न येती उत्तरे

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
14 Mar 2010 - 4:01 pm
न येती उत्तरे

लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे
संगीत:- अक्षय कुलकर्णी
नेपथ्य: - सचिन भिलारे
प्रकाश योजना:- अपुर्व साठे
कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी
निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे

मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे मोबाईल्स वापराबाबत प्रथम सविस्तर सुचना करुन नाटकाबाबत थोडी माहिती दिली
आशुतोष (हर्षद राजपाठक) आणि रणजीत (मंदार कुलकर्णी) हे वीस व चोवीस वर्षाचे तरुण एकाच कॊलेज मध्ये पण वेगवेगळ्या वर्गात शिकणारे . रणजीत सगळ्यांच्यात मिसळणारा मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात असणारा उमदा तरुण. तर आशुतोष एकलकोंडा स्वत:च्या कोषात अडखळलेला.रणजीत एक्कलकोंड्या आशुतोषची ओळख करुन घेतो.नंतर हळू हळू त्यांची ओळख होते. रणजीतचे वडिल मुंबईला उद्योजक, श्रीमंत घरातले तर आशुतोष नाशिकचा मध्यमवर्गीय घरातला. ओळखीतुन एक भावनिक नात तयार होत. एकमेकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करीत त्यांच्यातील "वेगळेपण" नाटकात फुलत जात. दिवाळीच्या सुटीत घरी परत जाण्यासाठी पर्याय हा दोघांसाठी वेगळा असतो. रणजीत घर सोडून आलेला असतो तर आशुतोषने घर हे फक्त शिक्षणासाठि तात्पुरत सोडलेल असत. त्याला दिवाळीत घरी जाणे भाग असत. आशुतोष त्याला घरी चल म्हणतो तर रणजीत त्याला तुच इथे थांब असे म्हणतो. शेवटी आशुतोष आईला दिवाळीला मित्राच्या घरी जातो असल्याचे सांगुन रणजीतच्या फ्लॅटवर येतो. इथेच त्यांच्यात एक मोकळेपणा निर्माण होतो. आपापल्या पुर्वायुष्यातल्या घटनांकडे पहातात. सुरवातीला स्वत:च्या वेगळेपणाबद्द्ल भांबावलेला; लैंगिकतेबद्दल घुसमटलेला, प्रश्नचिन्हांकित असा आशुतोष 'गे' या संकल्पने बद्दल मोकळा व्हायला लागतो. 'अनुभुती' च्या टप्पातुन गेल्यावर तो दिवाळीच्या शेवटी घरी जातो तो आत्मविश्वासाने. त्याच्यातला हा बदल स्वत:ला व इतराना ही जाणवतो.घरुन परत रणजीतच्या फ्लॅटवर आल्यावर तो हे सार आत्मविश्वासाने सांगतो. अरे आम्हीच आहोत खरे पुर्ण पुरुष कारण आमच्या मनात तुमच्यासारखा स्त्रीचा विचार नसतो असे त्याच्या आतेभावाला सुनवतो ज्याच्या घृणा व तिरस्काराचा तो बळी असतो.
जेंडर इक्वॅलिटी मधे अडकलेल्या या ह्युमन प्रश्नावर नाटक अनुत्तरीतच संपत.
कार्यक्रमानंतर प्रमोद काळेंनी प्रेक्षकांना प्रश्न विचारायची मुभा दिली.ही बाब आम्हाला अधिक मह्त्वाची वाटली. नाटकाचा शेवट आश्वासक हवा, शिर्षक निगेटीव्ह वाटत,गे संबंधातुन येणार्‍या एड्स विषयी नाटकात काही भाष्य नाही. असे काही मुद्दे पुढे आले. अर्थात नाटककार प्रमोद काळेंना याचा अंदाज होताच. त्यांनी गेली अडीच वर्षे याच विषयाच्या निर्मितीसाठी घालवली. सपोर्ट ग्रुप मधे संवाद साधले.नाटकाला वादाच्या भोवर्‍यात न अडकवता फक्त वस्तुस्थिती मांडण्याचे काम त्यांनी केल होत. वर्तमान काळात तरी या प्रश्नाला सर्वसमावेशक असे उतर नाही म्हणुनच ने येती उत्तरे.

अवांतर एक- प्रमोद काळेंनी मोबाईल मॅनर्स बाबत कळवळीने सुचना करुनही एकाचा मोबाईल बोंबललाच. सुदर्शनचा प्रेक्षक वर्ग सुसंकृत असल्याने सहसा अस होत नाही. आम्हाला सुरुवातीला हा नाटकातलाच प्रसंग आहे असे वाटले. असो
बाकी नाटकानंतर प्रमोद काळेंना भेटुन धाडसी विषय हाताळल्याबद्दल आम्ही अभिनंदन केल व हळुच मराठी ब्लॉगिंगची टिमकी वाजवलीच बर्का!

अवांतर दोन - २० मार्च ला या नाटकाचा प्रयोग मयुर कॉलनी ,कोथरुड ,पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन रंगमंचावर आहे.

नाट्यसमाजमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2010 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''न येती उत्तरे''ची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु...!

-दिलीप बिरुटे
[आभारी]

राघव's picture

16 Mar 2010 - 12:24 am | राघव

असेच म्हणतो..

अवांतरः
"न येती उत्तरे" चा संबंध पुन्हा नाडीशी आला का काय असे आधी वाटले होते ;)

राघव

चिंतातुर जंतू's picture

15 Mar 2010 - 10:46 am | चिंतातुर जंतू

नाटक पाहून काहीशी स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकोलेट या क्यूबन चित्रपटाची आठवण झाली. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीत पुष्कळ फरक आहे, पण स्वतःविषयी मोकळ्या असणार्‍या एका पुरुषाने तशा नसणार्‍या दुसर्‍या पुरुषास हळूहळू फुलवत नेणे हा समान धागा वाटला.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2010 - 12:38 am | भडकमकर मास्तर

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...

अवांतर : 'आसक्त'च्या विषयात 'कल्चरल सेंटरसुद्धा आले की काय ...!!!

ओळख करून दिल्याबद्दल आभार.

शुचि's picture

16 Mar 2010 - 4:32 am | शुचि

विषय वेगळाच आहे. पहावसं वाटलं या ओळखीमुळे.

मुख्य म्हणजे नाटकात सकारात्मक दृष्टीकोन दिसतोय "समलिंगी" व्यक्तींबद्दल.....
नक्कीच पहायला आणि जाणून घ्यायला आवडेल.
कारण कॅलिफोर्निआतील माझ्या वास्तव्यात मला २ वेळा गे बॉस आणि सहकार्‍याचा निगेटिव्ह अनुभव आला. त्यावरून माझं मत थोडं निगेटिव्हच बनलेलं आहे.

डोळसपणे नाटक पहावसं वाटतं.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2010 - 2:04 am | स्वाती दिनेश

नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद,
स्वाती

संदीप चित्रे's picture

17 Mar 2010 - 2:28 am | संदीप चित्रे

काळेसरांना मी लहानपणापासून बघतोय.
नाटक आणि त्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी आणि उत्तम शिष्य घडवण्याच्या कौशल्याने थक्क होत आलोय.