Skip to main content

चांदण्याचे ओठ तुझे

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 15/04/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.

चांदण्याचे ओठ तुझे
चंद्रमा चेहर्‍यातला
रात्र काळे केश अवघे
नेत्रात दर्या उफाळला

शब्द सुमधुर दिव्य झंकार
श्वासांत सुगंधही दाटला
वारुणी नेत्रात तुझिया
रात्रवणवा पेटला

पदन्यासाने तुझिया
राजहंसी थिरकला
भृकुटीविभ्रमाने तव
मन्मनही घायाळला

यौवनाची नवनव्हाळी
मोगराच अंगी फुलविला
गुल्मोहरी वेणुतला निषाद
कुणी आज झंकारिला?

[फार वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना ''झालेली'' कविता! :) ]

-- अरुंधती

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3499
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama


अहाहा!!! सुमधुर-रस-वर्षिणी :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara


वाहवा.....सुंदर कविता....याला साजेशी चित्रे,फोटो पण द्या की....

चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
https://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
https://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
https://www.misalpav.com/node/11667


अजून येऊ द्या महाविद्यालयाच्या काळातील कविता.
त्याच वरीजनल भाव व्यक्त करणार्‍या कविता असतात असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे


उत्तम, उदात्त, उन्नत.............अप्रतिम,रस-रासपूर्ण
{समर्पक चित्र}
"राजे!"


व्हाक्याबुल्लेरी चांगली आहे!!!

-----------------------------------------------------------------------चित्र उपलब्ध नाही
I'll never compromise
No F***ing way!