✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सव्यसाचि (अंतिम)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 04/01/2010 - 16:29  ·  लेख
लेख

Book traversal links for सव्यसाचि (अंतिम)

  • ‹ सव्यसाचि (भाग -७)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5735 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

सगळेच भाग अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

शार्दुल
गुरुवार, 04/01/2010 - 16:56 नवीन
मस्त लि़खाण रे प.रा. =D> नेहा
  • Log in or register to post comments

ह्या

शानबा५१२
गुरुवार, 04/01/2010 - 17:06 नवीन
ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या हॉटेल किंग मध्ये एका तरुण महिलेचे प्रेत सापडले असून तिचा विष पाजून खुन करण्यात आला आहे. सदर तरुणीच्या सामानाची व लॅपटॉपची तपासणी केली असता हि तरुणी 'पॅपिलॉन' ह्या नावाने हॅकिंग विश्वात प्रसिद्ध होती असे निदर्शनास आले आहे. वरिल दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध आहे का ह्याची शहर पोलिस तपासणी करत आहेत. (समाप्त) ...............हे एवढच वाचल आणि वरच काहीच वाचल नाही ह्याचा आनंद झाला :D *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
  • Log in or register to post comments

अग्गा बाब्बो!

महेश हतोळकर
गुरुवार, 04/01/2010 - 17:50 नवीन
काय लिहीलयस रे! पूर्ण कथामाला कमीतकमी २दा वाचावी लागणार सगळे संदर्भ नीट डोक्यात बसण्यासाठी. बाकी रसग्रहण वगैरे आपला प्रांत नाही. लीहीत रहा. वाचत रहातो.
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न!

प्रमोद देव
गुरुवार, 04/01/2010 - 18:00 नवीन
मात्र शेवट गुंडाळलेला वाटला. पराशेठ, तुम्ही भविष्यात महाजालावरचे बाबुराव अर्नाळकर म्हणून नक्कीच प्रसिद्ध व्हाल ह्याबद्दल खात्री आहे.
  • Log in or register to post comments

चांगले

रेवती
गुरुवार, 04/01/2010 - 19:34 नवीन
चांगले झालीये ही मालिका! शेवट अजून थोडा विस्तारीत हवा होता असे वाटले पण तरीही कथा आवडली. रेवती
  • Log in or register to post comments

प्रामाणिक प्रतिसाद

गोगोल
Fri, 04/02/2010 - 04:06 नवीन
पहिले तीन भाग छान जमले आहेत. मला त्यातले तांत्रीक डिसक्रिपशन आवडले. ज्या हॅकिंग मेथड्स सांगितल्या आहेत त्या पटण्यासारख्या आहेत. विशेषत: शफी आणि पॅपिलॉन यामधले चॅट मेसेजस ज्यामधून पॅपिलॉन शिकतो ते मस्त लिहिल आहे. शिवाय भारत पाकिस्तान हा एक मस्त अँगल जमून आला होता. त्यामुळे पुढील भागात काय होईल त्याची उत्सुकता होती. थोडक्यात कथानकाला एक जबरदस्त पोटेनशियल होत ... पण .. नंतरचे ४ भाग वाचून पहिले तीन भाग आणि नंतरचे चार भाग लिहिणारा व्यक्ती एकाच आहे का अशी शंका यायला लागली. पॅपिलोन चे जेम्स बॉन्ड करण्याच्या नादात अचाट अतर्क्य आणि खूळचट गोष्टी घुसडून मूळतल्या सशक्त कथानकाची पार वाट लावली. ते भाग वाचून असा वाटायला लगाल की लेखकानी देशी दारूचे घोट घेत, मिथूनाच्या गुंडा चित्रपटाची एक भ्रष्ट नक्कल केली आहे. मला माहीत आहे की या प्रतिक्रियेवर बाकी लोकांच्या बॅशिंग प्रतिक्रिया येतील. पण मला मनापासून हेच म्हणायाच आहे. एक खूप चांगल्या सुरुवातीनंतर अन्टि क्लायमॅक्स ..
  • Log in or register to post comments

देशी

श्रावण मोडक
Fri, 04/02/2010 - 10:46 नवीन
"पॅपिलोन चे जेम्स बॉन्ड करण्याच्या नादात अचाट अतर्क्य आणि खूळचट गोष्टी घुसडून मूळतल्या सशक्त कथानकाची पार वाट लावली. ते भाग वाचून असा वाटायला लगाल की लेखकानी देशी दारूचे घोट घेत, मिथूनाच्या गुंडा चित्रपटाची एक भ्रष्ट नक्कल केली आहे."
केवळ अनावश्यक. लिहिणारा काय करत लिहितो याच्याशी वाचकाचं काय देणं-घेणं? शेवटच्या परिच्छेदात म्हणता की तुमच्या या प्रतिसादावर बॅशिंग प्रतिक्रिया येतील. त्या या मांडणीवर आल्या तर त्याचं काहीही वाईट वाटणार नाही. पण या अशा मांडणीमुळं तुमच्या प्रतिसादातील मूळ मुद्यांकडं इतर वाचकांचं आणि खुद्द लेखकाचंही दुर्लक्ष झालं तर तो दोष सर्वस्वी तुमचाच. हा भाग सोडून उरणाऱ्या तुमच्या प्रतिसादाला +१. अगदी नेमकं लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

सॉरी

गोगोल
Fri, 04/02/2010 - 13:48 नवीन
मान्य आहे की माझी प्रतिक्रिया ओवर द टॉप होती. थोडी ज्यास्तच पॅशॉनेटली लिहिली गेली..पण भावना दुखावायचा हेतू नव्हता...दुर्दैवानी मला ते वाक्य संपादन करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ठीक आहे...

श्रावण मोडक
Fri, 04/02/2010 - 14:01 नवीन
संपादनाची गरज नाही. भावना दुखावण्याचा हेतू नसावा हा माझा कयास होताच. लिहिताना झालेली ती गडबड आहे म्हणून स्पष्ट दाखवली. सॉरीची गरज नाय!!! विषय संपला... :) तुमच्या या समजूतदारपणालाही दाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

शेवटच्या

कानडाऊ योगेशु
Fri, 04/02/2010 - 22:25 नवीन
शेवटच्या भागात मलाही कहाणी फसल्यासारखी वाटतेय. हे म्हणजे सचिन तेंडुलकरने चांगली सुरवात करावी.लागोपाठ ३ चौकार मारावेत आणि हा आता चांगला सेट झालाय असे वाटत असतानाच आऊट व्हावा.तेव्हा स्वतःवर ही आपण चरडफडतो आणि सचिनवरही. :( . मी गोगोलचा त्रागा समजु शकतो. ह्या भागात पॅपिलॉनने दिलेले कबुलिजबाब ते ही कथेतील दुसर्या पात्रांना... हे पचवायला थोडे जडच जातेय.पॅपिलॉन जसा इतराशी डबलगेम खेळतोय तसेच इतरही खेळत असायला हवे होते.तो अँगल ह्या कथेत सुटलेला दिसतोय. पण लिखाणाची शैली..संवादातुन कथानक पुढे नेण्याची हातोटी प्रशंसनीय.. कथेमध्ये कादंबरीचे बीज दडलेले आहे. अवांतर : कुणी सु.शि. "समांतर" ही कादंबरी वाचली आहे काय? एकदातरी वाचण्याजोगी कादंबरी आहे.टिपिकल सु.शि स्टाईल.ल्व्ह,रोमान्स,सेक्स,सस्पेन्स सर्व काही. ३००+ एक पृष्ठांची कादंबरी असावी ही. ही कादंबरी आठवण्याचे कारण... "समांतर" वाचल्यानंतर काही वर्षांनी शन्नांच्या लघुकथा वाचत होतो तर त्यात समांतरच्या कथानकाशी तंतोतंत साधर्म्य असणारी एक तीन-चार पानी लघुकथा वाचली. मूळ कथाबीज तेच..पण सु.शिंनी त्याची ३०० पानी कादंबरी केली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

जबरा

सूर्य
Fri, 04/02/2010 - 05:54 नवीन
जबरा लिहीले आहे राव परा. आत्ताच सगळे भाग एकदमच वाचुन काढले. - सूर्य.
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
Fri, 04/02/2010 - 10:28 नवीन
वा!! छान कथा आवडली :)
  • Log in or register to post comments

लय भारी...

अस्मी
Fri, 04/02/2010 - 10:33 नवीन
लय भारी...:) खरंच सगळ नीट कळण्यासाठी दोनदा वाचावी लागेल =D> =D> =D> =D> =D> - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

अफलातुन!!!

हर्षद आनंदी
Fri, 04/02/2010 - 16:12 नवीन
सही रे परा एकदम मस्त! छान वेग, धक्कातंत्र पन शेवटच्या २ भागात गुंडाळा-गुंडाळी जास्त वाटली. अजुन २-३ भाग सहज जमले असते. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

फार

योगेश गाडगीळ
Fri, 04/02/2010 - 17:45 नवीन
फार अनपेक्षित अंत केला आहेस. जरा अजून वाढवली असतीस तर आणखीन मजा आली असती........... परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे||
  • Log in or register to post comments

पूर्ण

अनिल हटेला
Fri, 04/02/2010 - 22:11 नवीन
पूर्ण मालीका आवडली.. थोडासा जेम्स बाँड केलायेस पॉपीलॉनचा ,पण हरकत नच्छे....:) (बंडोबा) चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D
  • Log in or register to post comments

शतकाची

Dipankar
Sat, 04/03/2010 - 18:35 नवीन
शतकाची अपेक्षा होती पण........
  • Log in or register to post comments

शेवट

प्राजु
Sat, 04/03/2010 - 19:18 नवीन
शेवट गुंडाळला. अपेक्षाभंग!! :( - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा