम! हा प्रतिसाद आद्य विरझणभौंना अर्पण!
  • Log in or register to post comments

मस्त फोटु...

मदनबाण
Fri, 06/04/2010 - 13:22 नवीन
मस्त फोटु... इतके फोटु इथे टाकताना बरेच कष्ट घ्यावे लागले असणार !!! ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

फोटो छानच

मेघवेडा
Fri, 06/04/2010 - 13:37 नवीन
फोटो छानच आहेत!! आधी हळूहळू एकेक पाहिला. नंतर ते आतिषबाजीचे अगदी धबधब्यासारखे पडत गेले.. सहजराव म्हणतात तसं स्लाईडशोचा पर्याय वाईट नाही! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

परवाच जाऊन

प्रभो
Fri, 06/04/2010 - 18:41 नवीन
परवाच जाऊन आलो...मेड ऑफ मिस्ट वर नव्हता नेला क्यामेरा... :D
  • Log in or register to post comments

स्लाईड शो

मीली
Fri, 06/04/2010 - 19:12 नवीन
स्लाईड शो चा पर्याय चांगला वाटतो आहे.प्रयत्न करून बघते. मीली
  • Log in or register to post comments

हा आमचा

टारझन
Fri, 06/04/2010 - 21:47 नवीन
हा आमचा नायगरा , ह्याच्यावर आमचा भारी जीव , असे आमचे एक काका म्हणून गेलेत ते उगाच नाही ;) पण धबधब्याचे फोटोज एकदम धबधब्या प्रमाणे बदाबद टाकलेत काय ? ;) - (बदाबद प्रतिक्रीया टाकु) टायगरा
  • Log in or register to post comments

भिजवला

चतुरंग
Fri, 06/04/2010 - 21:52 नवीन
भिजवला किंचित!! काय रे टार्‍या त्याचत्या प्रतिक्रिया का टाकतो आहेस पुन्हा? :? (अनेक काकांपैकी एक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नायगरादर्

अनिल हटेला
Fri, 06/04/2010 - 21:53 नवीन
नायगरादर्शन आवडले..... :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

फोटो

मीली
Fri, 06/04/2010 - 23:57 नवीन
नवीन एसएलार घेतला म्हणून हौसे मध्ये जास्तच फोटो काढले .....मग चांगले निवडले .....आता स्लाईड शो करताना थोडा प्रोब्लेम येतो आहे.... मला असाही मेसेज आला कि," हे फोटो तुम्हीच काढले का,कि जालावरून घेतले म्हणून?" वाईट वाटले......आज काल बरेच लोक विरजण लावायच्या बिझिनेस मध्ये आहेत ! काय करणार ! :( मीली
  • Log in or register to post comments

लेख आणि फोटो आवडले..........पण

jaypal
Sat, 06/05/2010 - 01:40 नवीन
नायगरा फॉलचे रात्रीचे काही फोटो शेकी (हालले) आले आहेत. जमल्यास एक चांगला ट्रायपॉड घ्याच हि विनंती. स्लोशटरस्पीडला खुप खुप उपयोगी ठरेल. एस.एल. आर घेतलात म्हणुन विचारतो. लेन्स कलेकश्न जाणुन घ्यायला अवडेल. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

लेन्स

मीली
Sat, 06/05/2010 - 02:09 नवीन
लेन्स- २८-१३५ एम एम कॅमेरा-Canon EOS 50D 15 MP नाईट मोड मध्ये फोटो काढताना ट्रायपॉड हवा खरा.तिथे असलेल्या Coin operated Binocular वर कॅमेरा ठेवून फोटो काढलेत.त्यामुळे फोटो हलले असावेत. मीली
  • Log in or register to post comments

अ‍ॅटोमॅटीक मोड

jaypal
Sat, 06/05/2010 - 02:24 नवीन
पेक्षा मॅन्युअल मोड वर भर द्या. सुरवातीला कठीण जाईल पण मग कोणताही केमेरा हाताळायला बेसिक्स पकी होतील. (भरपुर फोटो काढुन सराव करा. काहीही कठीण नाही. ईमेज स्टेबिलायजर ऑन ठेवा) पुढील फोटो ग्राफिस शुबेच्छा >मला असाही मेसेज आला कि," हे फोटो तुम्हीच काढले का,कि जालावरून घेतले म्हणून?" वाईट वाटले... आहो ती कॉमेंट नसुन कॉम्प्लीमेंट आहे :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

फोटो

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 06/08/2010 - 22:39 नवीन
फोटो आवडले! नायगारा प्रत्यक्ष पाहिल्याचे फीलींग आले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

मीली
Wed, 06/09/2010 - 02:38 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार! मीली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा