Skip to main content

नेत्यांची प्रतिज्ञा ...........

लेखक मंगेशपावसकर यांनी रविवार, 21/02/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्यांची प्रतिज्ञा ........... खुर्ची माझा देव आहे. सगळे श्रीमंत माझे बांधव आहेत. माझ्या पैश्यावर माझे प्रेम आहे. माझ्या खिशातल्या डेबिट आणि स्विस बँकेतल्या खजिन्याचा मला अभिमान आहे. त्या पैशाचा दूरूपयोग करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या हायकमांड , पक्षश्रेष्ठी आणि संपतीधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि पैसेवाल्यांशी सौजन्याने वागेन. माझे वरिष्ठ आणि माझे पद यांच्याशी सदैव निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझ्या सात पिढ्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हाय कमांड ........ - मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3455
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सही!! ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

आहे खरी अशी परीस्थिती! अशा लोकांनी जमवलेल्या संपत्तीची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. रेवती

आज मला चान्स भेटला तरी मी पैसा खाणारच आहे ;) त्यामुळे पैसे खाणार्‍या नेत्याच्या कर्माला नावे ठेवण्याचा मला नैतिक अधिकार नाही ! ते म्हणतात ना .. जाऊ दे .. अंमळ अश्लिल म्हण आहे .. व्यनि करा हवी असेल तर :)

झकास... (फोटु जालावरुन घेतले आहेत) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...