उत्तम लेख आहे..
पुरुषाचं एक वेळ ठीक आहे, ते कुठेही आडोश्याला उभं राहून धार मारू शकतात परंतु आपल्याकडील स्वच्छ प्रसाधनगृहांची वानवा ही महिलांकरता मात्र खरंच तापदायक गोष्ट आहे..
बाकी, 'गच्चीला जाणे' हा वाक्प्रचार फार आवडला! :)
आपला,
(सुलभ शौचालय 'गच्ची' प्रेमी) तात्या.
उत्तम लेख!
स्वच्छ गच्ची झालीच पाहिजे!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
हा लेख म्हणजे एक चळवळ आहे हे आम्ही जाणतो. याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे. मी वैयक्तिक रित्या करीतच असतो. परवा म्हण्जे माध्यमाईटस च्या ग्रुपचा कार्यक्रमाला मी गेलो होतो. मराठवाडा कॉलजे मधे होता कार्यक्रम. तिथे कचरा, पिण्याचे पाणी व टॉयलेट पाहिल्या. निकृष्ठ स्थिती होती. एकाला हे सांगितले याविषयावरील जागृतीचा जालावरील संदर्भ दिला मिपावर त्याची माहिती इथे आहेच. याविषयालाच वाहिलेला एखादा स्वतंत्र ब्लॉग असावा अशी सुचना त्याने दिली.
प्रत्येकाने जरी वैयक्तिक पातळीवर कुठेही गेल्यावर तेथील वरील बाबी पहाव्यात व त्याबाबत आग्रह धरावा. मी एका टॉयलेट चालकाशी (उत्तराखंडला गेलो होतो तेव्हा) गप्पा मारल्या होत्या त्याने टॉयलेटची सुविधा केल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. मी त्या तपासल्यावर वापरण्यायोग्य स्थितीत होत्या असे आढळले.
कुठल्याही संस्थेची लायकी तेथील टॉयलेटवरुन समजते. इमर्जन्सी कॉलच्या वेळी टॉयलेटची गरज किती याचा ताजा अनुभव मी दिल्लिला गेलो होतो त्या प्रवासात घेतला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
स्त्रीजन्मा तुझी कहाणी, ओठी अमृत, पोटी पाणी...
(हे मी थट्टेने लिहिलेले नाही. मूळ भावनिक गाण्याचं वास्तव रूप काय आहे हे लेखाआधारे सांगण्याचा प्रयत्न)
राजेश
हा लेख मागे वाचला होता... आज परत वाचतोय... परिस्थितीत काहीच सुधारणा नाही हे जाणवतंय. आपल्याच आया-बहिणी-मैत्रिणी असल्या समस्यांना तोंड देत जगत आहेत हे क्वचितच जाणवले या आधी... :(
नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले? यथाशक्ती सहभागाची तयारी आहे.
बिपिन कार्यकर्ते
पुन्हा वाचतोय. परिस्थितीत काही बदल नसावा हे नक्की.
बायकांचीच नव्हे तर पुरुषांचीही पंचाईत व्हावी इतकी घाण टॉयलेट्स मी बघितली आहेत! तुमची इच्छाच एका सेकंदात मरुन जाते! :(
(एक सूचना - ह्या वर्षीचा गणेशोत्सव त्या त्या भागातल्या मंडळांनी चांगली स्वच्छतागृहे सुरु करून का साजरा करु नये? ह्या वर्षी मंडप, म्यूझिक, लायटिंग इ.वर थोडा कमी खर्च करा, मूर्ती थोडी छोटी बसवा. लोकांचे पैसे लोकांच्याच कामाकरता खर्ची पडले तर फार मोलाची गोष्ट होईल.)
चतुरंग
एक सूचना - ह्या वर्षीचा गणेशोत्सव त्या त्या भागातल्या मंडळांनी चांगली स्वच्छतागृहे सुरु करून का साजरा करु नये? ह्या वर्षी मंडप, म्यूझिक, लायटिंग इ.वर थोडा कमी खर्च करा, मूर्ती थोडी छोटी बसवा. लोकांचे पैसे लोकांच्याच कामाकरता खर्ची पडले तर फार मोलाची गोष्ट होईल.
कल्पना छानच आहे. एकदम आवडली.
बाकी स्वच्छतागृहे हा खूप महत्वाचा विषय आहे. भारतात सर्वत्रच प्रश्न आहे. अमेरिकेत देखील जर "हँडी टॉयलेट" चा वापर जत्रा, पब्लीकपार्क्स मधे वगैरे करायची वेळ आली तर पंचाईतच होते. स्त्रीयांची तर विशेष करून जास्तच.
मधे आमच्या ओळखीचे एक जोडपे सौदी अरेबियात कामा निमित्त गेले होते. त्या वेळेस तेथील काही प्रयोगशाळा/कार्यालयात या जोडप्यातील स्त्रीने देखील नवर्याबरोबर जायचे ठरवले. टॉयलेट वापरायची वेळ आली तेंव्हा लक्षात आले की तेथे लेडीज टॉयलेट हा प्रकारच नव्हता (कारण स्त्रीया तेथे जातच नाहीत मग टॉयलेट्स वेगळी कशाला हवीत?).
विविध ठिकाणी असले प्रकार होऊ शकतात. मात्र भारतात यातील स्वच्छता सर्वत्र वाढवायची खूपच गरज आहे असे वाटते. कदाचीत ही कामे जितकी यांत्रिक पद्धतीने कुठेही स्पर्श न करता आणि स्वच्छता कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी घेत करायला लागल्यास त्यांची देखील त्यांच्या या कामात टाळाटाळ कमी होऊ शकेल असे वाटते. मुंबई विमानतळावरील टॉयलेट्स ही नव्वदच्या दशकातील आणि आत्ताची यात बराच फरक आहे असे याच मुळे जाणवते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
>> हा लेख मागे वाचला होता... आज परत वाचतोय... परिस्थितीत काहीच सुधारणा नाही हे जाणवतंय. आपल्याच आया-बहिणी-मैत्रिणी असल्या समस्यांना तोंड देत जगत आहेत हे क्वचितच जाणवले या आधी...
नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले? यथाशक्ती सहभागाची तयारी आहे.
उपक्रमासाठी यथाशक्ती सहभागाची तयारी कळवली होतीच.
नक्की सांग.
परखड लेख आवडला
मला आलेला वाईट अनुभव - (जाऊ द्या कॉलेज च नाव महत्वाचं नाही)मधे , मेन लायब्ररीच्या रेस्टरूम मध्ये, अरशात बघत असताना डोळ्याच्या कोपर्यात हालचाल जाणवली. ..... एका मोरीच्या कप्प्याला खिडकी होती अणि कोणीतरी चोरून पहात होतं.
अंगावर सरसरून काटा आला. धावत बाहेर गेले. वॉचमन ला सांगीतल. पहीली प्रतिक्रिया - "शक्यच नाही" ..... त्यानी जाऊन पाहीलं - एक २०/२५ शीचा तरूण होता. ..... तो मुलगा जीवानिशी धावत पळून गेला.
तिथे मागे जायला पॅसेज होता जो की नंतर बंद करण्यात आला असावा.
__________
मुलीला माझा नेहेमीचा सल्ला - कधीही सार्वजनीक रेस्टरूम मधे जाताना मैत्रीणीला बरोबर घेऊनच जायचं आणि तिला बहेर थांबवायचं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
नी,
तुझा हा परखड लेख अतिशय आवडला. आजही एस.टी.स्टॅन्ड, हॉटेल्स, ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस आणि सर्व सार्वजनिक इमारतींमधील स्त्रियांसाठीच्या स्वच्छतागृहांची अवस्था किळसवाणी व दयनीय असते. माझ्या काही नोकरी करणार्या मैत्रिणींना स्वच्छतागृहाच्या अभावी पाणी न पिणे, नैसर्गिक आवेगांना दाबणे अशा प्रकारामुळे किडनी स्टोनचा त्रास, महागडी ट्रीटमेन्ट व क्वचित प्रसंगी ऑपरेशनलाही सामोरे जावे लागले आहे. हा फक्त बायकांच्याच नव्हे तर घरादाराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कारण घरातील स्त्रीचे आरोग्य धोक्यात आले की पर्यायाने बाकी कुटुंबालाही त्याची झळ सोसावी लागते. लहान गावांमध्ये अजूनही हागणदारीचीच प्रथा सरकारच्या वेगवेगळ्या सेवा योजना असल्या तरी दिसते. घरात शौचालय असूनही घरातील लोक त्याचा वापर न करता हागणदारीत जाणे पसंत करतात. आणि अजूनही अनेक घरांमध्ये शौचालय तर नाहीच! घरातील स्त्रियांना पहाटेच्या अंधारात किंवा रात्री उशीरा आपली नित्यकर्मे गावाबाहेर जाऊन उरकावी लागतात. साहजिकच त्यांना पोटाचे विकार जडतात. वेळोवेळी ह्यावर त्यांना मार्गदर्शन करूनही अनेकदा निराशाजनक चित्रच पहावयास मिळते. अनेक ठिकाणी गावकर्यांची अपेक्षा असते की त्यांना घरात शौचालय बांधून देण्याचा खर्च शासनाने करावा. त्यामुळे ते स्वतः पदरमोड करून शौचालय बांधण्यास नाखूश असतात. बांधलेली शौचालये ओस पडण्याचे अजून एक कारण म्हणजे पाण्याची टंचाई.
असो. इतका महत्त्वाचा विषय तू उत्तम प्रकारे मांडला आहेस! अजूनही याबाबत जागृती, उपाय व हा प्रश्न गंभीरपणे घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती दिसून येत नाही. स्त्रियांसाठीचे मेळे, सभा, संमेलने, कार्यक्रम यांत ह्याविषयाबद्दल अधिक जागृती निर्माण केल्यास स्त्रियाच ह्यातून मार्ग काढू शकतील असे वाटते.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
षंढपणे वाचतील, फिदीफीदी हसतील पण दुर्दैवाने याबाबत काही करणारे किती निघतील कोणजाणे.
अशी सुधारणा सुचवून मी कुचेष्टेचा बळी ठरलेलो आहे. मात्र माझ्या अधीकारात असताना मी ऑफीस बांधण्या अगोदर संडास बांधून घेतला आहे.
नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले?
कोणता ? काही मदत होऊ शकेल का आमच्याकडून ?
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
नीधपतै, परखड लेख. या विषयावर प्रसारमाध्यमांनी व्यापक चर्चा घडवून आणायला हवी. स्वछतागृहांचा अभाव (विशेषत: महिलांच्या) ही प्राथमिक समस्या आहे. आपल्याकडे याबाबत आनंदी आनंद आहे. सुलभ शौचालयांनी थोड्याफार प्रमाणात का होईना ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय पण अजुन खूप काम व्हायला हवे. मी खूप पुर्वी पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना मानव विकास निर्देशांकाच्या (ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स) धरतीवर 'सॅनिटेशन इंडेक्स' विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. नाशिक जिल्ह्यातील विदा गोळा करता नाकी नऊ आले आणि मी तो प्रयत्न सोडला.
तुम्ही लिहिलेला लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बर्याच लोकांना महिलांच्या म्हणून वेगळ्या गरजा असतात याची काडीचीही जाणीव नसते. हेच चित्र सार्वजनिक पातळीवर आढळते.
(वर श्री चतुरंग यांनी गणेशोत्सवांच्या माध्यमातून या समस्येचे निराकरण करण्याचा सुयोग्य पर्याय सूचवला आहे. स्वछतागृहे बांधता येत नसली तरी कमीत कमी देखावे तरी या समस्येला वाचा फोडणारे करता येतील. जागोजागी मंदिरे बांधणार्या लोकांनी जर स्वछतागृहे बांधली तर केवढा मोठा बदल घडू शकेल.)
वर म्हणल्याप्रमाणे लेख परखड आहेच..पण तमाम भारतीयांना लाजेने खाली बघायला लावणारा आहे. मुतारी साफ नसणं एवढ भयंकर असु शकत हे आजे कळलं आणि मग स्वत:ची भारतीय म्हणुन, आणि पुरुष म्हणुन लाज वाटायला लागली. प्रवासात तर संडासाची सोय बघण माझ्या गावीही नसायचं. जीथे जेवण छान मिळेल तिथेच थांबायचं हाच नियम. डोळे उघडणारा लेख. मनापासुन धन्यवाद!!
नीरजा, तू म्हणते आहेस ते दूर्दैवाने अगदी खरं आहे. सार्वजनिक स्वच्छता हा विषय आपल्या भारतीयांच्या लेखी अगदीच नगण्य असाच आहे. त्यात नजिकच्या भविष्यात तरी काही लक्षणीय बदल होईल अशी आशा बाळगण्यासारखी परिस्थिती नाहीये हे मोठ्या खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपल्याकडे खेड्यात नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाण्याची प्रथा अजूनही आहे...त्याची जी काही कारणे असतील त्यातील प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा तुटवडा. जिथे रोजच्या गरजेइतकेही पाणी नाही तिथे संडास वगैरे साफ ठेवण्यासाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न असल्यामुळे जी काही घाण होईल ती बाहेरच असावी हाच हेतू मुख्यत्वे असावा. त्यामुळे तिथे कुणी प्रवासी गेल्यास त्यालाही नाईलाजाने तशाच मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यातूनही जिथे कुठे संडासची सोय असते तिथेही वापरणार्यांची संख्या जास्त आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे हवी तेवढी स्वच्छता ..खरं तर किमान स्वच्छताही राखणे कठीण असावे.
शहरातही ज्या काही सोयी सुधारणा होत असतात तिथे सार्वजनिक शौचालये वगैरेंची बांधणी अभावानेच होते त्यामुळे ती गरजवंतांच्या तुलनेत नगण्य असते. इथेही वापर जास्त आणि स्वच्छतेसाठी लागणार्या पाण्याचा तुटवडा ही दोन्ही कारणे जशीच्या तशी आ वासून उभी असतात. अशा परिस्थितीत स्त्रिया काय आणि पुरुष काय दोघांचीही कुचंबणा होणारच. तरीही वेळप्रसंगी पुरुष लघवीसाठी आडोसा शोधू शकतो,मात्र लोकलज्जेस्तव स्त्रियांना ती सोय देखिल नसल्यामुळे त्यांची तर विलक्षण कुचंबणा होते...हेही वास्तव आहे.
ह्यावर तोडगा शोधायचा असेल तर मुळात आपली नगरपालिका आणि तिच्या संबंधित सर्व अधिकारी,नगरसेवक वगैरे सगळे ह्याबाबत जागरूक व्हायला हवेत जेणेकरून ते ह्यासाठी काहीतरी भरीव योगदान देऊ शकतील.
मात्र तरीही ह्या सगळ्याशी निगडीत असलेला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी जरी झाली तरी त्यांना किमान स्वच्छ ठेवण्यासाठी लागणार्या पाण्याची व्यवस्था कशी होणार? कारण सगळं घोडं तर तिथेच पेंड खातंय.
माझा ताजा वैयक्तिक अनुभव सांगतो....गेले ६-७ दिवस आमच्या विभागात जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे महापालिकेकडून येणारे पाणी नेहमीच्या तुलनेत जवळपास नगण्यच होते. त्यात आमच्या इमारतीची कूपनलिकाही सुकल्यात जमा आहे. अशा अवस्थेत हे दिवस आम्ही कसे काढले हे आम्हाला माहित...एक वेळ पिण्याचे पाणी बाहेरून विकत आणता येते..पण संडास साफ ठेवण्यासाठी लागणार्या पाण्याची व्यवस्था कशी करायची... जे काही जमले ते करत होतो पण तरीही नेहमीप्रमाणे स्वच्छ्ता राहात नव्हती...सुदैवाने हा काल आज नाहीतर उद्या संपणार आहे ह्या आशेवर कशीतरी वेळ मारून नेली... हा अनुभव एवढ्यासाठी नमूद केला की पुरेशा पाण्याअभावी घरगुती अथवा सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ कशी ठेवणार?
सर्वात आधी हा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल...मग कदाचित त्या अनुषंगाने इतर प्रश्नही सुटतील अशी आशा करूया.
सरकारने सोयी करणे याबरोबरच शालेय शिक्षणामधे स्वच्छतागृह कसे वापरावे याचे ट्रेनिंग सक्तीचे करायला हवे.
इयत्ता पहिली दुसरीपासूनच.
घरी आईबाप शिकवत नाहीत का हा प्रश्न आपसूक येईल यानंतर पण प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही सगळेच नाही शिकवत हे आहे. तसं नसतं तर असलेल्या तुटपुंज्या सोयी इतक्या भयाण झालेल्या नसत्या.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
दुर्दैवाने या विषयाकडे लक्ष द्यावे असे कुठल्याही संस्थेला वाटत नाही.
सरकार कडुन अपेक्षा करणे फोलच आहे, किमान महाराष्ट्र एस. टी. डेपोने अशी सुविधा दिल्यास बराच फायदा होईल.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
ही समस्या फारच भीषण आहे, अगदी `स्वाइन फ्लू' पेक्षाही. पण तिच्याकडे पुणे, मुंबईसारख्या शहरातही कुणी विशेष लक्ष देत नाहे, हे त्याहून भीषण आहे.
गणपती च्या मिरवणुकीतही तासंतास लक्ष्मी रस्त्यावर फिरताना किंवा देखावे पाहायला जातानाही मला हा प्रश्न भेडसावतो. पुरुषांचीच जर धड सोय नाही, तर स्त्रियांचे काय होत असेल?
प्रत्येक कार्यालयामधे (work place) स्त्रियांसाठी आणि पुरूषांसाठी संख्येच्या प्रमाणात वेगवेगळी स्वच्छतागृहे असणे कायद्याने बंधनकारक आहे आपल्या भारत देशात आणि तसे नसेल तर काम करणार्या स्त्रिया याबद्दल sexual harrassment खाली न्यायालयात दाद मागू शकतात ही नवीन मिळालेली माहीती.
आधी या कायद्याच्या बंधनाची बहुतांशी स्त्रियांना माहीती नसते. चुकून माहीती झालीच तर आवाज उठवण्याची लाज वाटत असते कारण आपल्या महान संस्कृतीत बाईने या विषयाबद्दल उघडपणे बोलणे हे उठवळपणाचे मानले जाते. त्या बाईचीच टर उडवली जाते. अगदी तिच्या चारित्र्याबद्दलही बोलले जाते. याच विषयावरच्या डॉक्यूसंदर्भातल्या माझ्या लिखाणावर एका व्यक्तीच्या ज्या गलिच्छ आणि अपमानास्पद प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावरून ही मानसिकता अगदीच स्पष्ट झाली होती. हे सगळं दुर्लक्षित करून एखाद्या बाईने पाठपुरावा करायचा ठरवलाच तर तिला तिच्या पुरूष आणि स्त्री सहकार्यांकडून पाठींबा मिळेलच असं काही नाही. कारण शेवटी प्रत्येकाला आपली नोकरी महत्वाची असते.
असो अजून एक सुखद धक्का म्हणावी अशी घटना/ वस्तुस्थिती.. सिंधुदुर्गातल्या नेरूर या गावात (कलेश्वराचं मंदीर जिथे आहे ते नेरूर. हळदीचे नेरूर नव्हे.) बाजारपेठेत हायस्कूल आहे. कामाच्या निमित्ताने फिरत फिरत या शाळेत आम्ही पोचलो. सुट्टीचा दिवस असल्याने शाळेत कोणीच नव्हतं. शाळेतल्या मुलींच्या स्वच्छतागृहाला भेट दिली (शिक्षिकांसाठी कुलूप वगैरे लावून ठेवलेल्या अश्या नाही तर सर्व मुलींसाठी खुल्या असणार्या) नळाला पाणी होते, ज्यात पाणी भरायचे ती बादली स्वच्छ, आतमधे सिमेंटनेच लिंपलेली जमीन होती पण त्यावर काहीही केरकचरा नव्हता, भिंतींवर कुठलेही आचरट साहित्य लिहिलेले नव्हते, घाण वास येत नव्हता, कधीही आपल्यावर पडतील अश्यापद्धतीने तरंगणार्या जळमटांचा मागमूसही नव्हता, खिडकीच्या काचा गायब नव्हत्या.
ज्या ज्या कुणाचा हातभार असेल हे असं ठेवण्यात आणि बांधण्यात त्याला सलाम.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
या दुव्याचा उपयोग होऊ शकेल. मूळ दुव्यावर असलेली रचनेविषयीची माहिती वाचून अशीच कल्पना व्यक्तिगत पातळीवर राबविणे सहज शक्य होईल असे वाटले. अर्थात त्यासाठी 'पेंडिंग पेटंटच्या बैलाला...' हे तत्त्व मान्य करावे लागेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
उपक्रमाबद्दल अधिक माहीती इथे
http://www.misalpav.com/node/10175
उपक्रमाचे अजूनतरी काहीही झालेले नाही. सध्या केवळ अनुभवखात्यात भर पडणे चालू आहे. कामानिमित्ताने ग्रामीण भागात फिरणे खूप चालू आहे आणि योग्य तो झाडझाडोर्याचा आडोसा शोधण्यात मी पटाईत झालेली आहे.
चित्रपटाच्या प्रोजेक्टमधे माझ्यावर खूप जास्त जबाबदार्या असल्याने मी पूर्ण बांधली गेलेली आहे त्यामुळे वेळेची प्रचंड चणचण आहे. चित्रपटाचे शूट संपल्यावर या विषयाच्या कामाला वेग येईल. तूर्तास मी संशोधन पातळीवरचे निदान pointers तरी जमवून ठेवते आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
पुरुषाचं एक वेळ ठीक आहे, ते कुठेही आडोश्याला उभं राहून धार मारू शकतात परंतु आपल्याकडील स्वच्छ प्रसाधनगृहांची वानवा ही महिलांकरता मात्र खरंच तापदायक गोष्ट आहे. - मीदेखील हेच म्हणतो .
नीधप ताई,
अतिशय चांगला लेख आहे. 'गाव गाव सवरता है, अपना भारत बनता है' या पद्धतीने पुरुष एकवेळ मॅनेज करु शकतात. तासनतास थांबून राहण कसं जमतं बायकांना देव जाणे. खरं तर अशी वेळ कुणावरचं येऊ नये. तुमच्या उपक्रमाकरता शुभेच्छा. अतिशय चांगला उपक्रम .
कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं.
- स्वतःला कावीळ झाली म्हणून सगळं जग पिवळं आहे असं समजू नये इतकंच सांगेन.
नीधप यांनी एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार. आपण या साठी काहीच करू शकत नसल्याबद्दल एक पुरुष म्हणून लाज वाटते.
स्वतःला कावीळ झाली म्हणून सगळं जग पिवळं आहे असं समजू नये इतकंच सांगेन.
-- सहमत.
as no toilets are provided,many times I see 2 LADIES PULL 2 SIDES SHUTTERSand 1 uses PORTION INBETWEEN AS TOILETS,
when 33 takke fight is on it;s tme ladies lock the horns with Mamataa,
and writer of this ARTICAL,needhap,
SHOULD TAKE THE LEAD,writting articals is hust not enough,as follo up action alone has key to this problem.
Regards.
प्रतिक्रिया
उत्तम लेख
उत्तम
प्रसाराची गरज
काही दिवस
स्त्रीजन्मा तुझी कहाणी
हा लेख
+१ हेच म्हणतो
चांगली कल्पना
+१ अगदी असंच म्हणतोय
परखड लेख आवडला
वाईट परिस्थिती
षंढ
भयानक वास्तव
एका उत्तम
परखड
दूर्दैवाने हे सगळं खरं आहे!
सरकारने
+१
to be honest a clean artical
अत्यंत ज्वलंत विषय..
उत्तम लेख.
प्रत्येक
सहज साध्य तंत्रज्ञान
लेख आवडला, वाईट वाटले
आपला
कशाला?
वाटत
कधीही ताईच
उपक्रम!
पुरुषाचं
नीधप यांनी
ह्याच
Even,when ladies travel by MEMU or DEMU types of intercity train
मायबोलीकर