णमस्कार्स लोक्स ,
मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन.
तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी .
आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे
१. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा
२. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ?
३. मी संपादक झालो तर ?
४. बांग्लादेशी लेखकांचे मनोगत
५. वातुळ बटाट्यांना कसे आवरावे ?
परंतु सगळंच ह्या आधी कोणी ना कोणी उष्ट करून ठेवल्याने मी त्यातल्या त्यात एका विषयाला हात घालतो.
तर चला , निबंधाला सुरूवात करतो ! काही संवाद म्हणजे स्वतःशीच केलेली उद्बोधक चर्चा :)
मी संपादक झालो तर ?
मित्रांनो , आपल्या प्रत्येकामधे एक सुप्त इच्छा नेहमीच ठरलेली असते. आपण फलाना फलाना झालो तर ? आपल्याला फलाना फलाना सुपरपॉवर्स मिळाल्या तर ? नुसत्या कल्पनांनी मन कसं भ्रंम्हाडी सफरीचा लुफ्त (घो त्या "त्फ" चा ) लुटू लागतं, नाही ? मला सुद्धा असंच काहीसं वाटे . तसे सुपरपॉवर असणे म्हणजे एक युनिकनेस असतो . पत्त्यांमधे जशी "हुकमाचे पत्ते" असतात आणि ते बाकी प्रकारच्या पत्त्यांवर भारी असतात त्याच प्रमाणे संपादकपॉवर आहे असे मला प्रांजळपणे वाटते . पुन्हा इथे ही एक्का एकंच .. मग येतात राजा-राणी-गोट्या वगैरे ..
हो ... पण ह्या आतल्या गोटातल्या गोष्टी . बाहेरू मात्र हुकमाचं पान म्हणजे हुकमाचं पान :) !
मी जर संपादक झालो तर आधी माझे नाव बदलून कात्रीकर्मी ठेवुन घेईन , काय म्हणता ? णॉट रेकमेंडेड आय.डी ? सगळेच आपल्याला फाट्यावर मारून आपल्या फाट्याचं भजं करतील ? मग "का.त्र्या. मारुदे" ते ही घेतल्या गेला आहे ? ह्या अरेरे .. मग "कापुरंग" ? काय ? नाही घेता येणार ? का ? दोन तारांवर पाय ठेऊन कसरत करावी लागेल ? नको .. आपली ती कुवत नाही ... आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही .. पण छ्या .. इथे ही फेल्ड् .. थांबा "कापिन कात्रीसार्खे" घेतो .. फेल्ड् अगेन.. मुस्तस्द्दीपणा हा मँडेटरी आहे ? तो कोणा लेकाच्यान आहे ? सोडा नाद ! .. लेम्मी कीप ट्रायिंग .. "कात्रा" ... नाही? .. ह्या आय.डी.चाही विकास झालाय वाटतं ऑलरेडी ... एखादं ६० वर्षापुर्वीचं नाव ट्राय करतो .. ते शक्यतो कोणी घेतलं नसेल .. "कापुन ठेव" .. फेल्ड .. आय.डी. एग्झिस्ट सिन्स जिजस बॉर्न ? च्यामारी हा आय.डी आपल्या बारश्यालाही घेणं शक्य नव्हतं ! च्यायला ... सुपरपॉवर व्हायची स्वप्न पहातोय खुशाल .. पण असं ठोस , भरीव आणि वजनदार का बरं लागत नाहीये ? "कात्रोबा टर्टर " .. "डोन्च्यू डेयर टू थिंक ऑफ धिस आय.डी. यू वान्ना लिव्ह ऑर यू वान्ट पॅरागॉन ?" असा काहीसा मेसेज आला .. शिवधनुष्यापेक्षाही जड नाव घेतल्यावर काय होणार ? .. आहे त्याच नावाने संपादक व्हावे काय ? नाही .. असं कसं .. असं कसं ? सुपरहिरो ला नेहमी एक आभासी नाव असलंच पाहिजे .. पण नाही ना सुचत .. अर्रे पण मी होतो ना "अपवाद पारा " ! आपण आहे ह्याच नावाने "संपादक - द सुपर कापर" बनुया !
मी संपादक झालो तर !!!! वा वा वा !!! काय सुरेख आणि तरल विचार आहे ! नुसत्या कल्पनेनेच माझी बोटं कशी शिवशिवायला लागली ! योग्य जागी ह्यांचा तसाही हल्ली उपयोग होत नाही ... घ्या अवघे अंतरजालंची माझे घर म्हणा ! आणि दाखवा बोटांची जादू जगाला :) साला कोण नडतो पहातोच मला ! एकतर संपादक झाल्यावर सर्वेसर्वा आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ! मग काय ? पुर्ण राण मोकळं आहे आपल्याला ! कापा कुठेही आणि कसेही .... आणि लावा आग जंगलाला :) कोणी बोंबललाच .. तर म्हणायचं .. अरे हल्ली उण्ह फार तापतात .. वणवा पेटला असेल .. आम्ही नाही .. आम्ही नाही केलं हो काही .. हॅहॅहॅ .. आम्ही तर वेगळ्याच संस्थळांवर / ब्लॉग्ज वर काड्या करण्यात मश्गुल होतो .. असं करून हलकेच कॉलरवरची (नसलेली) धुळ झटकावी. नाही तरी अशी वेळ येते फार कमी ... कारण सर्वेसर्वा कसा रोखठोक आहे .. जसा युद्धावर जाणार्या सोल्जरच्या अंगावर बॉंब्ज , मॅग्झिन्स , चाकूज, गन्स इत्यादी सामान लोड केलेला असतो तसा आपला सर्वेसर्वा आंगभर चपला लटकवून असतो सगळ्या साईझच्या. आहे काय नाय काय !! सरळ पीन मारावी ... हे पहा मालक .. हे बेणं आपल्याविरूद्ध ( स्वत:विरुद्धचे हल्ली हे "आपल्या" विरुद्ध केल्यावर एखादा वेगळा इफेक्ट येतो ) लै बडबड करतं हल्ली .. ह्याला धडा शिकवलाच पाहिजे. ह्याची लेखणी हल्ली आपल्याविरुद्ध फार चालते . आपल्याच संस्थळावर येऊन आपली तासतो म्हणजे काय ? कापला त्याला ! मग मालकंही डोक्यावर कौतुकाने हात फिरवून "व्वा रे माझ्या संपादका ~! कसा बाणेदार संपादक वाटतोस :) म्हणतील आणि एक पाठीला चोळण्याचा साबण बक्षिस म्हणून देतील .. की लग्गेच आपले ढोरास रोड ला पळावे .. तीकडे म्हणे भरपुर म्हशी डूंबत असतात ;) आपण मात्र साबणाबरोबर डर्मीकुलही न्यावे . :) आणि आपली आवडती म्हैस पाहुन काळ्या पाठी पांढर्या करण्याचे निष्फळ प्रयत्न करावे :) होत नाही पाहुन तात्पुरता उपाय म्हणून बरोबर आणलेलं डर्मिकुल फासावं :) म्हैसही खुष .. आपण ही खुष ..
पण असं सुपरहिरो ने आपल्या हेतु पासुन अवांतर होऊन असं चालेल ? गप गुमान कितीही (आणि काहीही) वाटलं तरी कम ब्याक टू दं ड्युटी ! इट्स आवर वावर शेवटी .. नाही का ? :)
असो , संपादक झालो तर अवांतरपणा किंवा कल्ला करण्याची काही विषेश शक्ति नष्ट होतात :) अर्थात त्या करायच्या असल्यास आपली "अय्यार" शक्ती वापरून आपला क्लोन तयार करून तो जंगलात सोडावा ! ह्याच्या तारा आपल्या हातात नाहीत हे लपवण्याचे कौशल्य मात्र आपल्यात हवे ! ह्या "अय्यारी क्लोन्स" चा अजुन एक उपयुक्त उपयोग असतो :) ह्याला काही तरी वाकडे-तिकडे लिहीण्यास लावावे , मग आपण (अचानक) प्रकट होऊन भर चौकात हाणावे , ह्यामुळे आपला दरारा कसा तरारून वाढतो.
संपादक झाल्यावर अजुन एक गोष्ट करायची ! ते म्हणजे सपक किंवा आळणी लिहायला लागायचे :) काय ? अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते , असं जनरलाईझ करून कसं चालेल ? आणि किती अवघड हे आव्हान ? सगळी थेरं आपण स्वतःच्या नावाने करूच शकणार नाही ? हे म्हणजे "अल् कायदा" ने आतंकवादी हमले करून गुप्तता पाळायला लागली तर त्या "अल् कायदा" च्या जेवढं जिवावर येईल त्यासारखं होईल राव ! मग ? संपादकपणा म्हणजे काय पोरखेळ वाटला ? आपल्याला कर्मी वगैरे बिरुदं लावली की लगेच महाण होतो का कोणी ? लक्षात ठेव ! संपादक ही पॉवर आहे मोठी वेगळी पॉवर ...
वाटतं सोपं पण नाहीये तसं .. वारंवार कासर्याचे घाव पडून पडून रहाटाचं चाक जसं गुळगुळीत होतं तसं एका क्षणात करणं सोप्पं आहे की काय ? तेवढे घट्टे आणि घाव सोसावे लागतात तेवढा वेळ द्यावा लागतो .. तेवढी परिपक्वता यायला हवी .. कोणीही आल्ल्याबल्ल्या संपादक होऊन चालेल का? निसर्ग ते कधीही मान्य करणार नाही !
त्यामुळे तु आहे तसाच लेखकर्मी रहा बाबा ! नसत्या सुपरपॉवर्स ची स्वप्न पाहु नकोस ! :) तुझं वय आहे आवडत्या नट्यांची स्वप्न पहाण्याचं .. ती पहा :) उपयोगात तरी येतील किमान .. (कुठाय तो आयेशाचा फोटू ? )
ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे गेलास .. की मग पहा संपादकपणाची स्वप्न !
टिप : पेपर लिहून भरपूर टाईम उरला तर बाकी विषयांवरचे निबंध लिहीन :)
वाचने
10328
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठ्यॉ....ठ्यॉ.
माताय
"टिकलातर"
In reply to माताय by शेखर
गपा की रे ए
In reply to "टिकलातर" by प्रभो
घ्या
In reply to गपा की रे ए by टारझन
तोडलस.. मित्रा
बोर्डात येणार हे कार्ट...
१५ पैकी १२ मार्क...
फक्त १२?????
In reply to १५ पैकी १२ मार्क... by मी-सौरभ
परीक्शेत कोणाला निबंधात.....
In reply to फक्त १२????? by शुचि
लै भारी
शुचि जी
In reply to लै भारी by शुचि
अभिणंडण
टार्या, तू
:)
In reply to टार्या, तू by रेवती
काह्ही
In reply to :) by टारझन
अफलातूण रे
जा! तुला संपादक केले!
कातरण ?!!!?!!!
In reply to जा! तुला संपादक केले! by प्रमोद देव
लय भारी
चालू द्या!
संपादक
:)
झकास
धमाल..
माताय!
कोचरेकर मास्तर
In reply to माताय! by चतुरंग
(संपादक
In reply to माताय! by चतुरंग
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह
भारी होता!
कठीण आहेस
लेख उत्तम
हा हा हा... ज
आता काय
चालू दे.....!
हॅहॅहॅ
In reply to चालू दे.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा.. मस
धन्यवाद
In reply to हाहाहा.. मस by प्राजु
प्रतिक्रिया
(No subject)
हाहाहा ...
In reply to (No subject) by sur_nair