आई
आई
मी सावलीत होतो कल्पतरूच्या
तोवरी जाण नव्हती...
तो कल्पतरू जळत होता,
ज्याची मला तहान होती....
वात्सल्याच्या चार भावना,
कुठल्या कुठे विरून गेल्या....
माणुसकी जिथे मातीत मिसळली ,
ती मातीसुद्धा अजाण होती....
अगतिक मी प्रेमाच्या शोधात
चार दिशात हिंडलो.
राहूनी या धरेवरती
त्या परमेश्वराची आस होती.....
शेवटी फिरूनी थकलो,
आलो कल्पतरूच्या छायेत..
खरच परमेश्वरच स्थिरवला होता,
त्या कल्पतरूच्या मायेत....
मिळाली तिची छाया
साताजन्माची उतराई होती,
तिच्या कुशीत शांतपणे घेणारी
ती कल्पतरू माझी आई होती.......
-निशांत (पंचम)
लेखनविषय:
याद्या
1531
प्रतिक्रिया
6
काव्यरस
मिसळपाव
कविता
व्वा.
सुरेख!! -
मां तुझे सलाम ....
क्या कहने
In reply to मां तुझे सलाम .... by वाहीदा
सुंदर