चांदण्याचे ओठ तुझे
चंद्रमा चेहर्यातला
रात्र काळे केश अवघे
नेत्रात दर्या उफाळला
शब्द सुमधुर दिव्य झंकार
श्वासांत सुगंधही दाटला
वारुणी नेत्रात तुझिया
रात्रवणवा पेटला
पदन्यासाने तुझिया
राजहंसी थिरकला
भृकुटीविभ्रमाने तव
मन्मनही घायाळला
यौवनाची नवनव्हाळी
मोगराच अंगी फुलविला
गुल्मोहरी वेणुतला निषाद
कुणी आज झंकारिला?
[फार वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना ''झालेली'' कविता! :) ]
-- अरुंधती
प्रतिक्रिया
मस्त...
अहाहा!!!
व्वा!! क्या
वाहवा.....सुंदर कविता....
चित्रगुप्
In reply to वाहवा.....सुंदर कविता.... by चित्रगुप्त
मस्त !
सुंदर कविता
उत्तम,
काही अवघड
व्हाक्याब