साद मागची; साद नसे रे,
हा तर सारा भुलावा.
क्षणभर भुलवी; धरा सोडवी,
भवसागर कैसा तरावा?
चुकार मनाच्या बसे कोनाडी;
हळुवार शिळ जशी विरावी,
हवेत जरी ती नसे कुठेही,
ठोका हृदयाचा चूकवी.
असतील जर पाश कुठे रे
जखडाया मना; तना सोबती,
ऐवज सारा गहाण घालीन
सात जन्म वरती.
सोडव मजला मनापासुनी
नको वेदना; नको भिरभिरणे,
थांबव माझे बंजारेपण,
घाल पदरी स्थिर जगणे.
अपर्णा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1455
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर ! आवडली !
"कोनाडा"
In reply to सुंदर ! आवडली ! by निरन्जन वहालेकर
छान कविता...