Skip to main content

(चित्र)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 21/05/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल चित्र वाचली आणि काही दिवसापुर्वी इथे आलेल्या वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. उघडी पडली अर्थव्यवस्था, नवे प्रशासक झाले नि धाग्यातून झाली गणती, किती कफल्लक झाले! कशी, कधी या स्थळाची मंडई बनवली सांगा? असे, कसे हे सुजाण सगळे मुर्ख गिर्‍हाइक झाले? पाहा, पाहा पोतडीतले किती आयडी आले आणिबाणी उठली आणीक, किती विधायक झाले फरार झाला आहे मालक अशी वदंता होती अन पुर्वीचेपूजक त्याचे, सगळे मारक झाले नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले तुझ्या विडंबन चित्रा कैसे छान म्हणावे "केश्या"? तसे बरे नव्हते आधीही, अता विदारक झाले
लेखनविषय:

वाचने 1788
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुंदर विडंबन..... ताज्या संदर्भाची फोडणी छान बसलीय.... नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले "किती सुधारक झाले" नंतर प्रश्न चिन्ह हवय का? आंबोळी

सद्य स्थितीवर मार्मिक प्रहार ! विडंबन कवितांवर तुमचे प्रभुत्व अफाट आहे, खूप मजा येते तुमच्या कविता वाचून. सुरेखच ! आवडलं ! !

लै भारी विडंबन पण लाइव्ह मॅच केव्हाची होउन गेली महिन्यानी स्कोर कार्ड, रिपोर्ट दिल्यासारखे. टायमिंगभी कोई चीज होती है गुरुजी!

In reply to by सहज

त्या वेळेस पण आम्ही कटोरी फिरवली होती.. पण नंतर आलेल्या निवेदनांवर भाष्य बाकी होते..मधल्या काळात मल्लखांबा वरून गोलंदाजी ह्या विषयाचा क्लास लावला होता...त्यात जरा वेळ गेला..आणि योग्य कच्चामाल मंडईत नव्हता..असो.. प्रतिसादाबद्दल आभार..