कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच...
जरा वर्षभराची झाल्यावर इकडे तिकडे उठाठेव करणे चालू झाले...करणारच...लहान पिल्लूच ते !! आम्ही तिला आमच्या घरी खेळायला आणायचो...खाऊ द्यायचा, गोष्ट सांगायची, गाणं म्हणायचं, गाणं शिकवायचं असं चालू झालं....मजा यायची...फारशी बोलायची नाही आणि समजा ती घरात असताना दार बंद केलं तर लगेच रडारडी करून बाहेर पळायची नाहीतर दार बंदच करू द्यायची नाही...घरात खेळताना काहीतरी पाडापाडी व्हायची ती होणारच...आणि एवढ्याशा पिल्लाला काय बोलायचे? आम्ही अर्थातच दुर्लक्ष करायचो आणि आम्हीच आवरायचो....कधी कधी शु पण करायची घरातच कुठेही...वर्षाच्या बाळाला काय कळणार? आम्ही आपलं आवरायचो...त्यात काय विशेष?
पण एक गोष्ट मी बघितली कि समजा घरात शु केली तरी ती एकदम आवरायला जायची...काही पडलं तर लगेच उचलून ठेवायची घाई आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा अपराधीपणा ....लहान बाळांना एवढं काही कळत नसतं आणि माझ्या आईला सांगितलं तर ती हिचं कौतुक करणार "किती हुशार आहे, लगेच आवरायला जाते ", हेच तिच्याही आईला वाटत असे...
मला मात्र हे नॉर्मल वाटत नव्हतं, आपल्यापेक्षा या मोठ्यांना अनुभव जास्ती आहे हे समजून मी खूप काही बोलण्याच्या भानगडीत पडले नाही पण असं काही घडलं तर लगेचच मी दाखवून द्यायचे कि एवढ्या छोट्या बाळाला कसं कळतंय कि आवरून घ्यायला हवं? एकदा मी आईला सांगून बघितलं कि "बहुदा तिच्या पाळणाघरात तिला तिच्याकडून काही चूक झाली तर शिक्षा करत असावेत, तू तिच्या आईशी बोलून बघ, मला तिचं वागणं नॉर्मल वाटत नाही "...
"आपल्याला काय करायचंय? आणि त्यांना नाही का त्यांच्या बाळाची काळजी? उगाच अगोचरपणा करायला जाऊ नकोस !!" माझी आई
ती दोन एक वर्षाची होईपर्यंत त्याच आजींकडे होती.... एकदा तिचा मोठा भाऊ शाळेतून तिला घ्यायला गेला...काही दिवसांनी आम्हाला कळले कि आता त्या आजींकडे न ठेवता दुसरीकडे कुठे तिला पाळणाघर शोधताहेत...का म्हणून विचारलं तर त्यांनी अतिशय disturbing घटना सांगितली ....
तिचा मोठा भाऊ घ्यायला गेला तर ती म्हातारी त्या एवढ्याशा जीवाला लाथेने मारत होती...अजून खोलात चौकशी केली तर कळले कि ती म्हातारी या छकुलीला तिचे काही चुकले तर चिमटे घेत असे, लाथेने मारत असे, अंगावर ओरडत असे, खायला देत नसे वगैरे....तिला बोलता येत नव्हते म्हणून ती सांगू शकत नव्हती पण तोपर्यंत तिच्या चिमुकल्या मनावर खोल परिणाम होईल असे हि नालायक म्हातारी वागली होती...तिचा पाळणाघर हा व्यवसायच होता...तिला माहिती नव्हते का लहान बाळे कशी असतात ते? मग झेपत नव्हते तर का घेतले? महिन्याकाठी ७००-८०० रु. मिळणार म्हणून एका चिमुकल्या जीवाचे हाल केले....
मी विचारलं पोलीस complaint केली का तर नाही म्हणे...फक्त ताबडतोब बाळाला तिथून काढून घेतलं...यांना तरी स्वतःच्या बाळाच्या वागण्यात काय फरक पडत आहे हे दिसले नाही का? का वेळ नसल्याने दुर्लक्ष केले ? काहीही असो...त्या जीवाला मात्र भयानक अनुभव घ्यावा लागला...
असेच काही video u tube वर सुद्धा आहेत...माझ्या बाळाला शाळेत घालायच्या वेळेस मी जालावर बरेच लिखाण वाचले...त्यातील लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी अशा: १) अगदी कणभर जरी शंका आली कि आपले बाळ इथे सुरक्षित राहणार नाही तर ते पाळणाघर यादीतून बाद करावे...
२) पाळणाघर आणि तेथील कर्मचारी यांविषयी माहिती गोळा करावी..
३) भेटायला गेल्यावर त्यांचे इतर मुलांशी वागणे बघावे, आपण समोर असताना आपल्या बाळाशी ते छानच वागणार..(यालाही एक गुजराती अपवाद माझ्या पाहण्यात आला होता..त्याविषयी नंतर) आणि आपण गेल्यावर ते इतर मुलांप्रमाणेच आपल्याही छकुल्याला वागवणार..
४) पाळणाघरचालकाकडे परवाना आहे का ते बघावे...परवाना त्या वर्षीचाच असावा.
५) घर childproof आहे का ते पाहावे
६) बाळाचे खाणे जर पाळणाघर पुरवणार असेल तर त्यांच्या स्वैपाकघराची स्वच्छता पहावी..
७) त्यांच्या बाथरूमची स्वच्छता पहावी
अजून तुमचे काही standards असतील तर ते check करावे...यातील एका गोष्टीत जरी खोट वाटली तर आपल्या बाळाला इथे enroll करू नये....आणि एखादं पाळणाघर थोडं महाग असेल,वरील गोष्टींची पूर्तता असेल आणि तेथील वातावरण चांगलं असेल तर पैसा पाहू नये कारण बाळाची सुरक्षा महत्वाची...
***************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
वाचने
5855
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच खूप
आईग !!!!!
शीर्षक
+१
In reply to शीर्षक by आंबोळी
अरेरे..
??
In reply to अरेरे.. by ज्ञानेश...
बापरे
In reply to ?? by मनिष
एवढे?
In reply to ?? by मनिष
एक
In reply to एवढे? by नितिन थत्ते
पुणे
In reply to एक by मनिष
असेल!
In reply to पुणे by नितिन थत्ते
असेल बुवा
In reply to असेल! by मनिष
संपूर्ण
In reply to असेल बुवा by नितिन थत्ते
दु:खद आणि संतापजनक..
अशीच एक घटना मागील एक दोन महिन्यापुर्वी
ही घ्या...
In reply to अशीच एक घटना मागील एक दोन महिन्यापुर्वी by वेताळ
भयानक
हे घडतंच...
आपल्याकडे
+१ छोट्या
In reply to आपल्याकडे by शिल्पा ब
लहान मुलांना
काय हे...
लेखाबद्दल
भयानक आहे
भयानक आहे!