Skip to main content

अंगाई

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 18/05/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा {जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून} अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई! गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई? शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई! देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली! नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!
लेखनविषय:

वाचने 1907
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई! - नुस्ती अंगाई नाही तर . . . यांनी गिळली तरुणाई. देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली - हे बरीक खरं हो !

तुमच्या लेखणीतून समर्थ काव्याची अपेक्षा असते. मूळ प्रस्थापित संदर्भांनाच उजाळा देणारी कविता पाहून निराशा झाली. लिंबोणीचं झाड ज्या क्रांतीतून उन्मळून पडलं तीतून नवनिर्माण काहीच झालं नाही का? नवीन अर्थ सापडले नाहीत तर विसर्जनासाठी गर्त का शोधू नये?

राजेशजींच्या मताशी सहमत. हे compliment च समजा. राग नसावा. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा मोठ्या आहेत एवढेच सुचवायचे आहे.