(चित्र)
मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल चित्र वाचली आणि काही दिवसापुर्वी इथे आलेल्या वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या.
उघडी पडली अर्थव्यवस्था, नवे प्रशासक झाले
नि धाग्यातून झाली गणती, किती कफल्लक झाले!
कशी, कधी या स्थळाची मंडई बनवली सांगा?
असे, कसे हे सुजाण सगळे मुर्ख गिर्हाइक झाले?
पाहा, पाहा पोतडीतले किती आयडी आले
आणिबाणी उठली आणीक, किती विधायक झाले
फरार झाला आहे मालक अशी वदंता होती
अन पुर्वीचेपूजक त्याचे, सगळे मारक झाले
नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या
जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले
तुझ्या विडंबन चित्रा कैसे छान म्हणावे "केश्या"?
तसे बरे नव्हते आधीही, अता विदारक झाले
लेखनविषय:
याद्या
1771
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
सुंदर
जळजळीत ,
मार्मिक प्रहार !
हाहाहाहा
पुण्यात
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
:-)
ह्म्म
In reply to :-) by सहज
छान