"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.
लेखनप्रकार
आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला.
खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची,
बरोबरोनी आजच्या शेतकर्याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं.
ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक
बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो. आणि लावणी (बटाटयाची लावणी लवकरात लवकर केली नाही तर त्याला
मोड येतात आणि बटाटा ख्रराब होतो) लवकर करणे गरजेचे असते, त्यावेळी टिंग्याच्या वडिलांसमोर एकच पर्याय असतो पतिंग्याला
कसायाला विकून त्या पैशाने नवीन बैल आणणे कारण पैसे येण्याचा दुसरा मार्गच नसतो, सावकारा कडून आधीच कर्ज घेतलं असतं व
पुन्हा कर्ज मिळणे दुरापास्त असतं.
त्यामधुन कथा हळुहळू उलगडत जाते, टिंग्याची त्याचा लाडका बैल पतिंग्याला वाचविण्यासाठी जी काही धडपड केली
आहे ती अगदी पहाण्याजोगी आहे . प्रसंगी पतिंग्याला दाखविण्यासाठी तो लांबून पायी चालत जाऊन माणसांच्या डॉ़क्टरला भेटतो
आणि वडिलांचा मार खातो. डॉ़क्टरना पेशंट विषयी सांगतो त्यावेळेसचा त्याचा अभिनय अगदी लाजवाब!
लहान मुलांचे निरागस प्रश्न असतात आणि म्हणूनच मोठ्यांना त्याची उत्तरे देता येत नाहीत, टिंग्याच्या शेजारी त्याच्या
मैत्रीणीची आजी आजारी असते आणि तिला तपासायला डॉ़क्टर आणतात तेव्हा टिंग्या वडिलांना प्रश्न विचारतो कि नानी आजारी आहे
तर तिला कोणी कापायला नेतं का?विनादाबरोबर आपल्याला एक कारुण्याची झालर दिसते.
शेवटी "टिंग्या" त्याच्या "पतिंग्याला" वाचवतो का? ह्या सर्व गोष्टी पहाण्यासारख्या आहेत.
प्रकाश हाडवळे यांचं लेखन दिग्दर्शन उत्तम आहे, त्याचबरोबर पार्श्वभुमीला एक गाणं सतत वाजतं "तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला"
हे गाणं फार छान वाटतं. आणि टिंग्यासकट सर्वांचा अभिनय लक्षात रहाण्याजोगा झाला आहे.
(वेळ मिळेल तेव्हा मि.पा. वर पडीक असलेली प्रगती)
वाचने
17985
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
अरे वा
In reply to अरे वा by आनंदयात्री
प्रकाश
फारच सपक समीक्षा.....
टिंग्या
"तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला"
सहमत आहे..
हा चित्रपट
In reply to हा चित्रपट by मुक्तसुनीत
व्ही सी डी
In reply to व्ही सी डी by भडकमकर मास्तर
मुद्दा मान्य.
In reply to मुद्दा मान्य. by मुक्तसुनीत
धन्यवाद.....
In reply to धन्यवाद..... by भडकमकर मास्तर
तुमचे आरोप
In reply to तुमचे आरोप by मुक्तसुनीत
गैरसमज आमचा...
In reply to मुद्दा मान्य. by मुक्तसुनीत
पण हे शक्य
In reply to व्ही सी डी by भडकमकर मास्तर
सहमत नाहि.
In reply to सहमत नाहि. by अभिज्ञ
सन्दर्भ....
In reply to सन्दर्भ.... by भडकमकर मास्तर
यातना....
In reply to यातना.... by अभिज्ञ
नाही नाही
In reply to यातना.... by अभिज्ञ
लग्नाला तिकिट
In reply to लग्नाला तिकिट by आनंदयात्री
लग्नाला तिकिट
In reply to लग्नाला तिकिट by आंबोळी
अहो
थोडी सुधारणा.....
थोडासा गैरसमज...
In reply to थोडासा गैरसमज... by धमाल मुलगा
वा संयत प्रतिसाद
In reply to वा संयत प्रतिसाद by आनंदयात्री
आता
In reply to आता by धमाल मुलगा
थेटरातच
In reply to थेटरातच by मनस्वी
सहमत \ असहमत
In reply to सहमत \ असहमत by आनंदयात्री
कोण का नाना मामा?
In reply to कोण का नाना मामा? by मनस्वी
टुकार पिक्चर अन थेटर
In reply to टुकार पिक्चर अन थेटर by आनंदयात्री
दुबईचा पैसा
In reply to दुबईचा पैसा by मनस्वी
ह्म्म
In reply to थोडासा गैरसमज... by धमाल मुलगा
पायरसि......
माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला
ह्म्म्म.....
मनस्वीचे मुद्दे...
In reply to मनस्वीचे मुद्दे... by धमाल मुलगा
तुझा सूर... :)
थोडे स्पष्टीकरण
हे पहा...
पायरसी.....
In reply to पायरसी..... by प्रभाकर पेठकर
आता
In reply to आता by डॉ. श्लोक _भातखंडे
:)
In reply to :) by मनस्वी
आम्हाला
प्रेम.
In reply to प्रेम. by प्रमोद देव
प्रमोदकाक
In reply to प्रेम. by प्रमोद देव
अभिप्राय वाचला....