Skip to main content

(बोका)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 09/02/2010 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा साय वरची आत दुधाचा साठा चोरटे आयुष्य देतो मालकास धोका बंद जरी असली घराची खिडक्या दारे एक तरी असतोच ना उघडा झरोका चोरणे हा वारसा की धर्म माझा? सोडेन कैसा मी एकतरी मोका सोबती जरी काळोखगर्भाचा उबारा सापडतो अचुक मज फडताळातील चक्का ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !! -कवी शाहरुख

वाचने 2751
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आई शप्पत!! सही SSS ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शारूकभाय रिंगणात आले वाटतं! ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा

एकदम जहबहराहा!!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !!
जबरदस्त!! उपाशी बोका

हि हि हि हि !!. जबरदस्त कविता आणी कवटी आहे तुमची. शेवटच कडव तर लै भारी. --टुकुल

जबरा! :)

फारच भारी......:-) ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका डोळ्यासमोर लबाड बोका आला....

कधी माऊ ,कधी मनी , मला कुणीही चालते चालता पळता कौलावरच कार्य माझे साधते.... :) ( तुम्ही हे महत्वाचंच विसरलात लिहायला... ) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

हाहाहाहा!!!! अरे या बोक्याला कोणीतरी ठोका रे..... =)) बिपिन कार्यकर्ते