✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

र
राजेश घासकडवी यांनी
Sun, 05/16/2010 - 11:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10529 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

मी ११ जून ला पोचतो आहे

बेसनलाडू
Sun, 05/16/2010 - 11:52 नवीन
मी ११ जून ला पोचतो आहे. १६ जुलैपर्यंत देशात असेन. काहीशी धावपळ असेल. पुण्यामुंबईव्यतिरिक्त कदाचित अन्यत्रही भटकत असेन. मात्र वेळात वेळ काढून भेटीचा योग साधता आल्यास, पुण्यामुंबईकडच्या अनेक मिसळपावकरांना एकत्रित भेटता आल्यास उत्तम! (सामूहिक)बेसनलाडू जमल्यास कधी कुठे भेटायचे सांगा. त्यानुसार संपर्क व्यवस्था कळवतो. येथे मिल्पिटासमध्येच भेटायचे झाल्यास तसेही सांगा. त्यानुसारची (वेगळी) संपर्क व्यवस्था कळवतो. (संपर्कसाधू)बेसनलाडू बाकी देशात जायचे, कितीही वार्‍या करायचे सुख वेगळेच. येथे राहून देशाची वारी ही मी पंढरीच्या वारीइतकीच पुण्याईची समजतो. (पुण्यवान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

milpitas मध्ये

शिल्पा ब
Mon, 05/17/2010 - 11:41 नवीन
milpitas मध्ये कुठे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

नॉर्थ मिल्पिटास बुलवा - स्टारबक्स

बेसनलाडू
Mon, 05/17/2010 - 12:58 नवीन
आजच नॉर्थ मिल्पिटास बुलवावरील स्टारबक्स मधे श्री. घासकडवी महोदय, सौ. घासकडवी आणि चि. घासकडवी यांची भेट झाली. तीनेक तास नानाविध विषयांवर गप्पा रंगल्या. (गप्पिष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मजा आहे

शुचि
Mon, 05/17/2010 - 18:25 नवीन
मजा आहे बुवा तुमची. आमच्या शहरात कोणी येतच नाही. बहुतेक मीनल येतेय पण : ). मी भेटणारे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मी ही...

प्राजु
Mon, 05/17/2010 - 22:59 नवीन
११-१८ जून दरम्यान जे फ्लाईट मिळेल त्या फ्लाईट ने भारतात येते आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

राजेशजी मायभुमीत आपले स्वागत असो

jaypal
Sun, 05/16/2010 - 12:02 नवीन
खुप भावनाप्रधान होउन लेख लिहलात ते जाणवत. =D> जुन्या आठवात हारवलात ना? (या!! या !! भानावर या आता.२० तारखेला यायचय ना? :) ) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

उत्तम मनोगत

वाचक
Mon, 05/17/2010 - 06:57 नवीन
मातृभूमीची आठवण अशी सहजा सहजी पुसली जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही. शेवटी ते आपल्या 'जीन्स' मधेच लिहिले गेले आहे, पुलंनी म्हंटल्याप्रमाणे 'अंतरीचा आत्माराम कधी कुठल्या गोष्टीची मागणी करेल हे काही सांगता येत नाही' - मग ते पिठले असो की भारत वारी. मस्त मजा करुन या. शुभास्ते पंथान:
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

Nile
Mon, 05/17/2010 - 07:01 नवीन
मातृभूमीची आठवण अशी सहजा सहजी पुसली जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही
हेच. शेवटच्या उतार्‍यातील भावना ओळखीच्या! शुभास्ते पंथान संतु! मजा करा! :) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

सही

अप्पा जोगळेकर
Sun, 05/16/2010 - 18:03 नवीन
सही लिहिलंय. एकदम टची. भावना पिळून काढण्यासाठीचे चरकसुद्धा नाहीत. जास्तीत जास्त नैसर्गिक वाटलं. सगळे स्वकीय भेटोत अशा शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

या हो या

पाषाणभेद
Sun, 05/16/2010 - 18:08 नवीन
या हो या तुम्ही. देश अन आम्हीही तुमचेच आहोत. तुमच्यासारखीच परिस्थिती दुसर्‍यांचीही झालेली असेल. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

जननी

अरुंधती
Sun, 05/16/2010 - 18:33 नवीन
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि | मातृभूमीत स्वागत :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गुर्जी,

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 05/16/2010 - 18:40 नवीन
:-) गुर्जी, नक्कीच भेटू या! अदिती
  • Log in or register to post comments

२२ मे

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 05/17/2010 - 03:25 नवीन
मी २२ मेला पोचणार आहे. जमल्यास भेटू. लेख फारसा आवडला नाही.
  • Log in or register to post comments

अन्यत्र

ऋषिकेश
Sun, 05/16/2010 - 18:43 नवीन
अन्यत्र दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे: या या.. आपल्या भारतात तुमचे स्वागत आहे :) या गाण्याची जादु मी अनुभवली नसली तरी अमेरिकेत असताना स्वदेस रिलिज झाला व त्यातील "ये जो देस है तेरा..." या गाण्याने काळीज पिळवटून निघालं होतं... तसंही मी अमेरिकेत फारसा रमत नाहि.. सुरवातीला एक-दिड वर्ष काढलं तेवढंच.. नंतर फक्त छोट्या छोट्या (२-३ महिन्यांच्या) ट्रिपा मारतो झालं. तर ते असो.. येताय तेव्हा भेटायला नक्की आवडेल.. बाकी व्यनीतून या निमित्ताने मी गेल्यावर्षी एका विशिष्ठ अनुभवामुळे कुंपणावरच्या मित्रांसाठी काहि ओळी लिहिल्या होत्या त्या आठवल्या.. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

स्वदेस

लंबूटांग
Sun, 05/16/2010 - 20:57 नवीन
>>>त्यातील "ये जो देस है तेरा..." या गाण्याने काळीज पिळवटून निघालं होतं.. :( अगदी .. मी हे गाणे कितीही छान असले तरी म्हणूनच ऐकत नाही ... ऐकवत नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मीही.

रेवती
गुरुवार, 09/23/2010 - 19:49 नवीन
मीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

या...

श्रावण मोडक
Sun, 05/16/2010 - 18:56 नवीन
या. वाट पाहतोय. स्वगत: जून हा माहेरपणाचा सीझन दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

मुलांच्या उन्हाळ्याच्या

रेवती
गुरुवार, 09/23/2010 - 19:50 नवीन
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतात तेंव्हा!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मनातले

sur_nair
Sun, 05/16/2010 - 19:26 नवीन
स्वताच्या मनातले आणि आमच्याही मनाचे बोललात. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काही वेगळ्याच असतात. कधी पुण्याला गेलो कि पुन्हा मित्रांबरोबर अमृततुल्यात्ला चहा घेताना वाटते कि फक्त चहाची किंमत १ रुपयातून १० रुपये झाली, बाकी सर्व तसेच राहिले. तुमची भेट अशीच सफल होवो.
  • Log in or register to post comments

वन्नकम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/16/2010 - 21:10 नवीन
स्वागत आहे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वेल्कम सर,

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/16/2010 - 22:34 नवीन
वेल्कम सर, वेल्कम. नुसतं भारतातंच नव्हे तर या आयड्यांच्या भूलघालू जगातही. भेटूच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

नीलकांत
Mon, 05/17/2010 - 08:53 नवीन
हेच म्हणतो, तुमचे स्वागत आहे. - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वेल्कम, नुसतं भारतातंच नव्हे तर या आयड्यांच्या भूलघालू जगातही.

वाहीदा
Mon, 05/17/2010 - 18:14 नवीन
+१ सहमत ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

त्या

Pain
Mon, 05/17/2010 - 00:37 नवीन
त्या रात्री भले भले रडले.... पुरुष रडत नाहीत !
  • Log in or register to post comments

जावईशोध

बेसनलाडू
Mon, 05/17/2010 - 00:41 नवीन
पुरुष रडत नाहीत हा जावईशोध कुणी कसा लावला असावा बरे? अगदी धाय मोकलून रडत नसले तरी सद्गतित होत असावेत, गहिवरून डोळ्यांत पाणी येत असावे, असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

आणि

भडकमकर मास्तर
Mon, 05/17/2010 - 00:52 नवीन
आणि प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे दारू पिऊन / आठवणींनी भावनिक होऊन रडण्याची तर भरपूरच शक्यता... _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आणि हो,

Pain
Mon, 05/17/2010 - 00:59 नवीन
आणि हो, दारुही पिउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

आणि हो

ब्रिटिश टिंग्या
Mon, 05/17/2010 - 10:24 नवीन
>>आणि हो आपण कोल्हापुरला असता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

शक्यता कमी

टारझन
Mon, 05/17/2010 - 10:44 नवीन
टिंगुस .. ते "आणि हो" नसुन "आणि हो," आहे ... :) तेंव्हा कोल्हापुरचे असण्याची शक्यता कमीच आणि हो बाकी काय म्हणता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

रडणे

Pain
Mon, 05/17/2010 - 00:51 नवीन
रडणे अपेक्षित नाही. किमान एवढ्या साध्या गोष्टीसाठी तरी नाही. याउप्पर तुमची मर्जी...
  • Log in or register to post comments

किमान-कमाल कसे ठरवायचे?

बेसनलाडू
Mon, 05/17/2010 - 01:17 नवीन
साधी गोष्ट, खास गोष्ट हे सगळे कुणी कसे ठरवायचे? त्या गोष्टी सापेक्ष नव्हेत काय? (निरपेक्ष)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

काही

शिल्पा ब
Mon, 05/17/2010 - 11:47 नवीन
काही लोकांना नाहीच समजत....स्वतःचे मत दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न कशाला करायचा...ज्याच्या त्याचा भावना... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

शब्द्च्छल

Pain
Mon, 05/17/2010 - 01:58 नवीन
ठीक आहे. उदाहरण देतो. परिवारातील कोणाचे निधन झाल्यास रडणे समजण्यासारखे आहे. इथे लेखक काही काळानंतर घरच्यांना भेटू शकला असता.मस्तपैकी ३ जुन्या, चांगल्या मित्रांबरोबर राहात होता, त्यात बाकी सगळे भेटायला आले.मग कशाला रडायचे ?
  • Log in or register to post comments

काही काळानंतर = ?

बेसनलाडू
Mon, 05/17/2010 - 02:35 नवीन
१. मी अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे. तरीही प्रत्येक वेळी भारतातून अमेरिकेत परतताना माझ्या आईप्रमाणेच वडिलांच्याही डोळ्यांत पाणी येते. २. कॉलेजातील दोन जिवलग मित्रांना पहिल्यांदा भेटलो ते कॉलेज सोडून एक-दीड वर्ष(च) लोटल्यावर. त्याप्रसंगी त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यांत पाणी आले होते. सारांश - डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग दु:खाच्या वेळीच येतो असे नाही; आनंदाश्रू नावाचा प्रकारही असतो. अभिमानाने डोळे भरून येणे (इत्यादी इत्यादी) असते. त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) पण भावनिक जवळीक असणे आणि स्वतःला व्यक्त करता येणे, याच्याशी जास्त असतो. असो. (सुस्पष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

मीपण

Pain
Mon, 05/17/2010 - 13:03 नवीन
मीपण अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. माझ्या बाबांच्या डोळ्यातून पाणी नाही आले. मला त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि फार आवडते. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे :खूप जळजळ वाटते :D असो. डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग: आनंदाश्रू किंवा अभिमानाचा प्रसंग, यात तुमचे बरोबर असावे (मला अनुभव नाही) मी फक्त दु:खाच्या वेळच बोलत आहे. मानसिक कणखरपणा असणे/ नसणे हा माझा मुद्दा होता. आणि त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) : तुमचे बरोबर आहे. मी प्रचलित आणि आवडत्या समजानुसार टीपणी* केली होती. (just my opinion, not a fact)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आईप्रमाणेच वडिलांच्याही

रेवती
गुरुवार, 09/23/2010 - 19:54 नवीन
आईप्रमाणेच वडिलांच्याही डोळ्यांत पाणी येते. त्याबद्दल काही म्हणायची सोय नाही आमच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आपल्याला

शुचि
Mon, 05/17/2010 - 02:16 नवीन
आपल्याला प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा. फोटो काढा भरपूर. जरूर प्रवास वर्णन लिहा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा!

Pain
Mon, 05/17/2010 - 03:35 नवीन
हे तर राहिलेच ! आईच्या हातचे खा, सगळ्यांना भेटा, मजा करा :)
  • Log in or register to post comments

हॅपी जर्नी

सहज
Mon, 05/17/2010 - 06:47 नवीन
कोणीही कितीही विसरभोळा, माणुसघाणा असला तरी कुठेतरी स्व:ताला आभासी जीवनाचा फायदा घेउन माणसात गुंतवत असतोच. त्यातुन एखाद्याला लोकात मिसळणे(किंवा घाउक द्वेष करायला), गप्पा(टोमणे) मारायला आवडत असेल तर मसंस्थळाचे व्यसनात रुपांतर कधी होते कळतही नाही. पुढे कधीतरी याचा परिणाम पेट्या इकडून तिकडे करण्यात होते. फायनान्शीयल इन्व्हेस्टमेंटचे फारसे कौतुक नसले तरी इमोशनल इन्व्हेस्टमेंट डे ट्रेडिंगप्रमाणे वर खाली अगदी विथ लिव्हरेजेस! आणी मग द रेस्ट इज हिस्ट्री. हॅपी जर्नी. जाताजाता: माझ्या एका सहीप्रेमी मित्राला तुमची भेट घ्यायला नक्की सांगीन.
  • Log in or register to post comments

हाहाहा

श्रावण मोडक
Mon, 05/17/2010 - 17:22 नवीन
जाताजाता: माझ्या एका सहीप्रेमी मित्राला तुमची भेट घ्यायला नक्की सांगीन.
हाहाहाहा... हे धंदेही???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हिंदुस्था

मदनबाण
Mon, 05/17/2010 - 09:08 नवीन
हिंदुस्थानात स्वागत आहे... लेख आवडला... :) मदनबाण..... "Life is an art of drawing without an eraser." John Gardner
  • Log in or register to post comments

मधुबाला

युयुत्सु
Mon, 05/17/2010 - 17:24 नवीन
मधुबाला पुसली गेल्याचं उडत उडत कळलं तेव्हा खूप काही हरवल्यासारखं वाटलं.
घाश्यानं ४० पेन्सिली वापरून काढलेली मधुबाला भन्नाट होती बरं का? मी ती बघितलेली आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

घाश्यानं

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/17/2010 - 18:09 नवीन
घाश्यानं ४० पेन्सिली वापरून काढलेली मधुबाला भन्नाट होती बरं का? मी ती बघितलेली आहे.
त्यामुळेच ती पुढे आपणहुन अदृष्य झाली असावी. ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

>>>

टारझन
Mon, 05/17/2010 - 21:17 नवीन
>>> त्यामुळेच ती पुढे आपणहुन अदृष्य झाली असावी. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) किंबहुणा पहायला गेले माधुरी ... आणि दिसला मधुर (भांडारकर हो) .. =)) असं नाही ना झालं ? ©º°¨¨°º© लारा ©º°¨¨°º© आमचे जंगल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खुपच

टुकुल
Mon, 05/17/2010 - 17:59 नवीन
खुपच मनापासुन लिहिल आहे. या तुम्ही, पुण्यातल्या एखाद्या कट्याला आपली गाठभेट होइल :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

परदेशात

अमोल केळकर
Mon, 05/17/2010 - 18:15 नवीन
परदेशात रहाणार्‍यांच्या मातृभुमी बद्दलच्या भावना या आपल्या लेखातून छान मांडल्या आहेत :) अवांतरः (आमच्या साठी तर मुंबई हे आमचे परदेश आणि सांगली ही मातृभुमी आपण वर्णन केलेल्या सर्व भावना आमच्या सांगली - मुंबई वार्‍यांसाठीही लागू होतात ) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

+१ सहमत

आम्हाघरीधन
Mon, 05/17/2010 - 21:39 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

+५०

टारझन
Mon, 05/17/2010 - 22:02 नवीन
मी सुद्धा मुंबैत असतो .. पण मी पुण्याला राहातो. एव्हरी विकेंड पुण्याला पळतो. काय सांगु .. शुक्रवारी जेंव्हा मी पुण्याला जायला रेडी होतो .. तेंव्हा आमच्या पुर्ण क्युबिकल मधली लोकं धाय मोकुन रडतात , (उर बडवतात म्हणाना) .. आणि निघण्या आधी घरी फोन केला की आई तर तिथेच रडायला लागते ... :) घरी गेलो ... की आई बाबा भाऊ बहिण .. असे लायनी ने रडायला बसलेले असतात , आम्ही सगळे यमणात रडतो. असा अर्धा एक तास रडुन होई पर्यंत घरायलं सामाण अश्रुंच्या तळ्यावर तरंगायला लागतं .... मग आम्ही थांबतो आणि नेटाने पुन्हा घर स्वच्छ करतो. असाच कार्यक्रम मी सोमवारी सकाळी निघताना पुन्हा एकदा होतो . गेल्या पाच आठवड्यांत मी पाच वेळा गेलो , तरीही असेच होते हे वैषिष्ठ्य ;) - असेच रडारडवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन

+५००

Dhananjay Borgaonkar
Mon, 05/17/2010 - 23:11 नवीन
आम्ही पण ४ वर्षे मुंबईत काढली. दर शुक्रवारी पुणे आणि सोम्वारी मुंबै. स्वदेस पाहिला सेंटी झालो आणि तडक पुण्यात निघुन आलो.. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

परदेशस्थ

अप्पा जोगळेकर
Mon, 05/17/2010 - 19:03 नवीन
परदेशस्थ भारतीय खूप झालेत बॉ इकडे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा