शुभ् प्रभात!!
मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय.
(कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!! शेवटी लेखणी दिली ठेवून अन कॅमेरा हाती घेतला. तर माझ्या अंगणी "सर" या शब्दाने मांडलेल्या खेळाच्या फोटोंचा हा "अल्बम ".)
शब्दखेळ
सर सर शिरवा; मनी गारवा ; पुन्हा श्रावण आला ग!
कंठी लेवून सर मोत्यांचा कुणी मिरवीते बाला ग!
सर येताच वर्गावरती कोलाहल तो शांतवला;
'सर' होऊन चेंडू फळीचा; कुणी लॉर्डस ही गाजविला!
सर सर कापीत अंतर वारू; वाऱ्यासव कुणी उधळविला,
सर करुनी किल्ला परतून तान्ह्याने (मालुसरे) भगवा फडकविला.
'सर आन्खोपे तुझे मागणे' म्हणुनी कोणी तुकवी मान.
'सर हाथोपे' घेवून तुडवी सैनिक रोज अनोखे रान.
सरळ चालली सरला तिजला सरपंच मधी भेटला,
बरे जाहले; फेरा चुकला; म्हणून अर्ज तिने सरकवला.
'सरवट' 'सरबत' दोघे भाऊ; थंडाव्याशी निगडीत,
'सर ना जरा' म्हणून कोणी भांडण खोका उघडीत.
"सर न यायची कुणास माझी " गर्व कुणाला झाला फार,
" सरण " शेवटी तुम्हा आम्हा ते करावया भवं सागर पार!!
सर्व प्रश्नान्ची उत्तरे दिली जातील्!!(अर्थात पडले तर)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3068
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरबत्ती
कविता आणि
दिमाग का धही
In reply to कविता आणि by रामदास
चुकीची
In reply to कविता आणि by रामदास
तरी लिंक देताना सांगितल होतं
शब्दांना
In reply to तरी लिंक देताना सांगितल होतं by jaypal
सरफरोशी...
हि कविता आहे कि दुसरा कोणता नवा पद्य प्रकार आहे?
तर माझ्या
कसर
'सर' ह्या