Skip to main content

प्रार्थना

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 26/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साद मागची; साद नसे रे, हा तर सारा भुलावा. क्षणभर भुलवी; धरा सोडवी, भवसागर कैसा तरावा? चुकार मनाच्या बसे कोनाडी; हळुवार शिळ जशी विरावी, हवेत जरी ती नसे कुठेही, ठोका हृदयाचा चूकवी. असतील जर पाश कुठे रे जखडाया मना; तना सोबती, ऐवज सारा गहाण घालीन सात जन्म वरती. सोडव मजला मनापासुनी नको वेदना; नको भिरभिरणे, थांबव माझे बंजारेपण, घाल पदरी स्थिर जगणे. अपर्णा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1455
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

चुकार मनाच्या वसे (कोनाडी) अन्तरी वाचण्यास बरे वाटेल का ? शेवटच्या दोन ओळीचा अर्थ विरुध्ध वाटतो. बंजारेपण, थांबउन स्थिर जगणे अपेक्षित म्हणून बान्ध पदरी आता असे म्हणणे योग्य वाटते. मात्र कविता सुंदर ! आवडली !

In reply to by निरन्जन वहालेकर

"कोनाडा" अंधारेपण दाखवतो. "कोनाडा" फारसा न उघडता एका बाजुला असतो... शेवटच्या दोन ओळी....याचक होउन " स्थीर जगणे पदरात घाल" अशी विनवणी आहे. आभार.. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मनाच्या चंचलतेला लगाम घालण्याची साधने शोधण्याची कल्पना आवडली. सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण । श्लोकपदें ’मनसीश्वर’ पूर्ण । मनशींच जाण हरि बोले ॥ - एकनाथी भागवत - फटू