नुकतंच अन्य स्थळावर एका धाग्यात मी काही प्रतिसाद लिहिलेला असताना अचानक 'कंपू तुमचा पाठलाग न करो ही प्रार्थना' अशी धमकीवजा सूचना आली. मी भांबावलो. त्याच धाग्यात आधी मी औद्धत्य करून कंपूबाजीला आव्हान देतोय असं प्रश्नवजा विधान आलं होतं तेही दिसलं. तेव्हापासून ही भाई लोकं नक्की काय म्हणत असावेत याविषयी मनात विचार सुरू झाले. (त्यातूनच मूळच्या उत्कृष्ट काव्याचं विडंबन, केवळ भीतीपोटी झालं म्हणून कवीची क्षमा मागतो.) पुन्हा, अन्य स्थळावर हे मी अधोरेखित करतोय. मिपावर कंपूबाजी वगैरे काही नाही. निदान मला तरी दिसलेली नाही.
या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती.
पाळत तुमची हाच असे हो या दोघांचा धंदा
लेखनाची अन् तुमचीसुद्धा ते करतील निंदा
तुमचे प्रतिसाद हेच रणांगण, खवीच्या खिंडित धरती
आयडीत हे लपतील दोघे, स्वस्थ दबा धरुनी
तुमच्या पाया दगड बांधुनी टाकतील बुडवुनी
येतिल दोघे, येईल कंपू, ही तर जालिय नीती.
मूळ कविता
या डोळयांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील, असा कुठे ही जगती
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासवीण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यास नभांगण, घरकुल तुमची छाती
सावलीत ही बसतील वेडी, प्रीतीच्या दडूनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती
काव्यरस
वाचने
4941
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेदार
+१
In reply to मजेदार by अक्षय पुर्णपात्रे
भाकीत
काय हे घाटपांडेसाहेब...
In reply to भाकीत by प्रकाश घाटपांडे
हॅहॅ
In reply to काय हे घाटपांडेसाहेब... by राजेश घासकडवी
सोदाहरण स्पष्टिकरणाची अपेक्षा
In reply to भाकीत by प्रकाश घाटपांडे
अस्तित्व
In reply to सोदाहरण स्पष्टिकरणाची अपेक्षा by अक्षय पुर्णपात्रे
विडंबनकाराची जबाबदारी
In reply to सोदाहरण स्पष्टिकरणाची अपेक्षा by अक्षय पुर्णपात्रे
पण एखाद्या
In reply to विडंबनकाराची जबाबदारी by राजेश घासकडवी
हॅ हॅ
In reply to विडंबनकाराची जबाबदारी by राजेश घासकडवी
शाब्बास...!
In reply to भाकीत by प्रकाश घाटपांडे
हे भाकीत
In reply to शाब्बास...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा!
चालु द्या...! :)
हॅहॅहॅहॅ ...
का हो असं म्हणता... माझ्या हृदयाला घरं पडतात...
कोदाची आठवण
छान मजेशीर
ह्या
माननीय
In reply to ह्या by II विकास II
आजचा शब्द.
In reply to ह्या by II विकास II
कोवार्ड
In reply to आजचा शब्द. by Nile
तो
In reply to कोवार्ड by इनोबा म्हणे
हम्म
In reply to तो by Nile
उत्तम कंपूबाजाचे लक्षण
मस्त...आवडल..