✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची

र
राजेश घासकडवी यांनी
Fri, 03/19/2010 - 01:13  ·  लेख
लेख

Book traversal links for कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची

  • ‹ कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते
  • Up
  • कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11687 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

तू मेर

Pain
Fri, 03/19/2010 - 02:02 नवीन
तू मेर हजबंड मै तेरी वाईफ, जो मै कहू तुम करोगे, तो आओ मिलकर काम करे, प्यार की कोई बात करे. कधीतरी अचानक, कल्पना नसताना त्या नात्यातल्या तरुणाला तरुणीकडनं शब्द ऐकू येतात ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर असतं 'आय थिंक वी नीड टू टॉक'. नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा या आपण दोघं नक्की कोण आहोत, त्यापासून तयार होणारं नातं हे चांगलं बनतंय का, ते चांगलं बाळसं धरतंय का, ते दिसायला चांगलं आहे का, लोक त्याला काही बोलत तर नाहीत ना, या स्त्रीच्या मातृसुलभ भावनेतून उद्भवतात (८२.४७% वेळा). कधी ते खूप गोंडस हसतं तेव्हा त्याला तीट लावावीशी पण तिला वाटते. पुरुषाला मुळातच या सर्व गोष्टींची तितकी हौस नसते. असल्या बाबतीतली त्याची उदासीनता त्याच्या स्वत:च्या नट्ट्यापट्ट्यातून दिसून येते. त्याच्या मते, बहुतेक दिवशी आंघोळ, लाज राखण्यापुरते कपडे आणि सकाळी दात घासण्याचे जगावर उपकार, एवढं त्या नात्याने केलं की बास झालं. :)) =)) छान !
  • Log in or register to post comments

हम्म्म

धनंजय
Fri, 03/19/2010 - 02:11 नवीन
हाहा :-D शीर्षकाबद्दल सुचवणी - "गाणी गहिऱ्या नात्यांची" ऐवजी "कविता/कथा गहिऱ्या नात्यांची" असे करावे. शेवटच्या वाक्यातील दुव्यावरील कवितेला चाल लावून गाता येईल हे जितके सहज पटते, तितके कवितकाच्या उत्पादनातून वाटत नाही. कवितकातल्या उदाहरणाची कल्पना मात्र सार्वकालिक. वरील लेखात कवितक नसून लघुकथक सांगितलेले आहे, अशी दिपोटी* म्हणून आमची टिप्पणी आहे. - - - *दिपोटी = डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ स्कूल्स. याला फारसे काही कळत नसते, पण शेरे मारण्यासाठी त्याला पगार देतात.
  • Log in or register to post comments

सूचना स्वीकारली आहे...

राजेश घासकडवी
Fri, 03/19/2010 - 03:15 नवीन
आम्हाला आमच्या शाळेचं सर्टीफिकेशन कायम ठेवायचं आहे. राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लय भारी

मुक्तसुनीत
Fri, 03/19/2010 - 02:13 नवीन
=)) =)) =)) =)) =)) पुन्हा एकदा शिसानविवि
  • Log in or register to post comments

भल्याभल्य

Nile
Fri, 03/19/2010 - 06:35 नवीन
भल्याभल्यांनी शिरसाष्टांग घातल्यावर आम्ही काहीही न बोलता आमची लाज राखतो. मात्र भावी आयुष्यात (कवितकं करायला हो) उपयोगी पडतील अश्या फार महत्त्वाच्या गोष्टींची भर आमच्या ज्ञानात पडली आहे इतके नमुद करुन मास्तरांना धन्यवाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+२

श्रावण मोडक
Fri, 03/19/2010 - 10:33 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

गुर्जी पाय

शुचि
Fri, 03/19/2010 - 02:34 नवीन
गुर्जी पाय लागू मी शीतलता तेवणारी नभी तू प्रखर रवीकिरण आपले होणार कसे मीलन? ___ मी सरीता खळाळून वहाणारी तू पहाड स्थितप्रज्ञ शांत कसे गाऊ मीलनगीत गाण्यात? ___ मी कोमल कमलीनी मृदुल तू कठोर तो पाषाण नाते कसे फुलेल अपुले अजाण? ___ असेच दूरून पेटून विझायाचे अंतरी अन निखारे वहायाचे असेच का रे राख राख व्हायाचे? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

छान

राजेश घासकडवी
Fri, 03/19/2010 - 19:49 नवीन
कोमल कमलिनी आणि कठोर पाषाण, खळखळती सरिता आणि स्थितप्रज्ञ पहाड अशा साचेबद्ध उपमांनी कवितेला बहार आलेला आहे. कवितकच्या प्रणालीशी तुम्ही कायमच इमान राखलेलं आहे, ते याही रचनेत दिसून येतं. बाकी ती व तो काव्य या बाबतीत कवितक तुम्हाला काय शिकवणार? (ह. घ्या.) तुमच्या स्वाक्षरीत मधुशालातलं एक कवन दिसलं. अधिक गुणांसाठी मधुशालाच्या काव्यांमध्ये काही प्रणाली दिसते का ते पहा. (डिस्क्लेमर - प्रणाली असणं म्हणजे काव्य वाईट असणं असं नव्हे - ताजमहालदेखील आराखडे करूनच बनवला होता...) राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वा वा वा!!

चतुरंग
Fri, 03/19/2010 - 02:37 नवीन
क्या बात है! :D ग्रासस्टांझाज, आजपासून तुझं नाव 'वर्जेश घासकडवी'!! :B (जालिंदरषिष्य)चतुरंग
  • Log in or register to post comments

पीएल

मुक्तसुनीत
Fri, 03/19/2010 - 02:42 नवीन
पुलंच्या "हसवणुकी"मधल्या पहिल्या लेखाची आठवण झाली : नवकथेची रेसिपी : (पुलंचा हा लेख साठ सालातला !) तु मा प्रे आ तु मा प्रे ना तू मा प्रे आ पण हा खलनायक का असं करतोय ? तू मा प्रे आ पण तुझा बाप का अ क?
  • Log in or register to post comments

उपमा शिळ्या असल्यास यमक-वृत्त आवश्यक

धनंजय
Fri, 03/19/2010 - 04:02 नवीन
पहिल्या प्रकारात बटबटीत आणि चाकोरीतल्या उपमा वापरल्या तर सोप्या. पण त्या बेचव मात्रेला यमक-वृत्ताच्या साखरपाकातून काढल्याशिवाय गिळवणार नाही. शिवाय शब्दही लाडीक आणि जुन्या वळणाचे वापरलेले बरे. उदाहरणार्थ हा गृहपाठ : - - - तो : मी रवि तळपत, तू ग यामिनी उगता मी, तू शिघ्रगामिनी चंचल शशि तुज लाखलाभ गे बनाव अपुला शक्य नसे ती : शशि हा अंशच तव तेजाचा चित्र तुझे येथे तू नसता भेटसि मज तू सांजपहाटे विवाह अपुला अढळ असे - - - वृत्त-यमकाशिवाय वाचवत नाही, वाचत नाही.
  • Log in or register to post comments

गृहपाठ

राजेश घासकडवी
Fri, 03/19/2010 - 07:08 नवीन
नेहेमीप्रमाणेच चांगला झाला आहे, पण यमक वृ्त्तांचं बंधन घालून घेणं अनाठायी, काहीसं रसभंजक झालं असं वाटतं. कवितक प्रणालीमध्ये नाही ते करून दाखवून थोडी शाईन मारण्यापलिकडे जुन्या धाटणीच्या शब्दांनी व रचनेने नव्वदोत्तरीच्या मानसिकतेचा अर्क कवितेत सामावून घेण्यात हे कवन अयशस्वी झालं असं वाटतं. छंद नाकारण्यात जी व्यक्तीगतता आहे, ती या रचनांच्या तळमळीचा आत्मा आहे असं वाटतं. तू सूर्यासारखा बाहेर दिवसा आणि माझी तर कॉलसेंटरची रात्रपाळी... कशी फुलावी आपल्या प्रेमाची लव्हाळी? हे जास्त खुलतं. यमक हलकेच आलेलं आहे, पण चवीत ते पुढे येत नाही. राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

हा हा!

चित्रा
Fri, 03/19/2010 - 18:48 नवीन
भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सुप्पर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/19/2010 - 18:50 नवीन
>>तू सूर्यासारखा बाहेर दिवसा आणि माझी तर कॉलसेंटरची रात्रपाळी... कशी फुलावी आपल्या प्रेमाची लव्हाळी? ओ हो, क्या बात है ! =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

विवाह अपुला "अढळ" असे

तुका म्हणे
Fri, 03/19/2010 - 07:46 नवीन
तुम्हाला "अटळ" म्हणायचे आहे कय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

नाही, "अढळ" असेच!

धनंजय
Fri, 03/19/2010 - 18:58 नवीन
नाही, "अढळ" असेच! (या धड्याच्या अनुषंगाने "मै तेरा हजबंड तू मेरी वाईफ" हे आधीच गृहीत धरायचे आहे.
नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा... एकदा का नात्यात पडलं की पुरुषांचे शिकारीचे दिवस संपलेले असतात, (गृहपाठातले पहिले कडवे) आणि एकत्र घरकुल बनवण्याचे स्त्रियांचे दिवस सुरू झालेले असतात. (गृहपाठातले दुसरे कडवे)
गृहपाठात कुठल्यातरी बाबतीत धड्याच्या चौकटीला धरून ठेवल्यास पास होण्याइतपत गुण मास्तरांना भूतदयेने तरी द्यावेच लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुका म्हणे

एकंदरीतच

विसोबा खेचर
Fri, 03/19/2010 - 07:20 नवीन
एकंदरीतच सगळा प्रकार लै भारी आहे.. :)
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Fri, 03/19/2010 - 10:52 नवीन
या प्रकाराला पोएटिक प्रोग्रामिंग म्हणून त्याचा मराठीच्या अभ्यासक्रमात किंवा झालंच तर संगणकशास्त्राच्या अभ्यासक्रमात समावेश करावा काय? (संगणकशास्त्रज्ञ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अफाट

नंदू
Fri, 03/19/2010 - 11:25 नवीन
कवितकांच्या या अफाट मालिकेबद्दल ग्रासस्तांझा गुरूजींच्या प्रतिभेला दंडवत. हा भाग देखिल नेहमीप्रमाणेच बहारदार झाला आहे. जाता जाता "ते माझ्या बुद्धीने केलेलं मराठीतलं स्वैर रूपांतर आहे" =)) हे मात्र फारच आवडलं. आणि हो एक नवा शब्द कळला 'पापिलवार' तसा संदर्भाने अर्थ लागतोय पण म्हणजे नक्की काय ते कळलं तर बरं.
  • Log in or register to post comments

नन्दू

Pain
Fri, 03/19/2010 - 12:36 नवीन
ते बहुदा "popular" असावे.
  • Log in or register to post comments

मस्त...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/19/2010 - 18:42 नवीन
आपल्या स्वप्नांचं सुंदर आकाश तु रंगवतेस किती सहजपणे आभाळभर पसरलेला तुझा खट्याळपणा आवरता आवरता, सावरता सावरता, मला आठवतेस तू ! [प्रश्नार्थक वाक्याऐवजी उद्गारवाचक चालेल का ?] अश्रुंच्या पलिकडेही जाऊन तू सहज सोसते, आयुष्यातील वाळूतील चटक्यांना भावना जाळत तु तेवत ठेवतेस हलकेच माझी ज्योत. कसं सांगु तुला, तुझ्याचसाठी तुझ्याच स्वप्नांना फुलवण्यासाठी मी तडजोड करतो वादळ वार्‍यांशी ! जमलं का ? कविता कशी करावी या विषयावर बोलायला.. आमच्या कॉलेजात येता काय पुढल्या वर्षी गॅदरींगला.[अटी लागू] :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चांगली जमली आहे...

राजेश घासकडवी
Fri, 03/19/2010 - 19:35 नवीन
'आवरता आवरता, सावरता सावरता' ने नादमयता आलेली आहे. 'वादळवाऱ्यांशी तडजोड' पण छान. आणि या कवितेच्या सुजाण स्वराला उद्गारवाचक चिह्नंच अधिक शोभून दिसतात. तुम्ही कवितकच्या प्रणालीचा थोडा विस्तार केलेला आहे. 'तू क्ष करतेस, त्यावर य करताना मला आठवतं तुझं अ करणं, तुझं ब करणं. त्यामुळे मला क वाटतं.' हे छान व्हेरिएशन आहे. कवितकच्या नव्या व्हर्जनमध्ये त्याचा नक्की समावेश करीन. पहिल्या चार कडव्यांचं एक वाक्य करून बघा... राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्षमस्व

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 03/19/2010 - 21:16 नवीन
गुरुजी, कवितक प्रणालीची द्वारे सामान्यांना उघडी करून दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहे. मागच्या धड्याखालचा गृहपाठ आजारपण सांगून टाळता आला पण यावेळी सपशेल हरलो आहे. काही म्हणता काही सूचत नाही. हा गृहपाठ सोडवता येणार नाही असे वाटते. क्षमस्व. साष्टांग नमस्कार करून पळवाट न काढता प्रामाणिकपणे असमर्थता व्यक्त करत आहे. (प्रामाणिक) अक्षय
  • Log in or register to post comments

असं कसं...

राजेश घासकडवी
Sat, 03/20/2010 - 07:40 नवीन
अहो तुमच्यासारख्या अभ्यासू विद्यार्थ्याने असं हताश होऊन कसं चालेल? नाती सगळीकडे असतात, प्रश्न सगळीकडे असतात. तुम्हीच एक लिहिलेला आहे. तू केलिस उघडी दारे, मानतो तुझे आभारे, अक्षयास पूर्णत्वाचा हा आशिर्वच तव साचा पण नकळे अक्रित झाले, मम पात्र रिते हे पडले कशि करू अता प्रतार्णा देऊन तब्ब्येती कार्णा तव प्रश्न मला झेपेना मज काही काही सुचेना कर क्षमा मला यावेळी ना सुचे शब्द ना ओळी राजेश
  • Log in or register to post comments

गुरूची आरती

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 03/20/2010 - 20:30 नवीन
आहे नाम गुरूचे घासू मी शिष्योत्तम उदासू मज वाटे मार्ग कठिण दिसे मला न तीर तो पळवे सर्व शीण सांगे शोध हाच धीर जगती नातीच फार प्रश्न त्यांचेच भार असे कसे हे नाते कवितकात न्हाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

असे कसे हे

Nile
Sun, 03/21/2010 - 12:38 नवीन
असे कसे हे नाते कवितकात नव्हते
असा बदल सुचवतो. ;) डांबरट शिष्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

घासकडवी

शरदिनी
Tue, 05/18/2010 - 21:16 नवीन
घासकडवी गुरुजी.... हिंदोळ्याचे विवेचन आणि हा कवितकाचा पाठ आवडला...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा