✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महिला कारागृहात काही तास

अ
अरुंधती यांनी
Mon, 05/24/2010 - 19:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8587 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

साधु!

आळश्यांचा राजा
Mon, 05/24/2010 - 19:28 नवीन
___/\___ सिन्सिअरली. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

>>गुन्हेगार

शुचि
Mon, 05/24/2010 - 19:34 नवीन
>>गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.>>खरं गं अरु "सर्वे भवन्तु सुखिनः ....." किती वेगळा अनुभव आहे तुमचा. भयाण वातावरणात शांतीचे सूर छेडण्याचा. खरच त्या महीलांना २ क्षण नक्की शांतीचे लाभले असतील, कुठेतरी ज्योत दिसली असेल, आशा पल्लवीत झाली असेल. माझी खात्री आहे. लेखात तुझ्या मनातले तरंग जरा आले असते आधीचे नंतरचे तर आवडले असते. तुला भीती नाही का वाटली? असणारच पहील्या वेळी. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

शुचि,

अरुंधती
Mon, 05/24/2010 - 20:25 नवीन
शुचि, आळश्यांचा राजा, धन्यवाद! :-) शुचि, माझ्या सर्वात पहिल्या तुरुंगभेटीत , मी कॉलेजात असताना, खूप सुन्न झाले होते.... पण त्यानंतर महिला कारागृहाला २-३ भेटी, पुरुष कारागृहाला २ भेटी दिल्याने जरा कशाप्रकारचे वातावरण आत असेल ह्याची पूर्वकल्पना असल्याने खूप वेगळे वाटले नाही. मात्र त्या वातावरणात ईश्वराच्या भजनाने, सामूहिक प्रार्थना-गायनाने व काही काळासाठी का होईना मिळालेल्या खुलेपणामुळे जो काही फरक पडला तो लक्षणीय होता. माझ्या सहकार्‍यांनासुध्दा आधीच्या भेटींमुळे पूर्वकल्पना होती. मात्र आमच्या हायर केलेल्या साऊंडवाल्याला जरा आतील वातावरण, सुरक्षा इ. इ. मुळे थोडे टेन्शन आले होते. कार्यक्रम संपल्यावर तोही मोकळेपणाने हसत होता हे विशेष! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कोल्हापूरचा कळंबा जेल...!!

इन्द्र्राज पवार
Mon, 05/24/2010 - 21:09 नवीन
"...आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले....." नेमकी हीच भावना माझ्याही मनी आली होती ज्यावेळी आम्ही कोल्हापुरात कॉलेजच्या "रा.से.योजने"तर्फे "कळंबा जेल" येथे पुरुष कैद्यांसमवेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या पोलिस महासंचालकांची रितसर परवानगी घेऊन ... कारण विषय होता ~~ "कैद्यांचे कवितावाचन". या विषयासाठी ज्यावेळी आमच्या युनिटच्या प्राध्यापकांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे परवानगी मागितली त्यावेळी (साहजिकच...) त्यांनी नकार दिला होता... कारण स्पष्ट होते... की, "इनमेट्स" (हा त्यांचा शब्द) तुरूंग व्यवस्थापनावर काहीतरी तक्रारवजा कॉमेंट्स कवितेच्या माध्यमातून करतील आणि आमच्या युनिटसोबत येणारी पत्रकार मंडळी त्याचे भांडवल करून खात्याची बदनामी करतील. त्यांची शंका नक्कीच अस्थानी नव्ह्ती. तेव्हा आमच्या सरांनी चर्चेदरम्यान सुवर्णमध्य असा काढला की, प्रत्यक्ष भेटीच्या अगोदर एक आठवडा कैद्यांना कवितेचे विषय द्यायचे आणि तीवरच त्यांनी आपापल्या मगदुराप्रमाणे कविता रचायची, म्हणायची, गायची असेल तर गायची. ही कल्पना दोन्ही पक्षी पचनी पडली आणि त्यानुसार "माझा गाव... आई, जमीन, शेत, नदीकाठ सफर, स्वप्न, अपत्याची आठवण...आणि शेवटी अर्थातच ईश्वर !..." हे विषय कैद्यांना निवेदनाद्वारे देण्यात आले... आणि हा कार्यक्रम अगदी तुम्ही म्हणता तसाच देखणा आणि कायमचा लक्षात राहाण्यासारखा झाला.... अन् आम्हा सर्वांना जेलच्या बाहेर पडताना नेमकी तुमच्यासारखीच भावना झाली त्या कैद्यांच्या प्रती....! तुम्ही लिहिलेला "येरवडा" अनुभव तर एक काव्यच आहे ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

त्यातल्या

llपुण्याचे पेशवेll
Tue, 05/25/2010 - 08:58 नवीन
त्यातल्या काही लक्षात राहील्येल्या चांगल्या कविता असतील तर द्या बरं इथं. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

कविता...!!

