मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.
असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे. याच बरोबर मृत्यूमुळे घडणार्या घटनांचा मागोवा घेण्याबरोबरच थेट मृत्यूला भिडणारे काहि चित्रपट आहे. असेही अनेक चित्रपट आहेत मात्र इथे मी लिहिणार आहे सध्या मी पाहिलेल्या चित्रपटांबद्दल. प्रत्येक चित्रपटाने मृत्यूकडे केवळ वेगवेगळ्या तर्हेने पाहिलं नसून त्यावर स्वतःचं असं भाष्य केलं आहे.
पहिला चित्रपट आहे आपला मराठ्मोळा "सुखांत". संजय सूरकरने काढलेला हा चित्रपट पहाणे बरेच दिवस बाकी होते. मात्र बघितल्यावर विषय डोक्यातून जाईना. चित्रपट आहे एका अंथरुणाला खिळलेल्या श्रीमती सीता गुंजे (ज्योती चांदेकर) ह्या स्त्रीचा आणि तिच्यावर नितांत प्रेम करणार्या तिच्या वकील मुलाचा (अतुल कुलकर्णी), त्यांच्यातील नात्याचा आणि मुख्य म्हणजे मृत्यूचा. एका असाध्य आजाराने लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार सीताबाई गुंजे मागतात आणि ही मागणी मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावतात.
अतूल कुलकर्णी आपल्याच आईने केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात लढतो. त्या निकालाचे काय होते यासाठी तुम्ही चित्रपट बघाच. पण त्याहून महत्त्वाचे आहे सूरकरांनी विचार करायला लावणं. समाजात वावरताना काही व्यक्तींकडे बघितलं की वाटतं की यांना जिवंत का म्हणावं? फक्त श्वास चालु आहे म्हणून? मरणयातना भोगून त्यांना जगायला लावण्यापेक्षा त्यांना दयामरण का देऊ नये? चित्रपट छान आहेच पण त्याहीपेक्षा त्याने डोक्याचा पार भूगा करून टाकला
दुसरा चित्रपट आहे "डेड मॅन वॉकिंग". शॉन पेनचा अप्रतीम अभिनय आणि अत्यंत सशक्त कथा. शॉन पेन ला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. त्यांच्या मनात आहे तो फक्त द्वेष. अश्यावेळी तो एका मिशनरी ननला पत्र लिहून बोलावतो. दोघांमधली ओळख वाढत जाते. मी खून केलेला नाहि असे ह्या गुन्हेगाराचे म्हणणे असते. एक शांत नन व एक खून व बलात्काराच्या आरोपांबद्द्ल मृत्यूदंड झालेला गुन्हेगार यांच्यातले संवाद अतिशय रोचक आहेत.
शॉनने खरंच गुन्हा केला असतो का? त्याला मृत्यूदंड देणे बरोबर असते का? ह्या गोष्टी चांगल्या फूलवल्या आहेतच पण त्याच बरोबर प्रेक्षक विचार करू लागतो की मुळात मृत्यूदंड देणेच गरजेचे आहे का? मृत्यूदंड हा "इर्रिवर्सिबल" दंड झाला. जर गुन्हेगाराने हा गुन्हा केलाच नव्हता असे कालांतराने सिद्ध झाले तर हा दंड म्हणजे सरळ सरळ गुन्हेगार नसणार्याचा खून झाला. यात शॉनचे एक वाक्य फारच मस्त आहे "याक्षणी इतके नक्की सांगु शकतो की एखाद्याचा जीव घेणे अतिशय वाईट गोष्ट आहे. मग तो जीव मी घेतला सो, तुम्ही घेतला असो किंवा तुमच्या सरकारने". मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लावणारा हा चित्रपट. चुकवू नये असा.
अजून एक चित्रपट आहे, "टाईम टू किल". एखाद्या व्यक्तीने विषिष्ट परिस्थितीत केलेला खून हा खून समजला जात नाहि. मात्र या चित्रपटात तो खून न्यायालयातच घडतो. एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीच्या ९ वर्षाच्या मूलीवर दोन गोरे नराधम बलात्कार करतात. यामुळे पेटलेला हा नायक, त्यांना कोर्टात घेऊन जात असताना दोघांना मारून टाकतो. की कथा त्यानंतरच्या न्यायालयिन लढाईवर आहे.
संपूर्ण जुन्यावळणाचे गोरे ज्यूरी ह्या कृष्णवर्णीय व्यक्तीला खूनाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देतात का? मृत्यूदंड देताना केवळ गुन्हा बघितला जातो की गुन्हेगाराचा वंश, रंग वगैरेही लक्षात हेतल्या जातात? ह्यावर चित्रपट सुंदर भाष्य करतो.
याव्यतिरिक्त काल एक इराणी चित्रपट पाहिला "टेस्ट ऑफ चेरीज". हा ही मॄत्यूला थेट भेटायला आतूर असलेला चित्रपट. चित्रपट सूरू होतो एका मध्यामवतीन व्यक्तीपासून. तो तेहरानमधे एका रोजगार-नाक्यावर कोणी 'लायक' व्यक्ती शोधतो आहे. पण त्याला हवी तशी व्यक्ती न दिसल्याने तो शहराबाहेरच्या निर्जन विभागात जातो. इथे आधी कळतच नाहि की असं कसलं काम आहे की तो माणूस शोधतोय. पुढे तो वेगवेगळ्या लोकांना काम करणार का विचारतो. त्यासाठी प्रचंडमोठा मोबदला देण्याचंही कबूल करतो. मात्र काय काम ते सांगत नाहि.
त्यामुळे अगदी कचराउचलणारा, पडक्या गराजचा मालकही त्याचा नकार देतो. पुढे तो एका तरूण सैनिकाला लिफ्ट देतो. त्याला कामाची थोडी कल्पना देतो तर तो सैनिक घाबरून गाडीतून उडी टाकून पळून जातो. हळुहळू प्रेक्षकाला उलगडु लागते की काम काय आहे. काम असे असते, की त्या रात्री ह्या व्यक्तीने आत्महत्या करायची ठरवले असते, आणि जर तो मेला तर त्याला जमिनीत गाडण्याची मदत त्याला हवी असते.
सबंध चित्रपटात त्याला का मरायचे आहे हे कळत नाहि. मात्र त्याची अत्महत्येच्या आधीची घालमेल छोट्या छोट्या प्रसंगांतून छन उलगडलि आहे. पुढे त्याला काय अनुभव येतात? कोणी मदत करते का? वगैरे प्रश्न कथेवरोबर हळूवार पणे उलगडत जातात. जरा चित्रपट स्लो आहे. शिवाय तो कोणत्याही शेवटाला पोहोचण्या आधीच संपतो. पण तरीही मृत्यूला भेटायला उत्सूक असणार्या ह्या व्यक्तीचा एक दिवस आपल्याला खूप विचार करायला मात्र लावतो.
या सगळ्या चित्रपटांतून मृत्यू वेगवेगळ्या रुपात भेटला. त्याची क्रुरता, त्याची ओढ, त्याची अपरिहार्यता, त्याची आसक्ती, त्याची भिती, त्याचा ध्यास, त्याचा माणसाअ माणसाला दिसणारा वेगळा रंग उलगडत गेला. मृत्यूला वेगवेगळ्या रंगांत, ढंगांत बघताना जाणवतो तो म्हणए मृत्यूचा थंडपणा. मृत्यूच्या आधी वा नंतर काहिहि घडो आल्यावेली तो येतो आणि थंडपणे दिलेले काम करतो
मृत्यूवरच्या चित्रपटांचा परिचय इथेच संपवणार होतो. पण काहितरी राहिल्यासारखे वाटत होते. ह्या मृत्यूने डोक्यात आलेलं विचारांचं वादळ केवळ गद्यात बांधता आलं नाहि. त्यामुळे हा लेख लिहिताना काहि ओळी सुचल्या त्याही देतो:
आज पुन्हा मरणास पाहिले
मृत्यूच्या जगण्यास पाहिले
त्या वृद्धेच्या मिटत्या डोळी
त्या अनवट नेमक्या अवेळी
डोळ्यांमधले कृतार्थ अश्रू
गंगाजल ओठांस लाविले||
फासावरचा ओघळ मोठा
प्रत्येकाच्या डोळी होता
डोळ्यांस झेपत नसताही
हिय्या करूनी त्यास पाहिले||
वेळ संपली नराधमाची
चक्काचुर होळी स्वप्नांची
किंकाळी फुटण्याच्या आधी
त्यास नळीच्या आत पाहिले||
झोपेच्या गोळ्यांची घुंदी
कधी उतरली नाहि त्याची
अन स्वप्नांच्या गावामध्ये
त्यास एकदा सोडून पाहिले||
दूर्धरातला दूर्धर रोगी
मृत्यूशय्येवरचा योगी
त्याच्याओठी हास्य पाहूनी
मृत्यूचे मी मरण पाहिले||

वाचने
8395
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
+१
In reply to सुंदर by भारद्वाज
उत्तम...
सहमत!!!
In reply to उत्तम... by बिपिन कार्यकर्ते
कविता खूप
.....
सुखांत आणि
लेख अतिशय,
अरेरे!
In reply to लेख अतिशय, by शुचि
छान लेख व कविताही सुंदर
छान लेख
लेख आवडला.
लेख आवडला.
टाईम टु
चांगली ओळख
लेख आणि
+१
In reply to लेख आणि by मदनबाण
चार चित्रपट....
ॠषिकेश,
अप्रतिम . . .
असेच
In reply to अप्रतिम . . . by दत्ता काळे
कविता
सहमत
In reply to कविता by श्रावण मोडक
विचार
सगळ्या
कविता आवडली
लेख आवडला,