Skip to main content

(धोका)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 08/02/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग.... पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा बायडी आभास नुसता, रोज धोका! बंद केली 'डायराने' सर्व दारे आयडी आला कसा, नसता झरोका? बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती संपादकत्त्वाचा उबारा, आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका बास आता सोंग हे वैचारिकांचे कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा! -चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2450
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

बास आता सोंग हे वैचारिकांचे कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा! हा हा हा ! लैच भारी. :) -दिलीप बिरुटे

मस्तच रंगाशेठ... पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा अगदीच राहवले नाही म्हणुन: चुकुन पृ ऐवजी पु वाचले :)

बंद केली 'डायराने' सर्व दारे आयडी आला कसा, नसता झरोका?
जबरा रे रंगा.. :) तात्या.

हाहाहा!!! जबरी... लै भारी व्यक्त केली आहे भावना... (कंडित) बिपिन कार्यकर्ते