इन्द्र्राज पवार
Tue, 05/25/2010 - 19:58 नवीन
"...चांगल्या कविता असतील तर द्या बरं इथं.... मी जरूर प्रयत्न करतो. ज्या प्राध्यापकांनी यात पुढाकार घेतला होता त्यांनी आणि कोल्हापुर सकाळचे वार्ताहर या दोघांनी त्यातील काही रेकॉर्डही केल्या होत्या, त्या मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधतो. (मात्र का कोण जाणे त्या कार्यक्रमानंतर ती समस्त लेखन सामग्री तुरुंग व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक आपल्या ताब्यात घेतली होती. कदाचित त्यांना वरिष्ठांचे तसे आदेशही असावेत. पण कार्यक्रमाचा दर्जा छानच होता... "अपिलिंग" म्हणावा असा.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

इंद्रराजस

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:19 नवीन
इंद्रराजसाहेब, कविता-गाणी-नाट्य-विविधगुणदर्शन अशा कार्यक्रमांतून कैद्यांच्या कल्पनाशक्तीला, अंगभूत गुणांना वाव तर मिळतोच, शिवाय त्यांची ऊर्जा काहीतरी सकारात्मक करण्यात गुंतल्यामुळे हिंसक विचारांचे प्रमाण कमी होते. मी ज्या संस्थेचे काम करते त्यांच्यातर्फे तुरुंगातील कैद्यांसाठी ध्यान, प्राणायाम, योगाचे वर्ग घेतले जातात.... शेवटच्या दिवशी त्या कैद्यांनी केलेल्या कविता ऐकताना डोळे पाणावतात. त्यांच्यातल्या माणसाचं हुबेहूब दर्शन होतं.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

छान

मीनल
Mon, 05/24/2010 - 21:54 नवीन
छान अनुभव कथन. मला काही कैद्यांबद्दल सहानुभूती वाटते. गुन्हा प्रत्येक वेळा जाणून बूजूनच केला जातो असे नाही. इथे ` जेल` नावाचा कार्यक्रम टीव्ही वर पाहते. तेव्हा कळते की अजाणतपणे ही चूका झालेले गुहेगार म्हणून शिक्षा भोगत असतात. काही वेळा तो गुन्हा सिध्द ही झालेला नसतो. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मीनल,

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:22 नवीन
मीनल, अनेकदा गुन्हेगाराचा गुन्हा सिध्द होईपर्यंत इतका काळ लोटून जातो.... आणि कितीतरीजण आपला गुन्हा नसताना अडकतात हेही खरे आहे.... आणि जे खरोखरी गुन्हा करणारे असतात ते पश्चात्ताप किंवा वैफल्य, निराशा तर कधी सूडाची भावना यांच्या अग्नीत पोळत असतात. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

अनुभव

मदनबाण
Mon, 05/24/2010 - 22:05 नवीन
अनुभव आवडला... मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments

सहीच लेख

अमोल खरे
Mon, 05/24/2010 - 22:05 नवीन
रामदास काकांनी पण त्यांच्या एका कथेत तुरुंगाच्या आतील वातावरणाचा उल्लेख केला होता. तो भाग वाचला नसल्यास जरुर वाचा.
  • Log in or register to post comments

हा खरा सत्संग !!

अर्धवटराव
Tue, 05/25/2010 - 05:47 नवीन
पूण्यवान, नशीबवान आहेस तू अरू !! सलाम !!! (गद्गद्) अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments

मदनबाण,

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:24 नवीन
मदनबाण, अमोल, अर्धवटराव ..... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अनेक गरीब,

Manoj Katwe
Tue, 05/25/2010 - 06:06 नवीन
अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले. वाचून डोळे पाणावले. खरच काय एवढी गंभीर परिस्थिती आहे बाहेर ?
  • Log in or register to post comments

मनोज, अनेक

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:29 नवीन
मनोज, अनेक भटक्या जमातीतील, रस्त्यावरचे आयुष्य जगणार्‍या बायकांना गाठीला पैसे नसताना, डोक्यावर छत नसताना, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना आणि कोणताही आधार नसताना अशीच काहीतरी धडपड करून, गुन्हे करून आपलं बाळंतपण अशा तर्‍हेने करून घेण्याची वेळ येते. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Manoj Katwe

होय आहे

स्पंदना
Tue, 05/25/2010 - 06:21 नवीन
होय आहे खरी तशी परिस्थीती गरीब निराधार महिलांची. माटुन्ग्याच्या अनाथ आश्रमात आम्ही एकदा लहानग्यांना काही भेट वस्तु घेउन गेलो होतो , तो प्रसंग आठवला. डोळ्यातल पाणि थांबत नव्हत ते अश्राप जीव पाहुन. किती दिवस मी हट्ट करत होते निदान एखाद बाळ दत्तक घेउ म्हणुन. अगदी ठाम नकार मिळाला मला घरुन. जरी अनुभव असला; तरी त्या मधील वेदनेन ,मला तर अस वर्णन नाही जमायच अरुंधती. पण तुझ्या लिखाणामुळे निदान थोडी द्रुष्टी मिळेल वाचकांना. पोट भर जेवुन पेंगत येणार्‍या भक्तांपेक्षा हा सत्संग खरच कारणी लागला ग बयो!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

पोट भर

मस्त कलंदर
गुरुवार, 05/27/2010 - 00:01 नवीन
पोट भर जेवुन पेंगत येणार्‍या भक्तांपेक्षा हा सत्संग खरच कारणी लागला ग बयो!!
अगदी खरं!!! अरूंधती, _/\_ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अनुभव

डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 05/25/2010 - 06:34 नवीन
अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही म्हणतात. तुमचे हे शाब्दिक विवेचन कारागृहातील अनुभव प्रत्यक्ष समोर घडतो आहे अशा उत्कृष्ट पद्धतीने आलेले आहे.
  • Log in or register to post comments

नि:शब्द

संदीप चित्रे
Tue, 05/25/2010 - 07:33 नवीन
तुझ्या ह्या अनुभवावर शब्दांचे ओरखडे नकोत म्हणून इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/25/2010 - 19:27 नवीन
ह्या अनुभवावर शब्दांचे ओरखडे नकोत म्हणून इथेच थांबतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

उत्तम लेख.

मुक्तसुनीत
Tue, 05/25/2010 - 07:35 नवीन
नेटक्या शब्दांत मांडलेला अनुभव.
  • Log in or register to post comments

अपर्णा,

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:31 नवीन
अपर्णा, संदीप, डॉ.श्रीराम, डॉ दिलीप, मुक्तसुनीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

तुरुंगातील सावल्या

गुंडोपंत
Tue, 05/25/2010 - 08:22 नवीन
अरुंधतीताई फार सुंदर अनुभव आहे. आणि तुमचे लिखाणही उत्तम आहे. तुम्ही जे काम करत आहात त्याला तोड नाही. तुमच्या विषयी आदर वाटला. मात्र असा सत्संग अनेकदा करता येणार नाही का तेथे, असेही वाटून गेले! तुरुंगातील मुलांविषयी वास्तवाची भयाण जाणीव करून देणारे ' तुरुंगातील सावल्या नावाचे एक मराठी पुस्तक आहे. लेखक श्री भरुचा आहेत. (ते किरण बेदींचे जावई होत) आई सोबत तुरुंगात असलेल्या लहान मुलांचे अतिशय अस्वस्थ करणारे करूण आणि वास्तव जग त्यात आहे. या मुलांना काही कारण नसतांनाच तुरुंगवास होत असतो. मात्र हे फक्त ५ वर्षांपर्यंतच! नंतर जबरदस्तीने ते मूल आईपासून वेगळे केले जाते. त्याला कायद्याने कारागृहात स्थान नसते. दिवसरात्र तुरुंगात आईसोबत असलेली ही लहानगी पाचव्या वाढदिवसाची भेट म्हणून आईपासून दूर जातात. अनेक आयांना त्यांना झालेल्या शिक्षेपेक्षा, ही शिक्षा सहन होण्यापलिकडे असते. तुरुंगातल्या आणि रिमांडहोम मधल्या मुलांच्या विचारांनी अस्वस्थ व्हायला होते. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

गुंडोपंत,

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 19:42 नवीन
गुंडोपंत, हो, खरंय.... इकडे आड तिकडे विहीर.... तुरुंगात राहणेही त्या मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि रिमांडहोममध्येही वातावरण गढुळलेलेच असते. रिमांडहोममध्येही मुलांसाठी - त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खास प्राणायाम, योग, ध्यान, खेळ असणारे कोर्सेस, सत्संग हे मी काम करत असलेल्या संस्थेतर्फे घेतले जाते.... पण आईच्या मायेची ऊब, पालकांची प्रेमाची छत्रछाया ही वेगळीच, नाही का? अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तुझे अनुभव वाचुन् मन खुप ढवळून निघाले ...

वाहीदा
Wed, 05/26/2010 - 16:34 नवीन
अरुंधती , तु जे करत आहेस त्याची तोड नाही ... सलाम !! मी ही दरवर्षी एकातरी अनाथ आश्रमाला भेट देते (बहुतेक रमजान महिन्यात) पण बहुतेक अनाथ वस्तीगृह ही मुलांचीच पाहीली . मुलींची फारच कमी. मी अनेकदा विचारले अनाथ मुलींचे वसतीगृह का नाही पण मुलींची जबाबदारी एका विषिष्ट वयानंतर संचालक मंडळी टाळताना दिसली . बहुतेक ठिकाणी करुण अन मन खिन्न - सुन्न करणारे अनुभव मिळाले पण शेवटी गुजराथ मधील अहेमदाबाद जवळील मुलींची वसतीगृह आम्ही शोधून काढले. अन एकदा त्या अनाथ वस्तीगृहाला भेटही दिली सगळ्या मुली अपंग किंवा काहीना काही व्याधीने ग्रासलेल्या होत्या पण त्या सगळ्याच खुपच Full of Enthusiam वाटल्या इतक्या दु:खातही आनंदात होत्या . तेथील मतीमंत अनाथ मुलींची जोपासना तेथील सेविका अतिशय प्रेमाने करीत होत्या. आम्ही त्या मुलींसोबत तिथे १ दिवस अन १ रात्र पण काढली. पण मला कुठेही रिमांड होमचे स्वरुप जे माटुंग्याच्या अनाथ आश्रमात दिसले होते ते सुदैवाने तिथे नाही जाणविले . मला त्यांनी एक अल्बम ही दाखविला तेथील अनाथ मुलींच्या लग्नाचा अल्बम .. आईच्या मायेची ऊब, पालकांची प्रेमाची छत्रछाया सगळे काही होते तिथे. या अनाथ वस्तीगृहाला गुजराथ मधील एन आर आय मंडळी जात, धर्म, पंथ न बघता नियमित मदत करतात मी तुला त्याचा पत्ता ही देईन . दुर्दैवाने मी असे चित्र मुंबई पुण्याच्या आसपास नाही पाहीले :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

वाहिदा.....

अरुंधती
Wed, 05/26/2010 - 19:22 नवीन
वाहिदा..... तुझ्या अनुभवाबद्दल काय बोलू? वाईट स्थिती आहे इतकंच सांगू शकते. आपल्या परीने मदतीचा हात कायम पुढे करत राहणे.... तू नक्की मला त्या अनाथाश्रमाचा फोन, पत्ता कळव! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

जबाबदारी...!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/27/2010 - 00:02 नवीन
"....पण बहुतेक अनाथ वस्तीगृह ही मुलांचीच पाहीली. मुलींची फारच कमी..." वाहिदा जी, हा प्रकार तुम्ही पुणे/मुंबई या सारख्या महानगरात पाहिला असाल, पण कमीजास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यात हीच स्थिती आहे. कोल्हापुरदेखील त्याला अपवाद नाही. जी काय एकदोन आहेत ती "को-एज्युकेशन" धर्तीवर चालविली जातात. कॉलेजच्या एनएसएस युनिटच्या वतीने काही विधायक कार्य करायला आमचा ग्रुप तिथे गेला होता त्यावेळी तिथल्या सुपरिंटेंडेंट बाईनी निक्षून सर्व मुलींना एका हॉलमध्ये बसविले होते व आम्हाला फक्त मुलांच्या सेक्शनकडेच लक्ष देण्याची सुचना केली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "नको ती जबाबदारी" घ्यायला तेथील अधिकारी वर्ग इच्छुक नसतो हेच खरे ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

अरुंधती,

स्वाती२
Wed, 05/26/2010 - 03:07 नवीन
अरुंधती, अनुभव पोहोचला. :(
  • Log in or register to post comments

वेगळाच..

स्वाती दिनेश
Wed, 05/26/2010 - 15:02 नवीन
एका वेगळया जगामध्ये नेणारा वेगळाच अनुभव, स्वाती
  • Log in or register to post comments

अनुभव

बिपिन कार्यकर्ते
Wed, 05/26/2010 - 16:38 नवीन
अनुभव वेगळाच आणि मांडलाय पण नीटपणे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

स्वाती,

अरुंधती
Wed, 05/26/2010 - 19:23 नवीन
स्वाती, स्वाती दिनेश आणि बिपिन.... प्रतिसादाबद्दल धन्स! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Wed, 05/26/2010 - 19:51 नवीन
छान अनुभवकथन. पहिला भाग वाचतांना उंबरठा या चित्रपटाची आठवण झाली !
  • Log in or register to post comments

अनुभव कथन

पक्या
Wed, 05/26/2010 - 21:06 नवीन
अनुभव कथन छान केले आहे. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा