हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;)
न्हाउन ओले केस घेवून
सर्दी होईल की तुला
शिंकानी मग बेजार होशील,
त्रास नुसता मला|
जा पटकन टॉवेल घेऊन,
केस सत्वर कोरडे कर
तेल लावून, भांग पाडून
चहा पिऊन घे की कपभर|
घरात झालाय नुसता पसारा,
त्याचे आहे का काही तुला?
सुट्टीची आहेत कामे ढिगभर,
त्रास नुसता मला|
- मनिष शीघ्रक(ड)वी ;)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1688
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भा हा री ही
मनिषभाऊ,
व्वा !!!