✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आतले आणि बाहेरचे... (१)

न
नीलकांत यांनी
Sat, 04/12/2008 - 15:43  ·  लेख
लेख
  • आतले आणि बाहेरचे... (२)

Book traversal links for आतले आणि बाहेरचे... (१)

  • आतले आणि बाहेरचे... (२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15800 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Sat, 04/12/2008 - 15:52 नवीन

नीलकांत, उत

नीलकांत, उत्तम लेख.... मला आवडला.... ते नाटक उपलब्ध आहे काय??
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/12/2008 - 16:47 नवीन

फारच छान.

अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 04/12/2008 - 17:06 नवीन

चांगला लेख

लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते. विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 04/12/2008 - 18:38 नवीन

उत्तम लेख आणि विवेचन

हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 19:17 नवीन

सहमत

उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सहज Sat, 04/12/2008 - 18:42 नवीन

सुंदर लेख

नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 04/12/2008 - 19:05 नवीन

+१

असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/12/2008 - 22:16 नवीन

असेच म्हणतो !!!

असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भाई Sat, 04/12/2008 - 23:59 नवीन

लेख आवडला

आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नीलकांत Sun, 04/13/2008 - 10:36 नवीन

धन्यवाद

भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 04/14/2008 - 20:41 नवीन

धन्यवाद

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:31 नवीन

नीलकांत,

अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 04/06/2015 - 12:56 नवीन

शाळेत असताना

शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा