✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कॅलेब

अ
अरुंधती यांनी
Fri, 03/26/2010 - 21:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3478 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

अरे...

श्रावण मोडक
Fri, 03/26/2010 - 22:32 नवीन
हा चित्रपट त्यावेळी पाहिला नव्हता? छे... वर्गमित्र होता या कारणासाठी तरी पहायलाच हवा होता. आणि तो गाजला नाही असं काही नाही. गाजणं म्हणजे काय यावर ते अवलंबून आहे. मी आठ तासांचा प्रवास करून हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा आठ तासांचा प्रवास करून गेलो होतो. चित्रपट पाहिला ते गाव माझ्या दोन गावांच्या मध्यावर होतं. एरवी तिथं थांबायचो नाही, त्या चित्रपटासाठी थांबलो होतो.
  • Log in or register to post comments

मीही पाहिला होता

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 03/27/2010 - 03:55 नवीन
मलाही चित्रपट पाहील्याचे आणि आवडला नसल्याचे आठवते. गाणी (ना धों महानोर) व संगित मात्र आवडले होते. त्यानंतर श्री आनंद मोडक (चित्रपटाचे संगितकार) यांची मुलाखतही कॉलेजात पाहील्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

श्रावण

अरुंधती
Fri, 03/26/2010 - 23:03 नवीन
श्रावण, मी तेव्हा 'हॉलिवुड' मोड मध्ये होते.... म्हणजे मला फक्त टॉम क्रूझ, रिचर्ड गेर, केविन कोस्टनर, ब्रूस विलिस, पीअर्स ब्रॉस्नन, अन्तोनिओ बन्डेरा, पॅट्रिक श्वाएझ वगैरे मंडळीच आवडायची! ;-) अगदी बॉलिवुड पिक्चर देखील बळेबळे पाहायचे.... मग मराठी चित्रपटाची काय कथा! त्या पिक्चरची पोस्टर्स मात्र रस्त्यावर जिथे जिथे दिसतील तिथे तिथे थबकून थबकून पाहिल्याचे व घरच्यांना ''हा बघा माझा वर्गमित्र,'' म्हणून कॅलेबचा फोटो दाखवल्याचे स्मरत आहे! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

व्यक्तीचि

शुचि
Fri, 03/26/2010 - 22:46 नवीन
व्यक्तीचित्रण आवडलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments

मुक्ता

विसोबा खेचर
Fri, 03/26/2010 - 22:59 नवीन
मुक्ता चित्रपट मला आवडला होता..त्यातला कॅलेब हा तुमचा मित्र हे वाचून आनंद वाटला..छान काम केलं होतं त्याने.. चित्रपटातील एका दृष्यात तो डॉ लागूंसोबत गप्पा मारतो आहे, असं दृष्य आहे.. तेव्हाही गोर्‍यापान, देखण्या लागूंसोबत कॅलेब उठून दिसला होता, छान दिसला होता! :)
आज तो कोठे आहे हेही माहीत नाही. पण अजून लक्षात आहे त्याचे ते मनमोकळे हास्य, स्वतःवर अफाट विश्वास, दुनियेची ऐसी की तैसी अशा वृत्तीची चालायची ढब, त्याचे हिंदी - मराठी बोलण्याचे अथक प्रयत्न आणि जगण्याची मस्ती! कॅलेब, तू जिथे कोठे आहेस, तुला खूप शुभेच्छा!
सुंदर लेखन, सुंदर व्यक्तिचित्रण! कॅलेब आवडून गेला.. आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

छान, सहजसुंदर लेखन

राजेश घासकडवी
Fri, 03/26/2010 - 23:38 नवीन
शब्द जाणवत नाहीत, नुसता कॅलेब आणि तो कॉलेजचा माहोल दिसतो. राजेश
  • Log in or register to post comments

सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/27/2010 - 00:31 नवीन
मस्तच लिहीलं आहेत तुम्ही! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हो, हो, मी

रेवती
Sat, 03/27/2010 - 00:34 नवीन
हो, हो, मी 'मुक्ता' पाहिला होता! आठवला! चांगले काम केले आहे त्याने! रेवती
  • Log in or register to post comments

मस्त लिवलय

गोगोल
Sat, 03/27/2010 - 02:07 नवीन
ह्ये कोन्च कालिज म्हनायच? सिमबयोसिस का?
  • Log in or register to post comments

व्यक्तिचित्रण

धनंजय
Sat, 03/27/2010 - 02:12 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sat, 03/27/2010 - 03:42 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

गाणी

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 03/27/2010 - 04:21 नवीन
कॅलेब आणि डॉ. लागूंवर चित्रीत केलेले 'एलायझा एलायझा' हे गाणे आठवते पण जालावर चित्रफीत मिळाली नाही. (ध्वनीफीत सापडली) Image removed.
music @ dhingana.com इतर काही गाणी मिळाली. बर्‍याच वर्षांनी ऐकतांना मजा आली. अरुंधतीतैंचे आभार. खाली गाण्यांच्या चित्रफिती. संवाद व सोनाली कुलकर्णी यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

केनियन आग्रह....!!

इन्द्र्राज पवार
Sat, 03/27/2010 - 11:39 नवीन
कॅलेब आणि केनया यावरून एक गोष्ट आठवली. इथे कोल्हापुरातही सायबर संस्थेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आफ्रिकन मुलामुलींचा समावेश आहे. अर्थात त्या खंडातून आल्यामुळे सर्वाना एकाच पट्टीत गुंतविण्याचा सर्वसाधारण नियम असतो. तरीही केवळ "केनया" तून आलेल्या प्रत्येक विद्यार्थाचा असा आग्रह आम्हाला दिसला कि आम्ही त्यांना "आफ्रिकन" असे न संबोधिता "केनियन" असा उल्लेख करावा. कारण? कारणाचा शोध घेता असे आढळून आले कि ही केनियन मंडळी इथिओपिया वा सुदान सारख्या प्रांतातील घटकांना दुय्यम मानतात व त्यांच्या मते त्यांनी आफ्रिका खंड म्हणजे शापित व दरिद्री असे केले आहे. केनिया व काही प्रमाणात झाम्बिया ही दोनच राष्ट्रे प्रगतशील आहेत, त्यामुळेही असेल कदाचित कि भारतात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थांना आपणास "आफ्रिकन" ऐवजी "केनियन" म्हणवून घेणे जास्त आवडत असेल.
  • Log in or register to post comments

स्वागत

मुक्तसुनीत
Sat, 03/27/2010 - 18:48 नवीन
नवीन सभासदाचे स्वागत करतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

तो

समंजस
Sat, 03/27/2010 - 15:05 नवीन
तो चित्रपट पुर्ण बघितला नाही, अधुन मधुन थोडाफार बघितला :)
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Sat, 03/27/2010 - 18:17 नवीन
कॅलेब आवडला. मुक्ता पाहिला होता,पण सिनेमा खास वाटला नाही. स्वाती
  • Log in or register to post comments

सर्वांचे

अरुंधती
Sat, 03/27/2010 - 22:24 नवीन
सर्वांचे धन्यवाद! :-) अक्षय, ध्वनिचित्रफीती व ध्वनिफितीचे दुवे दिल्याबद्दल आभार! :-) आजच कॉलेजमधील तेव्हाच्या एका मैत्रिणीशी बोलले...पुन्हा ते दिवस आठवले! कदाचित कळेल कॅलेबचा ठावठिकाणा गप्पांमधून! चित्रपट सर्वांनाच आवडेल असा नव्हता. पण एका आफ्रिकन तरुणाने प्रयत्नपूर्वक एक भारतीय भाषा बोलण्याची केलेली धडपड ( आणि पडद्याआड त्याने त्यासाठी घेतलेले श्रम) ह्यासाठी माझ्या दृष्टीने तो खासच राहील! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा