मोहरवणी..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in पाककृती
2 Apr 2008 - 2:49 pm

राम राम मंडळी,

अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक!

मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे! :)

साहित्य -

दोन कैर्‍या
एक चहाचा चमचा मोहरी
दोन हिरव्या मिरच्या
गूळ
नारळ
मीठ

फोडणीचे साहित्य -

साजूक तूप
जिरं.

कृती -

प्रथम कैर्‍या उकडून घ्यायच्या व त्याचा पन्ह्याला काढतो तसा गर काढायचा. त्यात कैर्‍यांच्या आंबटपणानुसार (काही कैर्‍या ह्या फारच आंबट असतात तर काही त्या मानाने इतक्या आंबट नसतात,) गूळ घालायचा व अंदाजाने मीठ घालावं व ते मिश्रण डावाने सारखं करून ठेवावं.

वाटणाचा क्रम -

प्रथम मिक्सरमध्ये मोहरी, थोडं मीठ, मिरच्या व किंचित पाणी घालून ते मिश्रण झकासपैकी वाटून घ्यावं! थोडं पाणी घातल्याने मोहरी छान चढते!

वरील मिश्रण चांगलं वाटून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटीभर खोवलेला ताजा नारळ घालावा व घातलेल्या नारळासकट पुन्हा ते मिश्रण नारळ अगदी छान वाटला जाईपर्यंत वाटावं!

त्यानंतर कैरीगुळाचं ते मगाशी सारखं करून ठेवलेलं मिश्रण मिक्सरमध्ये घालावं आणि सगळंच मिश्रण पुन्हा एकदा अगदी एकजीव होईपर्यंत वाटावं.

त्यानंतर त्या वाटणात भातासोबत जेवता येईल इतपत किंवा कढीइतपत पात्तळ होईल तितकं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर ते मिश्रण डावेने छान ढवळून घ्यावं व वरतून साजूकतूप जिर्‍याची चांगली चरचरीत फोडणी द्यावी! (गॅसवर गरम करू नये.)

बस! झाली मोहरवणी तयार!!

चुलीवरचा गरमागरम भात, त्यावर मोहरवणी आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड!

खल्लास..!!

साला, एकदा खाऊन तर बघा आणि सांगा मला कशी लागते मोहरवणी आणि सोबत गरमागरम भात!

हा प्रकार भातासोबतही खाता येतो म्हटलं तर मस्त मिटक्या मारीत चवीने चमचाचमचा पिताही येतो!

"प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं!"

या एकाच वाक्यात मोहरवणीचं व्यक्तिचित्र रंगवता येईल! :)

"चला, उशीर झालाय, आता निघायला हवं! त्या अनुष्काला आज मोहरवणीची पाकृ शिकवायला जायचंय! आज शुटिंगला सुट्टी घेऊन बाजारातून कैर्‍या आणून ठेवायला सांगितलंय गधडीला! :)
(स्वगत!)

आपला,
(मोहरवणीइतक्याच चविष्ट असलेल्या अनुष्काचा प्रेमी) तात्या देवगडकर.

पाकक्रियामाहितीआस्वादशिक्षणमौजमजा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 3:07 pm | मनस्वी

प्रथमच ऐकला असा पदार्थ. इंटरेस्टींग वाटतोय! करून बघायला हवा.

ही मोहरवणीची पाकृ आमच्या मातोश्रींना दाखवतो.म्हणजे आमची सोय होईल.

( वेलची घातलेल पन्ह आवडीने पिणारा )
मदनबाण

कैरी ऐवजी हे अननस तसेच स्ट्रॉबेरी वापरुन ही करुता येते...
केळी वापरली तर फक्त त्यात लिंबू पिळावे लागते...
............सैपाकात बरेच ट्राय कारणारा विजुभाऊ

प्राजु's picture

2 Apr 2008 - 6:50 pm | प्राजु

आता खुद्द मालकच बल्लवाचार्य झाले. स्वाती, पेठकर साहेब आता तुम्हाला स्पर्धा आहे.

तात्या,
हा पदार्थ नविनच आहे. आता देशात आल्यावर कैर्‍या असतील आलेल्या ... नक्की करेन. किंवा आईला करायला सांगेन.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर

आता खुद्द मालकच बल्लवाचार्य झाले.

अरे बाबा प्रस्थापितांच्या जगात एक स्वतंत्र संस्थळ काढून चालवायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? सगळ्या गोष्टी कराव्या लागतात! :)

आणि त्याकरता चौफेर प्रतिभा लागते बरं का प्राजू मॅडम! कधी व्यक्तिचित्रं, तर कधी शेअरबाजार, कधी संगीत, तर कधी पाककृती! सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत बाब्बा! :)

तात्या.

प्राजु's picture

2 Apr 2008 - 7:00 pm | प्राजु

अरे बाबा प्रस्थापितांच्या जगात एक स्वतंत्र संस्थळ काढून चालवायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? सगळ्या गोष्टी कराव्या लागतात! :)

छे.. खायचं काम नाही हो. खायचं काम म्हणजे आता ही मोहरवणी आहे... :)))

आवांतर : चौफेर प्रतिभा मात्र तुमच्याकडे आहे हे नक्की.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

ठणठणपाळ's picture

2 Apr 2008 - 7:59 pm | ठणठणपाळ

मस्त पाककृती आहे. मी इथे हॉस्टेलमधे राहत असल्यामुळे मला काही खाता यायची नाही. उगीचंच वाचलं असं वाटतंय.
बरं, यासाठी कैर्‍या चोरलेल्याच असाव्या लागतात का?

>>(मोहरवणीइतक्याच चविष्ट असलेल्या अनुष्काचा प्रेमी)
अजून कोणकोणाची चव बघितली आहे तात्या तुम्ही?

ठणठणपाळ

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 11:32 pm | विसोबा खेचर

बरं, यासाठी कैर्‍या चोरलेल्याच असाव्या लागतात का?

हो, चोरलेल्या कैर्‍यांची मजाच वेगळी! कैर्‍या चोरलेल्या असल्या तर मोहरवणीची चव अधिक छान लागते! :)

अगदी लाख्खो रुपये मोजून जगातली कितीही उंची सिगरेट ओढली तरी बापाच्या खिशातनं पैसे चोरून विडी/सिगरेट ओढण्याची मजाच वेगळी! :)

आपला,
(लहानपणी बापाच्या खिशातले ५ रुपये चोरून फोर स्केअर ची सिग्रेट ओढलेला!) तात्या.

अजून कोणकोणाची चव बघितली आहे तात्या तुम्ही?

सागेन केव्हातरी सवडीने! :)

आपला,
(बाईलवेडा!) तात्या.

चकली's picture

3 Apr 2008 - 12:45 am | चकली

एका हरवलेल्या पदार्थाची आठवण करून दिलीत !आता कैर्‍या शोधणे आले..

चकली
http://chakali.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

वा तात्या,

मस्त वाटते आहे मोहरवणी.. कधी करणार आहात? येतोच जेवायला.

आज शुटिंगला सुट्टी घेऊन बाजारातून कैर्‍या आणून ठेवायला सांगितलंय गधडीला!

तात्या, कैर्‍या तुम्हीच आणायला हव्या होत्या. नीट बघून, दाबून, कडक घ्याव्या लागतात. (चोरलेल्या असल्या तरीही).

अशीच एक भाजी गोव्याकडे करतात. अनसा-फणसाची भाजी. त्यात अननस, फणसाचे गरे आणि पिकलेला आंबा असे मिश्रण असते. ती भाजीही भन्नाट लागते.

अशीच एक भाजी गोव्याकडे करतात. अनसा-फणसाची भाजी. त्यात अननस, फणसाचे गरे आणि पिकलेला आंबा असे मिश्रण असते. ती भाजीही भन्नाट लागते.
त्याला कोकणीत "खतखतं " असे म्हणतात

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 10:17 am | प्रभाकर पेठकर

'खतखते' वेगळे.

खतखत्यात भोपळा, सुरण, कच्चा फणस (पिकलेलाही चालतो), कच्ची पपई, आरवी, शेवग्याच्या शेंगा, मटार्, मुळा, तुरीची डाळ आणि तिरफळ इत्यादी घालतात.

अनसा-फणसाच्या भाजीत अननस, फणस, पिकलेला आंबा एवढीच फळे आणि नारळ असतो.

चवीतही जमीन आस्मानाचा फरक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2008 - 9:26 pm | llपुण्याचे पेशवेll

खदखद्याला थोडीशी मिरमिरणारी चव असते. ते खदखदा उकळवून बनवतात म्हणून त्याला खदखदं म्हणतात असे माझी आजी म्हणते.

पुण्याचे पेशवे

सॉणा's picture

3 Apr 2008 - 4:39 pm | सॉणा

वचुन्च तोन्दलपनि सुतले मरथि त्य्पिन्ग जमत नहि

वचुन्च तोन्दलपनि सुतले मरथि त्य्पिन्ग जमत नहि = वाचुनच तोंडाला पाणि सुटले. मराठी टायपिंग जमत नाही.
बरोबर ना?
ह ह पो दु...................

संजीव नाईक's picture

3 Apr 2008 - 5:13 pm | संजीव नाईक

तात्या देवगडकर.
जोडीला संगीत हवे मग काय ! झोपा दोन तास निवांत!
संजीव

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 10:49 am | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार! आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळेच लिहायचा उत्साह येतो..!

बाय द वे, ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार..

तात्या.

देवदत्त's picture

4 Apr 2008 - 11:49 pm | देवदत्त

तुम्ही लिहत रहा हो. आम्ही वाचूच. प्रतिक्रियाही देऊच. असं काहीतरी वेगळे वाचून छान वाटतं.

बाय द वे, ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार.

मी स्वत:ला ह्यात धरत नाही. सवड मिळाल्यावर वाचून प्रतिसाद देतोय. ;)

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 3:21 pm | स्वाती राजेश

वा काय भारी रेसिपी आहे.
चवीला आंबट, गोड थोडिशी तिखट अगदी कोकणी माणसासारखी ना?:))))
नक्की करून पाहीन, इथे(इंग्लंड) मधे आल्या आहेत कैर्‍या...
अगदी तुमची आठवण काढून खाईन..

प्राजु म्हटल्याप्रमाणे आता आम्हाला स्पर्धक आले आहेत;)))
चांगली गोष्ट आहे.. त्यानिमित्त्याने नविन नविन शिकायला मिळते...

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 3:32 pm | विसोबा खेचर

चवीला आंबट, गोड थोडिशी तिखट अगदी कोकणी माणसासारखी ना?:))))

हम्म, अगदी खरं आहे!

अगदी तुमची आठवण काढून खाईन..

नक्की खा! आणि कळवा कशी झाली ते! :)

तात्या.

--

विशाल सागरतीर आहे, नारळीची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्यं असं विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं काय, तर भयाण विनोदाचं एक अभेद्य असं कवच! (अंतुबर्वा!)

वरदा's picture

4 Apr 2008 - 11:29 pm | वरदा

मी कधी ऐकली पण नव्हती घरी सगळे कोकणी असूनही...:(
करुन पाहीन सोप्पी आहे करायला....
सही तात्या...जेवढे स्पर्धक तेवढं आम्हाला चांगलं शिकायला मिळतं....

देवदत्त's picture

4 Apr 2008 - 11:42 pm | देवदत्त

हम्म्म.. भरपूर नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. भरपूर खवय्ये जमा झालेत.
सांगेन घरी करायला. :)
तात्या पण ते कैर्‍या चोरणे नाही जमणार ;)

ऋषिकेश's picture

4 Apr 2008 - 11:55 pm | ऋषिकेश

नवीन पदार्था बद्दल आभार.. मातोश्रींना सांगतो :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिता's picture

5 Apr 2008 - 12:28 am | अभिता

खतखत वेगले आनि अनसाफनसाचि भाजी वेगली.

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2008 - 4:19 pm | सुधीर कांदळकर

नसलेला छान (असणारच असा) पदार्थ.

धन्यवाद. सॉणा चा प्रतिसाद वाचून हहपुवा झाली. चोरलेल्या कै-या आणि ५ रू. मस्तच.

सुधीर कांदळकर.

स्वाती राजेश's picture

6 Apr 2008 - 8:49 pm | स्वाती राजेश

आज केली होती मोहरवणी.
पाडव्याचा नविन पदार्थ केला म्हणजे वर्षभर नविन नविन पदार्थ करायला/खायला मिळतील:))) (असा माझा समज)
पण तुमच्या या मोहरवणी मुळे मी केलेल्या कटाच्या आमटीला कोणी वाली राहिला नाही.:(((

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 8:52 pm | विसोबा खेचर

पण तुमच्या या मोहरवणी मुळे मी केलेल्या कटाच्या आमटीला कोणी वाली राहिला नाही.:(((

क्या बात है! अहो चालायचंच..!

मोहरवणीच्या पाकृचा स्त्रोत आमच्या आईचा होता.

"तुझी मोहरवणी सातासमुद्रापार पोहोचली गो....!" असं सांगतो आता म्हातारीला! ती खुश होईल! :)

तात्या.

रामदास's picture

6 Apr 2008 - 9:35 pm | रामदास

गोव्यात पिकलेल्या आम्ब्याचा असाच चवदार प्रकार मी खाल्ला होता . हुद्दमेथी असे काहिसे नाव होते.

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2008 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर

हुद्दमेथी असे काहिसे नाव होते.

उडदा-मेथी नांवाचा पदार्थ आहे. हुद्दमेथी कधी ऐकला नाही.

नुसत्या पिकल्या आंब्याचा तिखट-मीठ घालून केलेला पदार्थ म्हणजे कदाचित 'सासव' असेल.

चतुरंग's picture

7 Apr 2008 - 8:14 pm | चतुरंग

आमची आई मस्त करते.

चतुरंग

इंटरनेटस्नेही's picture

6 May 2010 - 10:59 pm | इंटरनेटस्नेही

तात्या चांगली वाटली मोहरवणी.. धन्यवाद!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

भानस's picture

7 May 2010 - 8:03 am | भानस

क्या बात हैं! तात्या, आता करून पाहायलाच हवी मोहरवणी. आता आमच्या जवळचा भारतीय दुकानदार कधी कै~या आणतोयं कोण जाणे.... जळ्ळलं मेलं लक्षण, तिकडे... आमच्या गावाक हो... घरात ही रास पडलीये अन हिकडे आम्ही एका कैरीसाठी तरसतोयं.... श्या..... :( बाकी उडीदमेथीही मस्तच लागते.

शुचि's picture

8 May 2010 - 1:56 am | शुचि

बारीक वासाचा तंदूळ आणि ही मोहोरवणी केली पाहीजे ..... बघू कसं जमतय ते.
पाककृती फारच आवडली. लेखनशैली तर क्या केहेने.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

डावखुरा's picture

8 May 2010 - 2:40 am | डावखुरा

धन्यवाद....
तात्या २.३२ वा दिसली मोहरवणी...उद्या नक्कि करायला लावतो आईला...आणि करायला लावतो...
पण तात्या फोटु टाका कि...

[कोण्त्याहि वेळि भुक लागते राव...]
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"