✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भेळ ! भेळ !! भेळ !!!

स
संदीप चित्रे यांनी
गुरुवार, 04/08/2010 - 07:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11787 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

छान!

चित्रा
गुरुवार, 04/08/2010 - 08:17 नवीन
लेख मस्तच. फक्त पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात भेळ खातखातच मी लहानाचा मोठा झालो. हे वाचल्यानंतर तुमच्या आईलाही हे वाचून काय वाटेल या कल्पनेनेच झीट आली!
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

पाषाणभेद
गुरुवार, 04/08/2010 - 08:33 नवीन
हॅ हॅ हॅ....थोर लोकं रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशातच अभ्यास करून मोठे होतात म्हटलं. बाकी लेख तर भेळेपेक्षाही चटपटीत झालाय. आम्ही भारतात राहतो. तुमच्या कडे तुम्ही संध्याकाळी हा असला लेख टाकतात अन तो आम्हाला सकाळी सकाळी ऑफिसात जायच्या वेळेला दिसतो. आम्ही त्याचा आस्वाद केवळ मनानेच घेवू शकतो. 'आमच्या' सकाळी लेख टाकल्याबद्दल जाहिर निषेध. (असलाच निषेध आम्ही आता यापुढे गणपाच्याही पाकृ ला (अन तिकडच्या 'संध्याकाळी' येणार्‍या) टाकत पाकृ ला टाकत जावू.) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अरेच्चा !

संदीप चित्रे
Sun, 04/11/2010 - 05:12 नवीन
हे पेट्रोमॅक्सच्या दिव्याचं लक्षातच आलं नाही, चित्रा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

हाय रे हाय

स्पंदना
गुरुवार, 04/08/2010 - 08:30 नवीन
खरा खवय्या! बाकी पदार्थाच नाव वाचुन, तोन्डाला पाणी सुटुन नको तिथ जिभ भाजुन घेण्यात आम्हिहि पुढे आहोत. जित्याची खोड! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

!!

निखिलचं शाईपेन
गुरुवार, 04/08/2010 - 09:21 नवीन
का सकाळी सकाळी .. आज भेळ खाविच लागणारे ... -निखिल....
  • Log in or register to post comments

भेळेवरचा

अमोल केळकर
गुरुवार, 04/08/2010 - 09:44 नवीन
भेळेवरचा लेख मस्त , चटकदार !! सर्व ठिकाणच्या भेळ खाल्या मात्र सांगली, कोल्हापूरला मिळणार्‍या भेळेची ( चिरमुर्‍याची ) सर पुण्या , मुंबई कडच्या भेळेत नक्कीच नाही. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

चटकदार!

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/08/2010 - 12:16 नवीन
भेळेसारखाच चटपटीत झाला आहे लेख... आता मात्र लवकरच भेळ करावीच लागणार, स्वाती
  • Log in or register to post comments

मलाही भेळ

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 04/08/2010 - 13:31 नवीन
मलाही भेळ प्रचंड आवडते.माझा भाऊ अन नवरा म्हणतो की,भेळेचा नैवैद्य दाखवल्याशिवाय हिच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. मी कसलीही अन कुठलिही भेळ ती चांगली असेल ह्या एकाच आशेवर पचवलेल्या आहेत. कुठेही गेले की समोरच्या भेळेच्या गाडीकडे बघुन नवरा म्हणतो खाऊन घे नंतर कुणीतरी म्हणेल कि इथली भेळ चांगली असते मग उगाच हळहळशील.अन मी खातेही. लहानपणी बाकीचे आयस्क्रिम खाताना मी मात्र भेळच खायची. मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना दोन महिने अन्नही पचत नव्हते.डॉ.काविळीची शक्यता वर्तवत होते.दोन तीन महिन्यानी एकदा मी बाहेर गेले तेंव्हा मी भेळ खाल्ली शौकिनची. अन दोन दिवसातच माझी प्रकृती सुधारली. तेंव्हापासुन मला काहिही झाले कि भाऊ म्हणतो की जाऊन भेळ खाउन ये शौकिनची.
  • Log in or register to post comments

अटकमटक

अरुंधती
गुरुवार, 04/08/2010 - 14:13 नवीन
अटकमटक चवळीचटक.... चटकदार लेख :-) पुष्करिणीची भेळ, शनिवारवाड्यासमोर बसून खाल्लेली भेळ, सारसबागेबाहेर स्टॉलवर डुगडुगत्या खुर्चीत बसून फन्ना उडवलेली भेळ, कल्पना भेळ........ ................ ........... ......... म्हमईची भेळ मला इतकी न्हाई आवडली.... पुण्याची भेळ ती पुण्याचीच :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चटकदार

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 04/08/2010 - 14:20 नवीन
खरच चटकदार आहे लेख.. कल्याण भेळ पण छान असते. आणि सारसबागेत (विश्व हाटेलच्या बाजूने) एंट्री मारल्यावर लगेचच डाव्या हाताला एक भेळवाला आहे. तो पण १ नंबर भेळ बनवतो. म्हमईची भेळ मला इतकी न्हाई आवडली.... पुण्याची भेळ ती पुण्याचीच १००% सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

सुंदर चटकदार ले़ख..

अस्मी
गुरुवार, 04/08/2010 - 14:19 नवीन
तोंडापासून पोटापर्यंत सगळीकडे मस्त दवंडी पिटली जाते – थोडं थांबा … भेळ येतेय !!
मस्तच :)
असं ऐकलंय की गेल्या काही वर्षांत ’कल्याण भेळ’ नावाची एक खवैय्यांच्या आवडीची जागा पुण्यात सुरू झालीय. अजून तरी तिथे जाणं जमलं नाहीये ! निदान पुढच्या ट्रिपमधे तरी ’कल्याणमस्तु’ व्हावं!
नक्की टेस्ट करा.....तुमच्यासारख्या (जगभरातली भेळ चाखलेल्या) 'भेळप्रेमी'ने तर ’कल्याण भेळ’ टेस्ट करायलाच पाहिजे :) बाकी लेख अतिशय सुंदर...तोंडाला पाणी सुटलं अगदी... :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

आगायाया ...

टारझन
गुरुवार, 04/08/2010 - 14:24 नवीन
आगायाया ... चित्रे साहेब ... आहो .. भेळ ... भेळ म्हणजे आमचा जीव की प्राण .. आमचा यमन आहे भेळ म्हणजे .. बाकी सुक्की भेळ भारी .. ओल्या भेळेपेक्षा :) = टारझन प्रो.प्रा. चुटुकमुटुक चाट सेंटर
  • Log in or register to post comments

छे! फसले..

कवितानागेश
गुरुवार, 04/08/2010 - 17:11 नवीन
अत्ता इथे मिपा वर येउन अगदी फसले मी! आत भेळ करावीच लागणार. ..दुसरा इलाजच नाही! ============ माउ
  • Log in or register to post comments

पाणी सूटलं.

मीनल
गुरुवार, 04/08/2010 - 17:12 नवीन
नुसतं शिर्षक वचूनही तोंडाला पाणी सूटलं. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अहाहा

रामची आई
गुरुवार, 04/08/2010 - 19:18 नवीन
अहाहा!! तोंडाला पाणी सुटलं :)
  • Log in or register to post comments

आईग्ग!

रेवती
गुरुवार, 04/08/2010 - 19:46 नवीन
आईग्ग! संदीप तू फार वाईट आहेस!;) लेख चविष्ट तर आहेच (म्हणजे आधीच माहीत होतं) पण मनाचे इतके हाल झाले.........त्या दु:खातून वर येण्यासाठी भेळ खाते आता!;) मला मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि कुठल्याही गावची/शहरातली भेळ चालते......भेळ असल्याशी कारण! दुसरोंके साथ बातां- खर्‍या भेळप्रेमींनो, कृपया वेगवेगळ्या ठिकाणच्या भेळेमध्ये भेदाभेद करून त्या ठिकाणच्या भेळप्रेमींना दुखवू नका! ;) रेवती
  • Log in or register to post comments

रेवती,

यशोधरा
गुरुवार, 04/08/2010 - 21:05 नवीन
रेवती, हिंम्मत असेल तर बंगलुरातली गाजर मिश्रीत बेल (पक्षी: भेळेचा उच्चार असाच होतो इथे) खाऊन दाखव, तो जाने! :) संदीप, दुष्ट माणसा! तुला बंगलोरी भेळ खायला लागो, हा शाप :P
  • Log in or register to post comments

भेळेत,

रेवती
Fri, 04/09/2010 - 00:12 नवीन
भेळेत, सॉरी.....बेलेत गाझर ;) ? भेळेला इतक्या दुष्टपणे वागवलं जातं याची कल्पना नव्हती मला! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हा हा हा ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/09/2010 - 10:16 नवीन
हा हा हा ... यशो, तुझ्या दु:खात सहभागी आहे! संदीप, लेख मस्तच ... चटपटीत! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगं इथे

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 04/09/2010 - 13:22 नवीन
अगं इथे इंदोरात एक दोन ठिकाणी मी मुळा घातलेली भेळही खाल्ली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाचता

गणपा
गुरुवार, 04/08/2010 - 21:12 नवीन
वाचता वाचता कळफलक ओला झाला यार =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
  • Log in or register to post comments

संदीप

चतुरंग
गुरुवार, 04/08/2010 - 21:20 नवीन
कुफेहेपा?? :? चतुरंग
  • Log in or register to post comments

कुफेहेपा

शुचि
Sat, 04/10/2010 - 01:57 नवीन
कुफेहेपा =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लोकावेसा ?

टारझन
Sat, 04/10/2010 - 02:07 नवीन
लोकावेसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

दुष्ट

प्राजु
गुरुवार, 04/08/2010 - 21:23 नवीन
दुष्ट माणसा!! किती त्रास देशील?? ;) लेख अफाट झाला आहे.. भेळे इतकाच जबरदस्त! आम्ही आपली राजाभाऊ स्पेश्शलवाली माणसं.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

चटपटीत ............

सुधीर१३७
गुरुवार, 04/08/2010 - 22:26 नवीन
मस्तच लेख चटपटीत ............ यार, तोंडाला पाणी सुटले...... ***अरे ही कल्याण भेळ कुठे आहे ते कोणी सांगेल का ???????? :W :? :W
  • Log in or register to post comments

अरे कल्याण भेळ

प्रमोद्_पुणे
Fri, 04/09/2010 - 10:37 नवीन
२-३ ठीकाणी आहे.. बिबवेवाडी वरून कोंढव्याकडे जाताना डाव्या हाताला आहे (म्हणजे ESI office च्या सिग्नलला लगेच डावीकडे वळायचे कोंढव्याच्या दिशेने)..एक आहे ती ७ लव्हज पाशी..अजून एक आहे ती भांडारकर वर. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

कल्याण भेळ

सुधीर१३७
Fri, 04/09/2010 - 18:20 नवीन
धन्यवाद रे मित्रा ...... प्रमोद .. कल्याणमस्तु !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

लेखाच्या सुरुवातीचे चित्र

बेसनलाडू
गुरुवार, 04/08/2010 - 22:40 नवीन
पाहून आणि नंतर लेख वाचून भूक, जीभ इतके चाळवले गेले की गाडी काढून चाट प्याराडाइज गाठले आणि भेळ हाणली. मुंबई-पुण्याकडच्या किंवा भारतातल्या भेळेची सर नसली तरी दुधाची तहान ताकावर भागवली जाणे तेव्हढेच गरजेचे झाले होते. (खवय्या)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

नका जळवू राव

चिन्मना
गुरुवार, 04/08/2010 - 23:13 नवीन
संदीप शेठ, काय चटकदार लेख झालाय हो ! आम्हीसुद्धा लहानपणापासून भेळप्रेमीच. आमच्या घरात २ गट आहेत. एक भेळप्रेमी आणि दुसरा पाणीपुरीप्रेमी. मी आणि बायको विरुद्ध गटात आहोत हे सांगणे नलगे ;) कल्याण भेळ कुठे आहे हो पुण्यात? आता लवकरच पुण्याला परत जायचे म्हणतोय. लॉ कॉलेज रोड आणि कॅनाल रोडच्या कॉर्नरला सुद्धा एक प्रसिद्ध भेळवाला आहे ना? नाव आता विसरलो. भरपूर गर्दी असते तिथे. _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
  • Log in or register to post comments

चट़कदार

पिंगू
गुरुवार, 04/08/2010 - 23:46 नवीन
मुळी भेळ असतेच चटकदार आणि संदीपचा लेख तोही सारखाच जिभेला चटका लावणारा!!!!!!
  • Log in or register to post comments

लेख चटकदार व चमचमीत

राजेश घासकडवी
Fri, 04/09/2010 - 05:14 नवीन
लेख चटकदार व चमचमीत झालाय यात वादच नाही. पण खरं सांगू का, पुणे कोल्हापूर वगैरे ठिकाणी भेळेच्या नावाखाली जे काही मिळतं ते मी खातो, नाही असं नाही. पण भेळ खावी तर मुंबईचीच. इतर भेळांमध्ये जाड गाठ्या, मोठे टोमॅटोचे तुकडे, अर्धा इंच जाड कांदा, शेंगदाणे, दाताने फुटणार नाही अशा कडक लाल गाठ्या, खूप लाल तिखट, जाडीभरडी शेव असला 'दणकट देशा, दगडांच्या देशा' स्टाईलचा भरताड असतो. मिसळीच्या तर्रीत जीव धरू शकेल असा मसाला कुरमुऱ्यात घातलेला असतो. आता ते मूळ रसायनच असं आहे की तरी ती खाववते पण तितपतच. मुंबईची भेळ फारच नाजूक असते. पातळ नायलॉन शेव, पातळ कुरमुरे जे चटणी घातल्यावर लगेच चुर्र करून मऊ व्हायला लागतात. आणि तिखट मिरचीची चटणी, आंबडगोड चटणी, कैऱ्या आणि चुरलेल्या भेळेच्या पुऱ्या (पाणीपुरीच्या नाही). एकंदरीतच तुलना करायची झाली तर मुंबईची भेळ म्हणजे खानदानी सिल्क तर पुण्याची म्हणजे दणदणीत गोणपाट...रंग, चव तीच पण पोतात जमीन अस्मानाचा फरक. आणि पुठ्ठ्याने भेळ खाणं म्हणजे तर अगदीच अपमान त्या भेळेचा. ती भेळेच्या पुरीनेच खायची. मग शेवटी ती किंचित ओली झालेली पुरी खाऊन टाकायची. तरच भेळसाधना पुरी होते.
  • Log in or register to post comments

खल्लास!!

बेसनलाडू
Fri, 04/09/2010 - 08:00 नवीन
मग शेवटी ती किंचित ओली झालेली पुरी खाऊन टाकायची. तरच भेळसाधना पुरी होते. अगदी अगदी!! हे वाक्य तर नुसतं वाचूनच जीभ चाळवली, कोरडी पडली. भेळीचा सोस लागला पुन्हा :( (मुंबईकर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मग

दिपक
Fri, 04/09/2010 - 12:27 नवीन
मग शेवटी ती किंचित ओली झालेली पुरी खाऊन टाकायची. तरच भेळसाधना पुरी होते.
संदिपच्या लेखाने आधीच भेळेची भुक चाळवली होती आणि राजेशरावांनी त्यावर कहर केला. लवकरात लवकर भेळ खाण्याशिवाय पर्याय नाही
पण भेळ खावी तर मुंबईचीच.
+११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

राजेशसाहे

रेवती
Fri, 04/09/2010 - 19:19 नवीन
राजेशसाहेब, आपण केलेले मुंबईच्या भेळेचे वर्णन फारच मस्त! आजकाल पुण्यात मिळणारी भेळ ही २०-२२ वर्षांपूर्वी मिळणार्‍या भेळेपेक्षा वेगळी आहे. मी लहान असताना सारसबागेच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवरची भेळ चवदार असायची. त्यावेळी सारसबागेत आईवडील लहान मुलांना खेळायला/दर्शनाला घेऊन जात मग फुगा, भेळ असा कार्यक्रम होत असे. आपण छानपैकी स्वेटर घालून (आजकाल गणपतीलाही घालतात ;)) किंवा नाजूक नक्षीची शाल पांघरून फिरायला जावे आणि 'किती ही थंडी' अशी लाडिक तक्रार केल्यावर एखाद्या खेडेगावातील माणसाने त्यामागची भावना समजून न घेता 'काय राव्!......घ्याकि जाडजूड कांबळं.....काय थंडीबिंडी वाजत नाय' असं म्हणावं असं वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून म्हणजे पुण्याच्या भेळेला गोणपाटाची उपमा देताय म्हणून म्हटलं! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

"पण भेळ

मेघना भुस्कुटे
Fri, 04/09/2010 - 20:19 नवीन
"पण भेळ खावी तर मुंबईचीच." अगदी अगदी. बंगळुरात तर भेळेच्या नावाखाली जे काही देतात, ते खाल्यावर जीव द्यावासा वाटतो. रगडा-पॅटीसमधे वापरायचे उकळते वाटाणे, मटण-मसाल्याचा वास येणारा एक उग्र रस्सा, गतप्राण झालेली काकडी आणि चक्क जाडी शेव. शिवाय त्यात गोड पाणी मिसळताना कसला संकोच वाटतो देव जाणे. बरं, मिरची तरी नीट घालावी? बरं, भेळ कस्टमाइज करून घ्यावी, तर आपल्याकडेच असं बघतात - "काय माहीत कुठून कुठून येतात माणसं... मी सोन्यासारखे वाटाणे घालतोय, तर नको झालेत माजोरडीला...". तरी आपण निर्लज्ज आणि मग्रूर लुक्स देऊन आपलं म्हणणं रेटत राहिलं, तर खाणेबल भेळ मिळते. हे सगळं करताना, कमाल संथ आविर्भाव. मुंबैच्या भेळवाल्याच्या चलाख, चटपटीत हालचालींमधे, त्याच्या पातेल्याच्या खणखणाटामधे आणि वरतून कंजूषपणा न करता पसरलेल्या झीरो नंबरच्या शेवेमधे भेळेच्या यशाचा मोठा वाटा असतो. नाहीतर हे! भेळ बनवून आपल्यावर नि त्या भेळेवर उपकार. इथल्या भेळवाल्यांना एक दिवस मुंबैच्या भय्याच्या हाताखाली कामावर ठेवावंच. रात्रीला अतिश्रमानी आणि गिर्‍हाइकाच्या अपमानास्पद कटाक्षांनी त्यांना नाही हाकललं, तर नाव बदलून देईन... असो! मुंबैची भेळ...... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

चित्र्यां

जयवी
Fri, 04/09/2010 - 13:42 नवीन
चित्र्यांच्या संदीपचा दुष्टपणा....!! भेळेचं इतकं चटपटीत, चविष्ट, आंबट-गोड वर्णन करुन त्याने मिपावरच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. कधीतरी खाल्लेल्या भेळेची आठवण करुन वेळ मारुन नेताहेत सगळे. भारतातल्या मिपाकरांना फारसा त्रास झाला नाही कारण ही भेळकथा वाचून ते लगेच जाऊन भेळ खाऊन आले. पण परदेशात राहणार्‍या मिपाकरांना मात्र भयंकर मनस्ताप होतोय. भारतात जायची वाट त्यांनी किती कारणांसाठी पहायची....?? त्यामुळे आम्ही चित्र्यांच्या संदीपचा जाहीर निषेध करतो आहोत ;)
  • Log in or register to post comments

छ्या..

राघव
Fri, 04/09/2010 - 19:47 नवीन
संदीपशेठ, (कुठे गेला रे हा ***) सप्रेम नमस्कार, (जाहीर निषेध) खूप छान आठवणी जागवल्यात. (जग दुष्ट असतं म्हणतात ते काय खोटं नाय..) तुम्हास खास धन्यवाद. (ये जरा असा.. तुला चोपतो चांगला..) :) छान लेख. मी मूळचा नागपूरचा. त्यामुळे माझ्या दृष्टीनं नागपूरच्या भेळला दुसरा पर्याय नाही असे माझे वैयक्तीक पण ठाम मत आहे. :) (राघवा तू खातंय आता मार..) तशी कल्याण भेळही चांगली पण माझ्यासाठी जरा तिखट करा असं सांगावं लागतं. (नागपूरी भेळवाला) राघव ;)
  • Log in or register to post comments

नका रे असा

शुचि
Sat, 04/10/2010 - 01:53 नवीन
नका रे असा छळवाद मांडू. काय तो फोटो, काय ते वर्णन ..... पुण्याची भेळ आठवली. मुंबईची पाणीपुरी, शेवपुरी आठवली. रगडा पॅटीस आणि दहीपुरी सुद्धा आठवली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

चटपटीत

भोचक
Sat, 04/10/2010 - 16:38 नवीन
चटपटीत लेख. मुंबईत परळमध्ये मामाच्या घराच्या आसपास खाल्लेली भेळ माझ्यामते अप्रतिम होती. नाशिकलाही शौकीनची भेळ मस्त असते. बाकी पाणीपुरीही मस्त लागते हो. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

मस्तच लेख

चिरोटा
Sat, 04/10/2010 - 16:59 नवीन
लेख मस्तच जमलाय ,चवदार भेळेसारखाच.
आता काही ठिकाणी चमचे मिळायला लागले आहेत पण पुठ्ठ्याच्या चमच्याची मजा वेगळी असते
एकदम. भेळही कागदी डिशवरच पाहिजे.काचेच्या डिशवर भेळ देतात पण मजा नाही येत खायला.
बंगळुरात तर भेळेच्या नावाखाली जे काही देतात, ते खाल्यावर जीव द्यावासा वाटतो.
सहमत. एकदा मला एकाने बाँबे भेळ्च्या नावाखाली भेळेवर गाजर किसून घालून दिले होते.तरीही त्यातल्या त्यात बर्‍यापैकी भेळ खायची असेल तर कुमारा पार्क्(पश्चिम)(शेषाद्रिपूरमच्या पुढे) येथे कॉलेजच्या जवळ मिळते. (चविष्ट भेळेच्या शोधात) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

धन्स मित्र/मैत्रिणींनो

संदीप चित्रे
Sun, 04/11/2010 - 05:15 नवीन
ह्या लेख लिहिण्याइतकाच आनंद ह्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचताना येतोय ! मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्स. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

खरचं

सखी
Tue, 04/13/2010 - 07:26 नवीन
खरचं चटपटीत लेख झालाय रे. मला तर वाचल्यावाचल्या लगेच विमानात बसुन पुण्याला जावसं वाटलं, पण आता कितीतरी महीने वाट पहाणं आलं. :(
  • Log in or register to post comments

मुंबईत

II विकास II
Tue, 04/13/2010 - 07:42 नवीन
मुंबईत चाअयनीझ भेळ हा नवीन प्रकार आला आहे. कोणी खाउन बघितला आहे का? नावातच भंयकर घोळ आहे, असो. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

भारी लेख

सन्जोप राव
Tue, 04/13/2010 - 08:51 नवीन
समस्त खवय्ये चिरायू होवोत! सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा