✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

स
समीरसूर यांनी
Wed, 03/17/2010 - 14:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17187 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

च्यायला!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/17/2010 - 23:46 नवीन
च्यायला!!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अगायायायाया!!!!

चतुरंग
Wed, 03/17/2010 - 23:47 नवीन
गोर्‍या अमेरिकन बायका पांढर्‍याफटक पडल्या असतील!! =)) =)) (धुविंग)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

(धुविंग)चतु

टारझन
गुरुवार, 03/18/2010 - 00:04 नवीन
(धुविंग)चतुरंग
=)) =)) =)) =)) =)) =)) - (प्रथमंच सहिला सहीने उत्तर देण्यास निरुत्तर झालो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

=))

स्वप्निल..
गुरुवार, 03/18/2010 - 00:41 नवीन
>>गोर्‍या अमेरिकन बायका पांढर्‍याफटक पडल्या असतील!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

) बिचारीला

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 03/18/2010 - 12:06 नवीन
:)) बिचारीला कळ्ळ पण नसेल आपण काय बोलुन गेलो ते. असो पण थोड्याफार प्रमाणात ही गोष्ट आढ्ळुन येते. त्या लहान पोरांची तरी काय चुक? मराठी फक्त घरीच बोलल जात परदेशात आणि बाहेर पडलं घरच्या की इंग्लिश चालू. त्यामुळे बोलतान एकदम बावचळ्यासारख होत असेल. इकडच तिकडे आणी तिकडच इकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

गमतीदार

धनंजय
Wed, 03/17/2010 - 23:54 नवीन
गमतीदार गप्पा. (गोंयकार) धनंजय
  • Log in or register to post comments

वर्तमानपत्रे

रामपुरी
Wed, 03/17/2010 - 23:58 नवीन
वर्तमानपत्रे यात आघाडीवर आहेत. "प्रीती झिन्टा बाथरूममध्ये फसली" यासारखी वाक्ये सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता मध्ये वाचायला मिळतात.
  • Log in or register to post comments

"अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली

सुधीर काळे
गुरुवार, 03/18/2010 - 14:36 नवीन
मला या बाथरूम ('मोरी') या शब्दावरून बटाट्याच्या चाळीतलं "अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली. अमेरिकेत रहाणार्‍या माझ्या मुलाने व सुनेने माझ्या नातीला आतापर्यंत मराठीतच बोलायला शिकवले आहे, पण जशी ती बालवाडीत जाऊ लागली तशी अपेक्षेप्रमाणे तिच्या बोलण्यात मराठी व इंग्लिशची भेसळ होऊ लागली आहे. अगदी "आय् अ‍ॅम पुसिंग"चीच तर्‍हा! पण ऐकायला खूप मजा येते. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

खलबत वि. गलबत

बेसनलाडू
गुरुवार, 03/18/2010 - 01:57 नवीन
खलबत-गलबत वाला किस्सा वाचून झीट यायची बाकी राहिली. (मराठमोळा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

माझा विश्वास बसला

प्रियाली
गुरुवार, 03/18/2010 - 03:43 नवीन
पुणेकर मुंबईकर वाद चालूच राहतील पण वर दिलेल्या किस्स्यांवर (ते थोडेसे अतिशयोक्त आहेत असे मानले तरी) माझा विश्वास बसला.
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात
, मी सहमत आहे. आहे त्याला आहे म्हणावं. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले. बर्‍याचदा माझे भारतातील जुने मित्र-मैत्रिणी माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. मी चुकीचे बोलते म्हणून नाही तर मराठी बोलते म्हणून. गेल्या वेळी नटरंग पाहिल्यावर कोणाला तरी म्हटले - "कालच एक मराठी चित्रपट पाहिला." त्यावरचं वय वर्षे ४०चे मुक्ताफळ - "चित्रपट???? हे काय अगदी पेपरात रिव्ह्यू लिहिल्यासारखं बोलतेस."
बिनदिक्कत, वकील वगैरे लेखातील शब्द
बघा! वापरतो की नाही गैरमराठी भाषिक शब्द वाक्यागणिक आपण. ;) तसेच इंग्रजी शब्दही मराठ-मोळे होतील. आशावादी रहा - बी पॉझिटिव!
  • Log in or register to post comments

+१ चित्रपट,

II विकास II
गुरुवार, 03/18/2010 - 07:54 नवीन
+१ चित्रपट, ह्या शब्दाला काय काय झाले आहे. काही माहीत नाही. असाच अनुभव मला बर्‍याच ठिकाणी आला. असो. हल्ली १ पेक्षा जास्त भाषांचे शब्द एकत्र करुन बोलण्याची पदधत चांगलीच पडली/पाडली गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

किस्से

समीरसूर
गुरुवार, 03/18/2010 - 11:23 नवीन
प्रियाली, माझे किस्से अतिशयोक्त नाहीत; अगदी १००% खरे आहेत. :-) नेहमीच्या बोलण्यात देखील मी सवयीप्रमाणे आठवडा, रविवार, शनिवार, तारीख, आकडा हे शब्द वापरतो. म्हणजे मी जे बोलतो ते आजकाल कसे बोलले जाते: मी: पुढच्या आठवड्यात बघू रे 'रिंगा रिंगा' आजः नेक्स्ट वीक मध्ये बघू ना यार... मी: मी शनिवारी संध्याकाळी गेलो आणि रविवारी दुपारी परत आलो. आजः मी सॅटरडे इविनिंगला गेलो आणि संडे आफ्टरनूनला परत आलो. मी: एकूण पंचेचाळीस माणसे होती. आजः टोटल फॉर्टीफाईव्ह फोक्स होते. मी: अरे, निदान एवढं तरी सांग की कधी फोन करशील मला. आजः यार, अ‍ॅट लिस्ट एवढं तरी सांग की कॉल कधी करशील. मी: अरे, दवाखान्यात जाऊन ये; ताप आहे तुला. आजः गो, सी अ डॉक्टर, मॅन! तुला फिवर आहे. अशी बरीच उदाहरणे देता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

माझ्या

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 03/18/2010 - 16:52 नवीन
माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. माझी मावस सासु सुद्धा मला अशिच फिस्सकन हसते. कारण मी जेवण बनवले न म्हणता स्वयंपाक केला म्हणते. माझ्या नंणदा सुद्धा त्यावर हसतात कारण त्यान्च्यामते मी फारच शुध्द बोलते, त्याना सैपाक शब्द योग्य वाटतो. 'मी आली मी गेली 'असे अशुध्द मराठी बोलले जाते. मला अंगावर काटाच येतो. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चुचुताई, आली गेली..

चित्रा
गुरुवार, 03/18/2010 - 18:37 नवीन
चुचुताई, मी आली/मी गेली, हे बर्‍याच घरांत अगदी सर्रास बोलले जाते. जाती-जातींमधील वैशिष्ट्यांवर, कुठे राहतात त्यावर अवलंबून असते. त्यात वैविध्य आहे म्हणून तर गंमत आहे. -(सीकेपी मेव्हण्याची मेव्हणी) चित्रा माझ्या सासरीही "ती असं 'करती' ", " 'पटकिनी' जा", असे ऐकून लग्नानंतर नक्की आपण कुठच्या ग्रहावर येऊन पडलो आहोत, असा विचार मनात आला होता ;) पण नंतर जिच्याबरोबर आयुष्यातली निदान पंधरा वर्षे खेळले/तिच्याबरोबरच वाढले, त्या मावसबहिणीनेच असे वाक्य मोठेपणी बोललेले पाहून आश्चर्याचा जो धक्का बसला तो कसा सांगू? आणि आता सासरची काही मंडळी असे बोलणार याची सवय झालेली आहे, कानालाही खटकत नाही. तेव्हा ती शुद्ध-अशुद्धची भानगड नको, जशी सवय आहे तसे मराठीच बोलतायत ना? मग प्रश्न नाही! अर्थात तुमच्या मराठीला फिस्सकन हसतात हे चूक आहे. हसले तर दात दिसले, म्हणून सोडून द्या. ;) तुमचं 'ध्यान' तर नाही ना हसत? मग झालं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

नशिबवान?

राजाभाऊ
गुरुवार, 03/18/2010 - 09:51 नवीन
समीरशेठ, नशिबवान आहात; हे सगळे नमुने तुमच्याबरोबर काम करतात... 8>
  • Log in or register to post comments

माझे मराठी

विजुभाऊ
गुरुवार, 03/18/2010 - 10:04 नवीन
माझे मराठी लेखन वाचन आणि बोलणे उत्तम आहे. मी शक्यतो मराठी बोलताना अस्खलीत भाषेत बोलतो. बरेचदा मुम्बैतील लोकाना मी मराठी बोलतो याचेच आश्चर्य वाटते. त्यातून कधितरी चुकून अम्मळ किंवा व्यदतोव्याघात असे शब्द वापरले की ते खूप गोंधळून जातात. उपहास कथा हे जयवन्त दळवींचे पुस्तक माझ्या हातात होते त्यावर एकजण विचारायला लागला की उपास करताना ही कथा वाचायची असते का म्हणून? पण शुद्ध मराठी शब्द ( प्यूवर मराठी वर्ड्स) वापरून या मंडळींची तंतरलेली बघताना जाम मज्जा येते. बाय द वे ही मंडळी भेंडी / जुलाब /ढोस/ हे शब्द मात्र वेगळ्या अर्थाने अस्खलीतपणे वापरतात ;) Image removed.
  • Log in or register to post comments

शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत

सुधीर काळे
गुरुवार, 03/18/2010 - 12:56 नवीन
समीरसूर-जी, तुमचा लेख फारच सुंदर व काळजाला भिडणारा आहे. १० टक्के अतिशयोक्ती असेल पण तेवढीच. शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत. असेच लिहीत जा. प्रतिसाद मात्र बरेच भरकटलेले वाटले. मुंबई वि. पुणे हा वादही उगीचच उपटवला गेला व त्यामुळे लेखावरचे प्रतिसाद राहिले बाजूला पण पुणेकर वि. मुंबईकर हा सामनाच जास्त रंगला. आज-काल राजाभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नाने (व कांहीं अंशी 'अबू आझमी'टाईप 'प्रसादा'ने) मायमराठीला जरा बरे दिवस येणार असे दिसते! (राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.) आपण सर्वांनी मराठीतच बोलायचे असा पण केल्यास हळू-हळू मराठीला वैभव प्राप्त होईल यात शंका नाहीं. एक दुरुस्ती! बर्‍याच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या तामिळ व बंगाली तरुणांना तामिळ व बंगालीत बोलता येतं पण तामिळ व बंगालीत लिहिता-वाचता येत नाहीं. माझ्या तामिळ साहेबाचे उदाहरण मला वैयक्तिकरीत्या माहीत आहे! ------------------------ सुधीर काळे President: presidentofindia@rb.nic.in; PM: pmosb@pmo.nic.in
  • Log in or register to post comments

स्वरराज

भोचक
गुरुवार, 03/18/2010 - 19:52 नवीन
(राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.)
त्याचं मूळ नाव स्वरराज असं आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कोण हे मराठी मुंबईकर तरूण?

चिंतातुर जंतू
गुरुवार, 03/18/2010 - 13:22 नवीन
या सर्व चर्चेत मुंबईकर मराठी तरूण म्हणजे ब्राह्मणी वर्गातले किंवा तशी पार्श्वभूमी असलेले असे गॄहित दिसते. परंतु संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास दादर, परळ, लालबाग, वरळी अशा भागांत चाळींत राहणारे ते अगदी पार कांदिवली वगैरे उपनगरांच्या झोपड्यांत राहणारे मराठी तरुण संख्येने खूप जास्त असावेत, असे वाटते. त्यांच्या बाबतीत वरील चित्रण यथार्थ वाटत नाही. मनसे व शिवसेना यांच्या मराठीवादी आंदोलनांस या तरुणांचा मोठा पाठिंबा आहे, व त्यांत (म्हणजे राडे करण्यात) प्रत्यक्ष सहभागही आहे. या उलट (तशी तुलना करायची झाल्यास) पुण्यातील डेक्कन, औंध वा कोथरुडात राहणारी (म्हणजे ब्राह्मणी पार्श्वभूमीची) याच वयाची तरुण मुले-मुली अशीच मराठी बोलतात व असेच वागतात. अर्थात, पुण्यातही बहुजन समाजांतली मराठी मुले तशी नाहीत. सोमवार/रास्ता पेठ, शहरातील पूर्व भाग अथवा अगदी एरंडवन-डेक्कन परिसरात चाळी, झोपड्या, कच्ची घरे येथे गेलात, तर वेगळे चित्र आढळेल. आपले काहीतरी चुकले आहे, हे खरे; पण उगाच आपले दोष त्यांच्या माथी कशाला? त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

जातीचा संबंध नाही

समीरसूर
गुरुवार, 03/18/2010 - 14:23 नवीन
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही. थोडं खालच्या स्तरात बघितलं तर उलट मराठी बोलणार्‍या व्यक्तीशी देखील हिंदीतून बोलण्याची सवय फोफावत असल्याचे दिसते. मधम वर्गात देखील हीच सवय आढळून येते. मराठीच्या वापराचा न्यूनगंड ही एकमेव समस्या यामागचे कारण आहे आणि ती सगळ्याच स्तरातल्या आणि जातीतल्या मराठी लोकांमध्ये दिसून येते. उच्च वर्गात तर इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव जास्त आहेच. मी महाविद्यालयात असतांना उच्च वर्गातल्या मराठी मुली चुकूनही मराठी बोलत नसत आणि मराठी बोलणार्‍यांकडे तुच्छतेने बघत असत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सामाजिक पार्श्वभूमी, जात वगैरेंचा या समस्येशी काही संबंध आहे असे मला वाटत नाही. --समीर
  • Log in or register to post comments

असे वाटले नाही

चिंतातुर जंतू
गुरुवार, 03/18/2010 - 15:42 नवीन
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही.
मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा: आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे. पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते. मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो. मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही. यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

जातिवाचक

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 03/18/2010 - 16:41 नवीन
जातिवाचक उल्लेख अगदीच अवांतर आहे. आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

म्हणजे काय?

चिंतातुर जंतू
गुरुवार, 03/18/2010 - 17:15 नवीन
आपले म्हणणे नीटसे कळले नाही.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.
मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्‍याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

सरमिसळ

समीरसूर
Fri, 03/19/2010 - 09:02 नवीन
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. मला असे वाटत नाही. मराठी नीट येत नसल्यचा अभिमान सरसकट सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये दिसतो. मी ज्या माझ्या सहकार्‍यांची उदाहरणे सांगीतली आहेत त्यात ब्राह्मण कुणीच नाही. किंबहुना मराठी नीट येत नसल्याचा अभिमान मला मुंबईच्या तरुणांमध्ये जास्त आढळला. त्यांच्यात जातीचा कुठे संबंध आल्यासारखे वाटले नाही. मुंबईचा मराठी तरुण हीच एक जात. उलटपक्षी ब्राह्मण समाजात थोडे सोवळे वातावरण असल्याने आणि जागृती जास्त असल्याने ब्राह्मण समाजातील तरूण त्यातल्या त्यात जास्त बिनधास्तपणे मराठी (बर्‍याच अंशी शुद्ध) बोलतांना, मराठी चित्रपटांवर हिरीरीने बोलतांना आढळतात. आजकालच्या शहरी वातावरणात सगळी सरमिसळ झालेली आहे. आमच्या कार्यालयात सफाई करणारे दोन मराठी तरूण एकमेकांशी मराठी येत असून देखील हिंदीमध्ये बोलतात. चारचौघात बोलतांना आपण बोललेले हिंदी इतरांच्या कानावर गेले म्हणजे आपली पत वाढते असा एक गैरसमज बर्‍याच तरुणांमध्ये आहे. त्यातलेच हे उदाहरण. बहुजन समाजातले तरूण मराठी बोलतात पण याच समाजात हिंदीच्या अव्वल असण्याच्या गैरसमजाचा पगडा देखील दिसतो. मी जर त्यांच्याशी मराठीत सुरुवात केली तर ते हिंदीत बोलतात. एका रुग्णालयात चतुर्थ श्रेणी मावश्या माझ्याशी प्रत्येक भेटीत हिंदीतून बोलत असत. मी मराठीच बोलतो हे लक्षात आल्यावर त्या नाईलाजाने मराठीतून बोलत असत. याला मराठीचा न्यूनगंड नाही तर काय म्हणावे? बहुजन समाजातील तरूण मराठी वृत्तपत्र वाचतात पण ते अगदी वरवरचे. आणि खूप कमी बहुजन तरूण वृत्तपत्र वाचतात. 'पोलीस टाईम्स', 'संध्यानंद' इत्यादी भडक वृत्तपत्र वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदीतून संवाद साधायचा प्रयत्न करतात. हिंदी देखील व्यवस्थित येत नाही म्हणून आपापसात मराठीत बोलतात. जर त्यांना यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली असती तर कदाचित त्यांनी देखील तिचा सर्रास वापर केला असता. सध्याच्या घडीला ते आपापसात मराठीत बोलतात यावरून त्यांना मराठीचा न्यूनगंड नाही हे सिद्ध होत नाही कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या हिंदीतून बोलण्याच्या अट्टाहासात त्यांचा मराठी किती कुचकामी आहे हा न्यूनगंड दिसून येतोच. साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हा निकष नाहीच. मी काही उदाहरणे दिली आहेत आणि ती एका विशिष्ट अपेक्षांच्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत. एका ३६ वर्षाच्या आयटी क्षेत्रात वरच्या दर्जाचे काम करणार्‍या मराठी युवकाला निदान साहित्याविषयी अगदी थोडी माहिती असावी ही अपेक्षा निराधार नाही. त्याने कमीत कमी कालचे वृत्तपत्र वाचलेले असावे आणि त्यात विंदांच्या मृत्यूची बातमी त्याने वाचलेली असावी ही अगदी न्यूनतम अपेक्षा त्याच्याकडून ठेवणे अजिबात गैर नाही. ही अपेक्षा मी रुग्णालयात काम करणार्‍या चतुर्थ श्रेणीतल्या मराठी कामगारांकडून खचितच करणार नाही. सगळ्यांकडून अपेक्षा एकच की मराठीची लाज वाटू देऊ नका. आज मराठी लोकांमध्ये (थोड्या फार प्रमाणात सगळ्याच जातींमध्ये, स्तरांमध्ये) मराठीचा न्यूनगंड दिसतो. मी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शेवटी मुद्दा लाज न वाटू देता मराठी वापरण्याचा आहे. मराठीचा अभिमानाने वापर होत नाही ही सार्वत्रिक समस्या मांडणे हा माझा हेतू होता. यात जातीचा आणि सामाजिक पार्श्वभूमीचा संबंध आहे असे मला अजूनही वाटत नाही. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

मुंबई-पुण्

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/18/2010 - 16:29 नवीन
मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... हेच ते. हेच ते. माझंदेखील हेच म्हणणं आहे. पण हा बोरु बघा की. लिहून लिहून झिजला तरी खोड जात नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रि

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 03/18/2010 - 16:43 नवीन
प्रतिक्रिया आवडली अप्पा. :P :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मराठी

चिरोटा
गुरुवार, 03/18/2010 - 17:50 नवीन
मराठी न येण्याचा अभिमान मुंबईच्या काही मराठी युवकांत असेल असेल हे तेवढे पटत नाही.पण आपण शिकले पाहिजे हा विचारही दिसत नाही.मराठी न बोलण्याचे मुख्य कारण राज्यात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हेच होय.म्हणूनच हिंदी+इंग्रजी बोलणे(जे हिंदी चित्रपटांत/मालिकांत दाखवले जाते) युवकांना शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा सोयिस्कर वाटते. याच कारणांमुळे ग्रेस्/नारायण सुर्वेंपेक्षा गुलझार/जावेद अख्तर मराठी युवकांना जास्त माहित असतात. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

तुमच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/18/2010 - 17:57 नवीन
तुमच्या खलबती मैत्रिणीला "मॉर्टर अँड पेसल" माहित असतील का हो? अदिती
  • Log in or register to post comments

माफ करा...

समीरसूर
Fri, 03/19/2010 - 09:09 नवीन
३_१४ विक्षिप्त अदिती, मलाच 'मॉर्टर अअँड पेसल' म्हणजे काय ते माहित नाही. :-) काय आहे हे? --समीर
  • Log in or register to post comments

इंग्रजांच

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/19/2010 - 09:28 नवीन
इंग्रजांचा खलबत्ता (आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे असतो त्या प्रकारचा) ! मला प्रश्न असा पडला होता की जर त्या मुलामुलींना खलबत्ता कळत नसेल आणि 'मॉर्टर अँड पेसल'ही कळत नसेल तर सांगायचं कसं? आणि हे कळत नसेल तर याचा अर्थ खलबत्ता आता सामान्य घरांमधनं हद्दपार होतो आहे असं मानायचं का? सॉरी थोडं अवांतर होतं आहे, पण रहावलं नाही म्हणून विचारलं! अदिती (अवांतरचः चुचुने 'अशुद्ध मराठी'ची तक्रार करणं म्हणजे एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो तू फेंगडा चालतोस!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हम्म!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/19/2010 - 09:37 नवीन
सहमत आहे... बर्‍याच गोष्टी आपल्या जीवनातून नाहिश्या होत आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दही त्या बरोबर नाहीसे होत आहेत... द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू... बर्‍याच नवीन गोष्टी आपल्या जीवनात येत आहेत आणि त्याच्याशी निगडीत नवीन शब्द भाषेत येत आहेत... नवीन संकल्पना नवीन वाक्प्रचार घेऊन येत आहेत. 'सगळंच मुसळ केरात' याचा अर्थ नवीन मुलांना कळणार नाही, पण एखादा आधुनिक प्रेमवीराला प्रेमभंगानंतर "जाऊ दे रे, सरळ फॉर्मॅट मार" असं सांगेल ते त्याच्या आजोबांनाच काय वडिलांनाही कळणार नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटतं

स्वानन्द
Fri, 03/19/2010 - 17:20 नवीन
मला वाटतं तुम्ही म्हणता तो प्रश्न इंग्रज तरूणांना विचारला आणि जर त्याचा अर्थ त्यांना सांगता आला नाही तर, ती वस्तू वापरातून गेली असल्यामुळे ती त्याना माहीत नाही असे म्हणणे उचीत ठरेल. समीर यांनी इथे त्या मुलींचं इंग्रजी उच्च दर्जाचे असते असे म्हटले नाही. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा