त्यांनी त्यांचा छायाचित्रणापासून सुरु झालेला कलेच्या माध्यमातला प्रवास पुढे नेपथ्य आणि नंतर नाट्यनिर्मितीसारख्या अतिशय कष्टाच्या आणि प्रचंड जोखमीच्या व्यवसायापर्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास नेला.
एका धडाडीच्या व्यक्तिमत्त्वास आदरांजली!
(मागे सावरकर आजोबांवरची लेखमाला लिहीत असताना त्यांच्याकडून ऐकले होते की मोहन वाघ जेव्हा छायाचित्रणाच्या क्षेत्रात उमेदवारी करीत होते त्यावेळी ह्या सावरकरांचीच त्यांना बरीच मदत झाली होती.)
चतुरंग
मराठी नाटकाला वाघांनी एक भव्यता आणली. त्यांच्या मुलाखतीतून नाटकाबद्दल त्यांची ओढ व आत्मीयता प्रकट व्हायची. मासिकातून त्यांची उत्तोमोत्तम छायाचित्रे पाहण्यात खूप आनंद वाटायचा. ऐकून दुखः झाले.
नाट्यक्षेत्राची मोहन वाघ गेल्यामुळे अपरिमित हानी झालीये. "चंद्रलेखा" म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातला एक मानाचा तुरा !! आणि मोहन वाघ म्हणजे त्याचे कर्ताधर्ता. त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालीये.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो !!
"ऑल दी बेस्ट' सारख्या नवख्या मंडळींच्या नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले तरी अजून दोन हजार प्रयोग सहज होतील एवढा प्रतिसाद प्रेक्षक त्या नाटकाला देतात ही मोहन वाघ यांची किमया !
पृथ्वी थिएटरवर देवेंद्र पेम यांच्या या एकांकिकेचा प्रयोग पाहून वाघांनीच त्यांना त्याला पूर्ण नाटकाचे रूप देण्याचा आग्रह केला आणि पुढे जे घडले तो तर इतिहास आहे. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर ही सारी मंडळी आज मराठी चित्रपटसृष्टीत स्टार मंडळी आहेत, पण "ऑल दी बेस्ट' च्या पहिल्या संचात ही सर्व मंडळी होती. व्यावसायिक रंगभूमीवर प्रथितयश निर्माते असलेले मोहन वाघ नवख्या मंडळींना घेऊन नाटक काढतायत म्हणून काहींनी त्यांना वेड्यात काढले होते. पण हे धाडस वाघांमध्ये जन्मजात असावे . शेवटी वाघ च ते . मध्यरात्री नाटकाचे प्रयोग लावण्याचे धाडस दाखवायचे तर त्याला "वाघा'चेच काळीज हवे. इंग्लंडमध्ये शेक्सपियरच्या जन्मगावी स्ट्रेटफर्ड ऍवॉनमध्ये, इतकेच काय थेट "विक्रांत' युद्धनौकेवरदेखील त्यांनी आपल्या "गुलमोहोर' नाटकाचा प्रयोग केला होता. त्यांचे "गरुडझेप' मंचावर आले, तेव्हा एकाच दिवशी शुभारंभाचे चारही प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम वाघांनी नोंदवला होता. अशा या विक्रमवीराची शिस्त, वक्तशीरपणा याचीही नोंद घ्यायलाच हवी. दरवर्षी 31 डिसेंबरला "चंद्रलेखा' चे नवे नाटक कसे येते, त्यामागे अर्थातच ही शिस्त आहे, हे परिश्रम आहेत. सडेतोड बोलण्याबद्दल वाघांची ख्याती होती .
मोहन वाघांना माझीही विनम्र श्रद्धांजली! खुदा त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
~ वाहीदा
प्रतिक्रिया
माझीही
भावपुर्ण श्रद्धांजली
+१
श्रद्धांजली
विनम्र
भावपूर्ण
धक्का
खरोखर ते एक चांगले व्यक्तिमत्व होते.
मोहन वाघांना श्रद्धांजली!
अजून एक
भावपूर्ण श्रद्धांजली
धक्कादायक
भव्यता आणली
मोहन
मोहन
दु:खद घटना.
मोहन वाघ
श्रद्धांजली !
भावपूर्ण
या महान
भावपूर्ण
छायाचित्रणापासून नेपथ्य आणि नाट्यनिर्मितीपर्यंत झेप घेणारे वाघ !