Skip to main content

न्हाउन ओले केस घेवून

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
न्हाउन ओले केस घेवून

न्हाउन ओले केस घेवून का सतावीतेस तू मला ओले ते केस झटकून हसवणूक बरी जमते तूला ||धृ|| प्रात:समयी दृष्य दिसे मनावरती फिरते पिसे हलकेच उडे मनपाखरू पिसारा फिरता अंगावरून न्हाउन ओले केस घेवून ||१|| कांता तू ग आहेस सुंदर समयी असल्या कसला अव्हेर वेळ कसला कसा जातसे ओल्या त्या केसात गुरफटून न्हाउन ओले केस घेवून ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०
काव्यरस

वाचने 2556
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by मनिष

आपने हमकू दादांजैसा बोला, हमकू बोत आनंद हुवा! बाकी तुमची प्रतिभा पण लईच कडक बुवा! बुवा अशासाठी की तुम्हीही तुमच्या जटा धुवून घ्या आता! रैवार ना आज! :-) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

पाभासाहेब, रागावणार नसाल तर एक सांगू इच्छितो. एखाद्या कवितेवर वेळ घालवा. ती जितकी चांगली व पूर्ण करता येईल तेवढी करा. मग प्रकाशित करा. शिवाय विषयही वेगवेगळे सुचतात का ते पहा. तुम्ही दिवसाला एक दोन कविता टाकायला लागलात तर लोकांना त्याचे फारसे काही वाटणार नाही. दहापैकी एक दोनच पण अस्सल भारी कविता टाकल्यात तर आम्ही भरभरून कौतुक करू हा वायदा.

In reply to by sur_nair

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमच्यासारखे रसिक आहेत तर काय कमी आहे? बाकी कवितांवर मेहनत कमी घेतली जातेय हे मान्य. पण प्रसूती वेदना झाल्या झाल्या लागलीच कविता टाकतो. अन तुमचे वाचन हेच माझे कौतूक आहे हो. मी दिवसाला दोन दोन कविता टाकल्या तर मी तरी का अपेक्षा करावी प्रतिक्रीयांची. आपले वाचन ह्याच माझ्या प्रतिक्रिया आहेत हो. बाकी कवितांनी आपल्याला दोन क्षण जरी आनंद दिला असेल तर मी भरून पावलो. प्रतिक्रिया काय हो येतील अन जातील. बाकी तुमचा हक्काचा सल्ला मी लक्षात ठेवीनच. अन राग वैगेरे काही नाही हो. एखाद्या मित्राच्या नात्याने तुम्ही माझी कानउघाडणी केली असे समजतो मी. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही