✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोणचं..

प
प्राजु यांनी
Mon, 04/07/2008 - 19:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16716 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 00:30 नवीन

भोकराचे लोणचे...

भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे. त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 00:32 नवीन

कोकणिही..

म्हणा हो.. लोणचं हे लोणचंच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 00:49 नवीन

सुंदर लेख..!

राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात! त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित). हा हा हा! :) वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :) माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं! माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :) आपला, (मिरची-लोणच्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/08/2008 - 00:51 नवीन

या अमेरिकनांची किव आली.

या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते.. मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल.. उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली.. (कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 01:17 नवीन

वा वा एकदम आंबट गोड लेख!

कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच. राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/08/2008 - 08:46 नवीन

असेच म्हणतो - चविष्ट!!

लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!! चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 11:05 नवीन

अगदी अस्सेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 09:42 नवीन

लोणचे.....

प्राजुजी एकदम मस्त लेख आहे..... कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. हे मात्र अगदी खरे,,,,, या हंगामाच आईचा हातच कैर्‍या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय..... आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! (लोणचे प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 10:11 नवीन

सहमत..

आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! अगदी सहमत आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 10:30 नवीन

फेसलेली मोहरी ....

फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) (समाधिस्थ) डॅनी..... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:37 नवीन

'समाधी'

ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) खरय..... (मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 10:26 नवीन

कोळंबीचे लोणचे..

मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे. आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त.... प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात.... आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना... अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही. (पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन) डॅनी...... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:53 नवीन

टॉ़क्क!

प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते. झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) स्वाती
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 04/08/2008 - 11:00 नवीन

लोणचे

काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:03 नवीन

फक्त लोणच॑

फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-) मस्त. बर्‍याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते. दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 12:08 नवीन

सुरेख

छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास. बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्‍हेतर्‍हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील. [एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 12:46 नवीन

हे मस्तच..

त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) नंदन हे मस्तच ...आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 12:58 नवीन

लोणचं...

लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही. कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्‍यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Tue, 04/08/2008 - 13:05 नवीन

टकू

टकू खाल्ले आहे काय? कैर्‍या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल! आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:34 नवीन

तक्कू, तक्कू, अरे ॐकारा कशाला रे नसत्या आठवणी देता लेको!

मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
स
स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 14:24 नवीन

लेख मस्त...

प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या... माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात. पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे.... तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Tue, 04/08/2008 - 17:40 नवीन

लोणचे

जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले... प्रशांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 18:58 नवीन

सगळ्या

लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 04/08/2008 - 19:05 नवीन

झकास

झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) अगदी हेच म्हणते...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 19:14 नवीन

हैदराबाद

हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात. आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात. हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Tue, 04/08/2008 - 20:25 नवीन

छान

लेख खूपच आवडला. सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 04/09/2008 - 00:39 नवीन

स्स्स्स्स्स्स......

लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ.......... तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार..... हॅट्....निषेध! निषेध! निषेध! - टिंग्या :(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/09/2008 - 00:41 नवीन

नको रे टींग्या..

उगी उगी.... तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं... मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 04/09/2008 - 00:51 नवीन

:(

मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :( असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा! स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ.... - (लोणचंप्रेमी) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Wed, 04/09/2008 - 01:01 नवीन

इतकी लाळ बघून 'छोटी टिंगी' नाव अगदी सार्थ केलंस असं वाटतंयः))

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:28 नवीन

:))

इतकी लाळ बघून 'छोटी टिंगी' नाव अगदी सार्थ केलंस असं वाटतंयः)) हा हा हा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राजेन्द्र Fri, 04/11/2008 - 02:54 नवीन

कमल्कन्द

"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि." कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Fri, 04/11/2008 - 17:18 नवीन

आहाहाहाहा मस्तच्....

आहाहाहाहा मस्तच्....इतके चाखतमाखत वाचायल बर्‍याच दिवसानी मिळाले
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 06/20/2014 - 02:28 नवीन

व्वा!!

व्वा!!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/20/2014 - 19:31 नवीन

सुंदर लेख

लोणच्यासारखाच चविष्ट.
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक Sat, 06/21/2014 - 11:59 नवीन

चविष्ट लेख...

चविष्ट लेख. तोंडाला पाणी सुटलं. जेवणात भाजीइतकं लोणचं मिटक्या मारत खाणाऱ्या एका चुलत भावाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा