एक प्रसंग - पुण्य लादण्याचा
"अहो .. उठा .. लवकर उठा" - बायको मला झोपेतून उठवण्यासाठी गदगदा हालवून जागं करत होती.
तिच्या आवाजाचा सूर आग लागली आहे किंवा भूकंप झाला आहे अश्या सूचनेसारखा वाटत होता.
मी दचकून उठत विचारलं " काय गं ? "
"अहो, बाहेर तर या ..गॅलरीत".
मी डोळे चोळंत, चष्मा घालून गॅलरीत आलो. " ते पहा अंगणात" ती म्हणाली.
अंगणात विशेष असं काहीही दिसलं नाही . फक्त एक कावळा एका बारक्या सरड्याला चोचीत धरून जमीनीवर आपटंत होता. तो सरडा जरा चोचीतून सुटला कि कुंपणाच्या दिशेने धावायचा प्रयत्न करायचा आणि हा त्याला परत धरून उचलून आपटायचा.
इथे कुठे काय आहे ? कावळाच तर दिसतोय .. मी
" कावळा ? ... अहो चष्मा घातलाय नां ? कावळा आणि भारद्वाज मधला फरक कळंत नाही ?
रात्री उशीरापर्यंत भारत विरुध्द श्रीलंका वर्ल्ड कपचा टी-२० चा, भारत हरलेला सामना मी उगाचच जागरण करून बघितला. माझे डोळे लाल झालेले . . त्यामुळे कदाचित मला फरक लक्षात आला नसावा. मी त्या पक्ष्याकडे निरखून बघितलं. तो भारद्वाजच होता. त्यानेही त्याच्या लाल डोळ्यानी माझ्याकडे बघितलं आणि परत सरडा चिवडायला सुरवात केली. आमच्या पक्षीमित्र किरण पुरंदरेनी त्याच्या रानभूली कार्यक्रमातून ह्या पक्ष्याची ओळख करून देताना सांगितलं होतं कि, ह्या पक्ष्याला ' नपिता' असेही म्हणतात. न पिता डोळे लाल.
मी म्हटलं " हं, भारद्वाजच आहे"... पण, तु हा दाखवायला माझी झोपमोड केलीस, ग्रेट .. ! "मि. काळे . . " ती वैतागून म्हटली.
ती अशी वैतागली असेल तेव्हा, मला प्रापंचिक उपदेश करायचा असेल तेव्हा आणि नंतर पाणउतारा करायचा असेल तेव्हा, -अहो - असं न म्हणता " मि. काळे" असे ऑफिशियल संबोधन वापरते.
"मि.काळे, सक्काळी-सकाळी भारद्वाज पक्ष्याचं दर्शन आपसूक होणं हे भाग्याचं लक्षण आहे असं मानतात"
बरं मग? . . . मी
बरं मग काय बरं मग . . तुम्हाला ते भाग्य मिळावं म्हणून, तो निघून जायचा आंत मी तुम्हाला उठवलं. समजलं ???
अगं, ते आपसूक होणंसुध्दा महत्वाचं नाही कां ? इथे तू मला गदगदा हालवून, झोपेतून जागं करून त्याचं दर्शन घ्यायला लावतेस. असलं कसलं आलंय भाग्यं . . त्यातून असल्या थोतांड गोष्टीवर माझा काडीमात्र विश्वास नाहीये. तुला कुणीही, काहीही सांगत आणि तू ऐकतेस. एकतर काल भारत हरलेला . . त्यातून हे . . माझ्या बोलण्यात बराच ताव आलेला.
"हॅलो .. हॅलो .. मि. काळे," माझ्या खांद्याला हात लावून ती म्हणाली "सध्या अधिकमास चालू आहे आणि अधिकमासात कुठलेही पुण्यकर्म, अगदी हात जोडून देवाला सदभावे केलेला नमस्कार सुध्दा, बरेच पुण्य देऊन जातो" .
हात् तिच्या . . इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता. त्याच्याकडे हात दाखवून मी तिला म्हणालो ' तो बघ, तुझा पक्षीदेव, सरड्याला कुंपणापर्यंतसुध्दा न जावू देता( खरं म्हणजे - न धावू देता) , स्वतःसाठी बळी चढवून घेतोय". छोट्या सुरीसृप हत्येच पाप करणारा तो लाल डोळेवाला नपिता माझ्या नजरेतूनच उतरला होता. "मि. काळे, राहू द्या. चला, आत चला " असे प्रगटपणे आणि नंतर . . हा माणूस प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवतो ..असे पुटपुटंत ती घरात निघून गेली. मीही आत आलो, म्हणालो " चहा . . .? " माझ्याकडे कठोरकर्तव्य नजरेतून पहात शांतपणे म्हणाली " नमस्कार केलांत ? "
" अरे . . दररोज कुठे नमस्कार करतो मी . चहा मिळण्याकरता " - मी
"मला नाही. त्याला."
"त्या. . त्या ..सरडातोड्या भारद्वाजाला ?" काय, वेडीयेस कां तू ?" अंधश्रध्दा ही श्रध्देपेक्षा पावरबाज असते हेच खरं
"हे बघ, मला चहा दिला नाहीस तरी चालेल . . . काहीतरी काय खुळेपणा"
" अहो . . .( आली नॉर्मलला), मी फक्त अधिकमास चालू आहे म्हणून म्हणाले" एरवी मी तुम्हाला देवधर्माची जबरदस्ती करते कां ?"
" ती कर एकवेळा, पण हे काय, ह्याला नमस्कार कर, त्याला नमस्कार कर . . . चल चहा दे लवकर . . !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फार मस्त
हॅ हॅ
मि. काळे चे
(विषय दिलेला नाही)
स्सही.............
मस्त मस्त
एकदम हलका
ए१ इथे हि
ब्येष्ट! आण
मि.
अरु चा
खरंच शुभशकुन
मस्त..
पण बायका
शुचि,
-Nile
ती अशी
किस्सा मजेशीर, मनोरंजक वाटला
+१
चहा
"
छान!!!
जबरदस्त
जबर्या लेख !
तुमचे डोळे
"जुना साधु" पण असु शकतो
एकदम
मस्त!
मस्त
हा मजेदार किस्सा वर आणते आहे.
नपिता