साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबँड आणि मराठी ब्लॉग्ज्स वगैरेची चर्चा
लेखनप्रकार
त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला.
"काय कुठे ?" त्यानी मला विचारलं.
"काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा.
पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की."
मी मान डोलावली.
"मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला .
माझ्या मनात दोन विचार आले.
एक म्हणजे गांगलांनी टॅक्सीभाडं दिलंच तर किती सांगावं ? आणि चर्चा सत्र म्हणजे काहीतरी पोटभरीचं खाणं असणारच .
माझा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र हुशार आहे.उगाच एकविसाव्या मजल्यावर थोडी राहणारे.
तो म्हणला माझं ऐक ."इथेच आता काय ती इडली वगैरे खाऊन घे .तिथे काही नसणार.
फक्त स्वच्छ निर्मळ थंड पाणी."
म्हण्जे माझ्या मनात फार काही नव्हतंच पण आपण गेलोच तर चार कवि लेखक भेटतील
माझ्या मनातला विचार ओळखून तो म्हणालाआणि "तसंही आज कोणी फारसं नसणार .सगळे गेलेत दुबईला.
अरे बाबा तो काही म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स कंपनीचा मेळावा नाहीय्ये."
तसा मी फारसा चटावलेला नाहीय्ये पण...
मी इडलीच्या प्रस्तावाला होकार दिला.
***********************************************************************************
दादरला पोहचे पोहचे तो बिपीनचा फोन .
"मी पोहचतोय मालक"
(बिपीन तात्याला आणि सगळ्यांना एकाच मापात घेऊन मालक म्हणतो.तरी बरे तात्यानी त्याला संपादक बनवलं आहे)
"पंधरा मिनीटात.तात्या आलेत का ?"
आता मला माहीती नव्हतंच पण तात्या आला नाहीतर बिपीनला उभं करण्याचा प्लॅन बिपीनच्या लक्षात आला काय बॉ असं माझ्या मनात आलं खरं.
पण मी पोहचेतो तात्याचा फोन आलाच.
आता मात्र मला पोहचणं भागच होतं.
हो स्साला !!
या तात्याचा काय भरवसा नाय.
गांगलसाहेब माझ्या आधी त्याला भेटलेच तर .....
"बा झवला !! या वयात कसली साईट वगैरे काढताय ?" असं म्हणत एक नाही चर्चासत्रातल्या दोन खुर्च्या रिकाम्या करायचा.
आणि माझं तर पहीलंच चर्चासत्र...वगैरे मनात येऊन मी कासावीस झालो.
पण तसं काही झालं नाही बॉ.
मी आणि बिपीन हॉलमध्ये गेलो तेव्हा तात्या शांतपणे आनंद घारे आणि मुंडले काकांसोबत बसला होता.
*************************************************************************
आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. कवायती शिस्तीत .
आधी गुलाबाची फुलं वाटून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
(माझ्या मनात आलं की फुलं म्हण्जे गुच्छ नाही म्हणजेच टेक्सीचं बिल आणि अल्पोपहार पण नाही.)
माधवराव शिरवळकर तयारीनी आलेले होते.त्यानी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच सांगीतलं की ही चर्चा फक्त चाळीस मिनीटाचीच आहे.
मा. अतुल तुळशीबागवाले यांना पहीली खेळी देण्यात आली.
त्यांनी मराठी संस्थळाबद्दल त्यांचा अनुभव सांगीतला.पण त्यासोबत असेही म्हणाले की त्यांचा आणि मराठीचा संपर्क जरा उशीराच झाला आहे.शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे वगैरे.
त्यांना मिळालेली दोन मिंटं संपत आल्यावर त्यांनी खेळी मा. संजीव लाटकर यांचेकडे दिली .
संजीव लाटकर साहेब म्हणाले की "कठीण आहे बॉ.मराठी ब्लॉग्ज्सला काही फारसे चांगले दिवस दिसणार नाही."
मग माधवराव म्हणाले की हे तुमचं फारच निगेटीव्ह मत आहे बॉ.
मग तात्या म्हणाले की मला तर काही वाईट दिवस दिसत नाहीय्येत.
आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा चकलीताईचा ब्लॉग.त्यावरच्या रेसीपी बघा.आहाहा...असं म्हणता म्हणता रुमाल शोधायला लागले मग मी संधी घेऊन सांगीतलं की मला तर ब्लॉग म्हणजे साठवणीच्या टाक्यांसारखे दिसतात.म्हण्जे उद्या तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं .तरीपण ...
हा मुद्दा मांडल्यावर लगेच संपला.पण माझं दिड मिनीटं वाचलं त्याचं काय करावं कळेना .
मग माधवराव म्हणले की मराठी संस्थळं आणि पैशे याचा ताळमेळ कसा बसवावा बॉ.
मा.अतुलसाहेबांनी यावर काहीतरी उच्च विचार मांडला.पण मला तो काही कळला नाही .
संजीव लाटकर साहेब मात्र कळवळून म्हणाले "अहो मराठी संस्थळ म्हण्जे माझी पॅशन हो पण पैशे काय कोणी देत नाही .आता पैशे पाहीजेत म्हण्जे कल्पकता पाहीजे.कल्पकता वापरल्याशिवाय संस्थळातून पैशे मिळणार नाहीत."
यावर तात्यांनी डोळे मिटून मान डोलावली हे मी पाहीलं .
आता मालकांनी मान डोलावल्यावर मी पण मानेत मान डोलावली.
लाटकरसाहेबांचा लॉस मात्र फारच मोठा असावा.कारण नंतर त्यांनी उरलेली माझी आणि तात्यांची मिनीटं खाऊन टाकली.मग आम्ही काय गप्प बसलो.मी म्हटलं की बिकातरी प्रेक्षकातून ओरडून काही म्हणेल पण तो आपला गप्प.मी पुढच्यावेळी टारझनलाच घेऊन जाईन.
मी प्रयत्न करणार तेव्हढ्यात लाटकर साहेबांनी नजरेनीच गप्प करून टाकलं.
(सोसायटीचे नवीन मेंबर एस आर ए च्या लाभार्थींकडे जसं बघतात तसं बघीतलं .मग मला खूपच वाईट वाटलं)
मग ते काही बोल्ले ते सगळं त्यांनी रवीवारच्या अंकात छापून आल्यामुळे मी काही लिहीत नाही.
फक्त एकच महत्वाचा मुद्दा म्हणजे साडेतीन टक्के लोकांकडे ब्रॉडबँड आहे.
त्यातले दोन टक्के हापीसाचे आहेत .असं ते काही म्हणाले नाहीत पण मला आपलं तसं वाटतं.
हा साडेतीन टक्क्याचा आकडा फार वाईट आहे.त्यामुळे बरेच वर्षं वाद चालत राहतात.
(तसं बघीतलं तर तीनाचे सगळेच अपूर्णांक वाद घालण्यात हुश्शार असतात बॉ. असं मी म्हणणार होतोच पण गप्प बसलो.)
आधीच मराठी माणसं कष्टानी एकत्र येतात.
आलीच तर वाद घालतात.
ज्यांना वाद घालता येत नाहीत त्यांना मग दुसर्या संस्थळावर जावंस वाटतं पण तिथेही मालक आणि वाद असतात.
मग सेलेब्रीटी ब्लॉग्ज्स आणि युनीकोड यावर आम्ही उगाचच काहीतरी बोललो.आणि चर्चा संपली.
***********************************************************
भूक लागली होती .गांगलांचे पेढे दातातल्या फटीत अडकतील येवढे छोटे होते.
तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
अतुल तुळशीबागवाले आणि संजीव लाटकर साहेब स्टेजवरून उतरल्यावर ब्रॉडबँड आवरतं घेऊन आपापल्या मराठी नॅरोबँड सोबत घरी गेले.
थोडक्यात या चर्चेची फलशृती काय ?
या निमीत्ताने मिसळपावची जनमानसात ओळख वाढली.
गांगलाच्या पुण्याईने आमची नावं पेपरात छापून आली .लोकसत्तात फोटो आला.
तसा मी प्रसिद्धीच्या झोतात यायचे टाळतोच पण आता मराठीचा मुद्दा म्हटल्यावर....
*********************************************************************
वाचने
14018
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
आत्ता
In reply to आत्ता by बिपिन कार्यकर्ते
'टक्का'टक लेख.
भारी !!
समर्थ! __/\__
म्हण्जे
खल्लास!!!
In reply to खल्लास!!! by चतुरंग
मेलो!!!!!!!!!!!!! आ
In reply to मेलो!!!!!!!!!!!!! आ by बिपिन कार्यकर्ते
काय बिशाद आहे
In reply to काय बिशाद आहे by चतुरंग
खपलेलो आहे
हॅहॅ
हे धमाल
सहि
खल्सास...
अस्स रीपोर्टींग माझ्या आयुष्यात
तो म्हणला
In reply to तो म्हणला by विसोबा खेचर
जबरा
In reply to तो म्हणला by विसोबा खेचर
मस्त मस्त मस्त...
भन्नाट
हे पेढे मुंबईचे की पुण्याचे
विडम्बन
काय रेऽऽ
In reply to काय रेऽऽ by रेवती
>>रामदास
In reply to >>रामदास by प्रभो
उगीचच
In reply to काय रेऽऽ by रेवती
काय
In reply to काय by टारझन
जाऊ दे! मी
>>आधीच
फटकेबाजी
ताळमेळ
सॉल्लिड!!!
In reply to सॉल्लिड!!! by स्वाती दिनेश
असेच म्हणतो
वा!!
अपेक्षाभंग
In reply to अपेक्षाभंग by सन्जोप राव
सहमत
ह्याला
मस्त
वेगळा
मस्तच
ल्येख