मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय अपशकून घडला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
काय अपशकून घडला
महाराजांकडचा एक सैनिक उत्तरेला लढाईला जातो अन तो तेथे अडकून पडतो. इकडे त्याच्या घरी काय होते ते पहा: (कोरस तसा अनावश्यक वाटतो आहे. तोडा विरस होतो आहे. पण म्हणायचा असेल तर म्हणा नाहीतर राहू द्या.)
असा ग बाई काय अपशकून घडला माझा हिरवा चुडा की ग फुटला ||धृ|| धनी हे माझं मोठं सरदार महारांजांचं आहे ते चाकर पराक्रम त्यांचा काय सांगावा आसंलं का ग मार्ग तयांचा खुटला? असा ग बाई काय अपशकून घडला ||१|| कोरस: तुच सावर बाई ग आता आमचंबी काळीज तुटे तटतटा सखे ग बाई हिरवा चुडा हिचा फुटला उत्तरेला गेले कराया मुलूखगिरी म्हैना झाला आलं नाही घरी कुठं आसलं माझा शिरीहरी दिस जावूनी अंधार की ग दाटला असा ग बाई काय अपशकून घडला ||२|| कसलं धनी आहे माझं कसं मी सांगू सांगता गोष्टी त्यांच्या लाज नका आनू निरोप नाही अजूनी कसला डोल्यात समिंदर हा साठला असा ग बाई काय अपशकून घडला ||३|| म्हनलं व्हतं त्ये लौकर येतो भर्जरी बनारसी शालू आणीतो नको मला आता शालू लुगडं (तिला आता भरजरी शालूही केवळ लुगडे वाटत आहे.) धन्याचं दर्शन घडवा मजला असा ग बाई काय अपशकून घडला माझा हिरवा चुडा की ग फुटला ||४|| कोरस: तुच सावर बाई ग आता आमचंबी काळीज तुटे तटतटा सखे ग बाई हिरवा चुडा हिचा फुटला - पाषाणभेद (दगडफोड्या) २५/०५/२०१०

वाचने 1407 वाचनखूण प्रतिक्रिया 2

शुचि 25/05/2010 - 05:03
आवडली. खरच हळवेपण येतच असणार कितीही मन कठोर केलं तरी. कोरस आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||