हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका
बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका
हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!
सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका
ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3066
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येक
मस्त!
अगदी
In reply to मस्त! by राघव
शेवटची द्विपदी?
कविता आवडली
व्वा!!
फारच
आवडली.. फार
छाणंच हो
In reply to आवडली.. फार by मेघवेडा
कविता
वा! नेहेमीप्रमाणेच सुंदर!
कविता छान जमली आहे
सुंदर