✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गझल

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Mon, 04/21/2008 - 15:36

प्रतिक्रिया द्या
7348 वाचन

💬 प्रतिसाद (19)

अरे वा!

प्रमोद देव
Mon, 04/21/2008 - 19:52 नवीन
बिरुटे साहेब तुम्ही छुपे रुस्तम निघालात. एकदम गजल लिहीलीत! तब्येत वगैरे ठीक आहे ना? प्रयत्न चांगला आहे. फारच निराशावादी सुर लावलाय तुम्ही असे वाटतेय. पण मला त्यात जास्त काही कळत नाही तेव्हा मनावर घेऊ नका बरं का. आता इथले तज्ञ त्यावर साधक बाधक चर्चा करतीलच. झालंच तर सुचवण्या देतील. तेव्हा तयार राहा मरणाला.(जाल कुठे म्हणा!) :))))))))) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

अरे वा! +१

धनंजय
Mon, 04/21/2008 - 23:00 नवीन
बिरुटे सर, तुम्ही पुन्हा काव्यस्फुरण आमच्यापर्यंत पोचवू लागलात, ही आनंदाची गोष्ट आहे. बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. (विडंबनाला तयार राहा !! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

कविता की गझल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/22/2008 - 08:15 नवीन

देवसाहेब, धनंजय,
प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!
 'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!!
 पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे.
या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :)
प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच.  त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.

  • Log in or register to post comments

जात !

उदय सप्रे
Tue, 04/22/2008 - 11:47 नवीन
प्रा.बिरुटे , गझल छान आहे , पण याला सुरेश भट यांच्या "एल्गार" या गझलेचा फारच दरवळ आहे ..... या २ शेवटच्या ओळी बघा : ही जात कोण माझी , जाताच जात नाही पण "जाती"वादींची , "लोकसभे" त धाव आहे ! पाळू नयेत कोणी जाती-जमाती येथे सगळ्या गल्लाभरूंचा आरक्षणाचा घाव आहे ! ----------------राम नगरकर यांच्या "रामनगरी" मधील वाक्य आठवले : जी जात नाही, ती जात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर..

विसोबा खेचर
Tue, 04/22/2008 - 08:24 नवीन
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे या ओळी फारच सुंदर! क्या बात है बिरुटेशेठ! च्यामारी, तुम्ही इतकं उत्तम काव्य करता हे माहितीच नव्हतं! अजूनही येऊ द्या! आपला, (बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Tue, 04/22/2008 - 15:33 नवीन
मुकेपणाचा सराव हे भारीच ! येउद्या मस्त मस्त गझला अजुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मतला?? मक्ता ???

अजय जोशी
Tue, 04/22/2008 - 09:05 नवीन
जमवा की राव ... अहो, काही कवी वृत्तबद्ध काव्याशिवाय कशालाच कविता म्हणत नाहीत. काही कवींच्या मते वृत्तापेक्षा वृत्तीला पहावे. मला आपल्या काव्यात सचोटी वाटली. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments

बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला !!!!!

मदनबाण
Tue, 04/22/2008 - 15:14 नवीन
बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे व्वा क्या बात है डॉक्टर साहेब..... मस्तच. (गझल प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments

लगे रहो.

शितल
Tue, 04/22/2008 - 18:02 नवीन
गझल म्हणत नाही पण तुम्ही केलेली रचना, तुम्हाला काय सा॑गायचे आहे ह्याचा उलघडा करते, कारण, आन॑द समजुन घेण्याच्या अनेक वाटा आहेत , पण दु:खाचे तसे नाही, म्हणुन दर्दी काव्याच्या वाटा फार विरळ. तुमच्या आणखी काव्य रचना वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

काव्यरचना-

विदेश
Wed, 04/23/2008 - 10:55 नवीन
एकदम उत्तम ,सर!
  • Log in or register to post comments

संवेदनशील

सूर्य
Wed, 04/23/2008 - 12:04 नवीन
टेक्नीकली गझल म्हणुन कशी आहे हे सांगता येणार नाही. परंतु अतिशय संवेदनशील कविता आहे हे एक सामान्य वाचक म्हणुन म्हणू शकतो. आवडली सर. - सूर्य
  • Log in or register to post comments

स्तुत्य प्रयत्न

विसुनाना
Wed, 04/23/2008 - 12:59 नवीन
बिरुटेसर, पहिलाच प्रयत्न चांगला आहे. आणखी लिहा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

गझलप्रेमी.

शेवटचा बाजीराव
Wed, 04/23/2008 - 17:46 नवीन
बिरुटे सर, तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चा॑गला आहे कि असे वाटत नाही हा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुमच्या अजुन काच्यरचना वाचायला आवडतील. जर आशावादी असतील तर अजुन आवडतील. तुमचा एक विद्यार्थी, शेवटचा बाजीराव
  • Log in or register to post comments

डॉ. साहेब आतून आलेले काव्य!

चतुरंग
Wed, 04/23/2008 - 18:02 नवीन
भावले. अजून येऊ देत. पुलेशु. चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Wed, 04/23/2008 - 20:13 नवीन
आतून आलेले काव्य भावले, असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद यार हो !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/24/2008 - 08:36 नवीन
गझल शिर्षक असलेल्या पण मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता ( शब्द माहित आहेत हो, उपयोग करता येत नाही ) यांचा कोणताच ताळेमळ नसतांना केलेल्या कौतुकाने प्रा.डॉ. मिसळनवाज खूष झाले आहेत. पुढे जेव्हा गझल लिहू तेव्हा गझलेचे सर्व धर्म पाळण्याचा प्रयत्न करु !!! प्रमोद देव, धनंजय, तात्या,सप्रेम साहेब,आनंदयात्री, अजय जोशी,मदनबाण,शितल, विदेश,सुर्य, विसुनाना,शेवटचा बाजीराव्,चतुरंग,चित्रा,आणि स्वाती....आमच्या अशा प्रकारच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल आम्ही आपले आणि वाचकांचेही शुक्रगुजार आहोत. विशेष आभार :- मिसळपाववर अक्षररंगाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निलकांतचे, तात्याचे, आभार !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा वा..

प्राजु
गुरुवार, 04/24/2008 - 13:34 नवीन
बिरूटे सर.. यू टू???? :)) आवडली कविता. ..अतिशय सुरेख अर्थ.. गझल लिहिण्याचा मी ही कित्येक दिवस प्रयत्न करते आहे पण जमत नाहिये... पण नक्की जमेल एकेदिवशी... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

बिरुटे सर गझल करतात हे माहित

निखिल देशपांडे
Mon, 01/31/2011 - 21:33 नवीन
बिरुटे सर गझल करतात हे माहित नव्हते. गझल आवडली. (जुने धागे उचकटत असताना सहजच सापडली. नवीन लोकांच्या वाचनात आली नसेल म्हणुन सहजच वर आणली.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद निखिलजी. यानिमित्ताने

गंगाधर मुटे
गुरुवार, 02/03/2011 - 18:06 नवीन
धन्यवाद निखिलजी. यानिमित्ताने बिरुटे सरांचे काव्य वाचायला मिळाले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा