एक प्रसंगः
आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा:
एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं.
दुसरी: खलबत्ता म्हणजे?
पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे?
शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही.
पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.
दुसरी: मग ते इतिहासात खलबत असलं काहीतरी असायचं ते काय असायचं?
पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज!
मी: (मनात) नाही गं माझ्या मैने, ते गलबत! गलबत म्हणजे जहाज. आणि खलबत म्हणजे सुमडीत केलेली चर्चा, ऊहापोह, योजना तयार करण्यासाठी केलेली बोलणी! (मोठ्याने जाऊन सांगावं असं वाटलं पण स्वतःला आवरलं.)
शुंभः (अजून शुंभासारखेच भाव) असं आहे होय!
दुसरा प्रसंगः
एक ओळखीची मुलगी आणि मी असचं गप्पा मारत बसलो होतो. मी माझी कुठेतरी झालेली फजिती सांगत होतो आणि बोलता बोलता "मी खजील झालो" असे वाक्य बोललो. ती हसत सुटली.
मी: (विस्मयाने) काय झालं हसायला?
ती: खजील म्हणजे?
मी: अगं खजील म्हणजे काय हे तुला माहित नाही?
ती: नाही. मला एकदम 'फाजील' आठवलं आणि हसू आलं.
मी: अगं फाजील वेगळं आणि खजील वेगळं. खजील म्हणजे एम्बरासमेंट होणे किंवा एकदम आपली चूक लक्षात येऊन चपापणे.
ती: आणि फाजील म्हणजे काय? हिंदी पिक्चरमध्ये वकील "मेरे फाजील दोस्त" करत असतात नेहमी. पण फाजीलचा मराठी अर्थ काहीतरी 'वेगळा' आहे ना?
मी: अगं फाजील हा बहुअर्थी शब्द आहे. फाजील म्हणजे चावट असा ही होतो. फाजील म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त असा ही होतो. इंग्रजीमध्ये एक्सेस चा जो अर्थ आहे तोच अर्थ फाजीलचा मराठीमध्ये आहे. म्हणजे शेतातले फाजील पाणी काढून टाकावे याचा अर्थ शेतात साठलेले ज्यादा पाणी काढून घ्यावे. आणि हिंदी पिक्चरमधला फाजील हा उर्दू असावा पण त्याविषयी मला नक्की माहिती नाही. संदर्भावरून त्याचा अर्थ जाणकार, इतरांपेक्षा जास्त माहिती असलेले असा असावा असे वाटते. आम्हाला आमची आजी कधी-कधी "पुरे झाला आता फाजीलपणा" असे म्हणायची. त्याचा अर्थ की आता चेकाळणे, मस्ती करणे पुष्कळ झाले; आता नीट वागा. एकंदरीतच काहीतरी मर्यादेपलिकडे असा फाजीलचा अर्थ आहे आणि प्रसंगानुरुप त्याच्या विविध अर्थछटा निघतात.
ती: ह्म्म्म्म...
तिसरा प्रसंगः
आम्ही कंपनीच्या कँटीनमध्ये (चकाट्या पिटत) बसलो होतो. दोन मराठी मुली आणि मी ! कशावरुनतरी मराठी वृत्तपत्रांचा विषय निघाला. आणि अग्रलेखांचा बादशाह 'नवाकाळ' चा विषय निघाला. अग्रलेख हा शब्द उच्चारल्यावर-
पहिली: बाप रे, कितने सालों बाद ये वर्ड सुना. मेरे ग्रँडफादर को मैं बचपन में 'महाराष्ट्र टाईम्स' के अग्रलेख पढ के सुनाती थी.
(ही मुंबईची असणार हे जाणकारांनी ओळखले असेलच. मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात, कायम हिंदीत बोलतात, मराठीत बोलतांना अडखळतात, कुणीतरी फासावर लटकवेल अशी भीती चेहर्यावर बाळगून चोरी केल्यासारखे अशुद्ध मराठी बोलतात, मोजून १० सेकंदांनंतर पुन्हा हिंदीवर येतात, इंग्रजीची बोंब त्यांच्या इंग्रजी बोलण्यावरून जगजाहिर करतात, पुलं, कुसुमाग्रज यांना ऐकून माहित असतात, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर वगैरे मंडळी कुठल्या ग्रहावरची असा चेहरा त्यांचा विषय निघाल्यावर करतात, नारायण सुर्वे, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, रमेश मंत्री हे निकारागुआ मधले रहिवासी असावेत असा यांचा विश्वास असतो, मराठी वृत्तपत्र वाचणे म्हणजे एकदमच गावठी कृत्य असं यांना कुणीतरी बाबा बंगालीने किंवा यांच्या हिंदीभाषक ज्ञानी मित्रांनी सांगीतलेलले असते. कुणी अस्खलित मराठी बोलत असल्यावर त्याच्याकडे हे तुच्छतेने बघतात आणि मोडकं-तोडकं हिंदी किंवा इंग्रजी बोलणार्यांच्या कळपात घुसून तसचं बोलण्यात धन्यता मानतात. मराठी सिनेमे, नाटकं वगैरे यांना अगदीच डाऊनमार्केट वाटतं. ग्रुपमध्ये 'अवतार' किंवा 'द हर्ट लॉकर' किंवा 'रॉकेटसिंग' विषयी हिरिरीने बोलतात पण 'नटरंग'चा विषय निघाल्यावर मात्र कसलं बोअरिंग डिस्कशन चाललयं असा भाव चेहर्यावर आणतात. बरं यांचं हिंदी देखील अगदी सुमार दर्जाचं असतं. एकूणच कुठल्याच गोष्टीचं सखोल ज्ञान नसलेला, अर्धवट हिंदीत बोलणारा आणि मुंबईला 'बॉम्बे' म्हणणारा कुणी मराठी इसम आपल्या पाहण्यात आला तर तो मुंबईचा आहे असे बिनदिक्कत समजा.)
मी: तू आता मराठी पेपर वाचत नाहीस का?
पहिली: नही यार, हम तो डीएनए पढते हैं. मराठी मैं ठीक पढ नही पाती....(काहीतरी बघत असते) अरे वो देखो एक गाडी खडी हैं ब्रिंक्स आर्या लिखा हुआ हैं उसपे. वो हमारे कँटीन को ब्रेड सप्लाय करते हैं क्या? मैंने बहुत बार देखी हैं ये गाडी कँपस में.
मी: (अगं माझ्या हुशार मैने, असं काय करतेस, जरा बघत जा ना नीट) आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम मशिन्समध्ये कॅश लोड करतात ते. त्याचं काँट्रॅक्ट ब्रिंक्स आर्या या कंपनीचं आहे.
पहिली: ओह, ऐसा हैं क्या....
दुसरी: हो, वैसाईच हैं वो.
वरचे प्रसंग बघता मराठीचं पुढल्या ५० वर्षात काय होईल हो? नक्राश्रू, राका, राकट, कातळ, कळकट, विचक्षण, ज्ञानपिपासू, विहंगम, हुंकार, प्रबुद्ध, हतबुद्ध, पाटा-वरवंटा, रवी (घुसळण्याची), महामेरु इत्यादी आणि असे बरेच शब्द इतिहासजमा होतील की काय? मराठी ही फक्त सपोर्ट लॅग्वेज म्हणून शिल्लक राहिल की काय?
"मी आधी एग व्हाईट आणि यलो एका पॅनमध्ये बीट करून घेतलं आणि मग त्यात हाफ कप शुगर आणि कार्डमम पावडर टाकलं...वॉव, तुला प्रमोशन मिळालं...आता तर माझा पार्टीचा हक बनतो...."
असलं मराठी वापरणार आहोत की काय आपण? हाय रे कर्मा, ये क्या सितम हैं, ये क्या जुलम हैं!!!
--समीर
वाचने
17310
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अतिशयोक्ती!
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
माझे
In reply to अतिशयोक्ती! by समीरसूर
आता तर
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
नाही
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
आणि हो
In reply to माझे by बिपिन कार्यकर्ते
बाकी
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
लेख मस्तच,
In reply to बाकी by विसोबा खेचर
धन्यवाद!
In reply to बाकी by विसोबा खेचर
थोडं
In reply to धन्यवाद! by समीरसूर
मुंबईकर
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
नॉट
In reply to मुंबईकर by सुनील
वय ३६
In reply to मुंबईकर by सुनील
सहमत *******चुक
In reply to मुंबईकर by सुनील
छान
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
समीरच्या निरिक्षणाशी सहमत
In reply to मस्त by बिपिन कार्यकर्ते
अं... होहो...
In reply to समीरच्या निरिक्षणाशी सहमत by मी_ओंकार
धोक्याची सूचना
धम्याला
In reply to धोक्याची सूचना by राजेश घासकडवी
अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत ?????????????????
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अजूनही
In reply to धम्याला by ३_१४ विक्षिप्त अदिती
टक्के... पण नक्की किती ?
In reply to >>अजूनही by II विकास II
मुंबईमधल्
दुसरी: हो,
उत्क्रांत मराठी!
लेख चांगला
मिष्टर
In reply to लेख चांगला by अप्पा जोगळेकर
+१
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
ए
In reply to लेख चांगला by अप्पा जोगळेकर
:-)
समीर
बोलणे फोल गेले
महाराष्ट्रीय मराठी
सहमत
बरोबर
In reply to सहमत by प्रदीप
हिंदीचे
मराठीचं पुनरुज्जीवन
लेख छान आहे!
मजेशीर
छान
अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची!
In reply to छान by मदनबाण
पण अशी सुंदर बालगीते आता काळाच्या पडद्याआड जात आहेत
In reply to अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची! by सुधीर काळे
मस्त...!
समीर, छान
माझा एक
काय पण लोक्स असतात एकेक.
In reply to माझा एक by टारझन
अरे देवा!
:-)
In reply to अरे देवा! by तुका म्हणे
खरं पाहता
च्यायला!!!
In reply to खरं पाहता by शुचि
अगायायायाया!!!!
In reply to खरं पाहता by शुचि
(धुविंग)चतु
In reply to अगायायायाया!!!! by चतुरंग
=))
In reply to अगायायायाया!!!! by चतुरंग
) बिचारीला
In reply to खरं पाहता by शुचि
गमतीदार
वर्तमानपत्रे
"अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली
In reply to वर्तमानपत्रे by रामपुरी
खलबत वि. गलबत
माझा विश्वास बसला
+१ चित्रपट,
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
किस्से
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
माझ्या
In reply to माझा विश्वास बसला by प्रियाली
चुचुताई, आली गेली..
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
नशिबवान?
माझे मराठी
शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत
स्वरराज
In reply to शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत by सुधीर काळे
कोण हे मराठी मुंबईकर तरूण?
जातीचा संबंध नाही